मुंबई, 1 मार्च 2021 – सरकारच्या कोव्हिड- 19 लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पीएम केयर्स फंडासाठी 11 कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘अशाप्रकारच्या संकटांच्या काळातच एकीचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो आणि या महामारीशी लढण्यासाठी आपल्या देशाने जे प्रयत्न केले आहेत, त्यांचा सगळ्यांनाच अभिमान वाटायला हवा. या महामारीविरोधातले युद्ध अजून संपलेले नाही आणि एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने सर्वांचे लसीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. सर्वांनी पुढे येऊन लसीकरणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शक्य त्या पद्धतीने मदत करावी अशी मी विनंती करतो.’
या वर्षाच्या सुरुवातीला एसबीआयने कोव्हिड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी आपल्या वार्षिक नफ्याच्या 0.25 टक्के हिस्सा देण्याची बांधिलकी दर्शवत गरजूंना मास्क, सॅनिटायझर्स व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत लक्षणीय योगदान दिले होते. त्याशिवाय एसबीआय कर्मचाऱ्यांनीही या अभूतपूर्व संकटाच्या काळात राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी पीएम केयर्स फंडाला 107 कोटी रुपयांचे योगदान दिले होते.