पुणे – पराग मिल्क फूड्स लिमिटेडने चीज स्लाइसेसमधील चार स्वादांचे चार नवे प्रकार नुकतेचबाजारात आणले आहेत. पिरी पिरी, आचारी, शेजवान आणि कच्चा आम असे हे चार प्रकार असून, ते देशातील सर्व महानगरांत आणि शहरी भागांत उपलब्ध असतील. पराग मिल्क फूड्स लिमिटेड ही चव आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत आंतरराष्ट्रीय मानकांच्या तोडीचे दुग्धजन्य पदार्थ बनविणारी आणि त्याचे विपणन करणारी आघाडीची कंपनी आहे.
सँडविच बनविणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला चटणी चीज स्लाइसेस बाजारात आणले. ग्राहकांच्या मागणीच्या सखोल अभ्यासांतीच हे उत्पादन तयार करण्यात आले.
चवीबाबत सध्या असलेला कल लक्षात घेऊन पारंपरिक आणि आंतरराष्ट्रीय स्वादांचा एक अनोखा संयोग साधून कंपनीने आता चार नव्या चवीची उत्पादने – कच्चा आम, आचारी, पिरी पिरी आणि शेजवान – विकसित केली आहेत. पराठे,
सँडविच, भजी, बर्गर किंवा डोशांना या स्लाइसेसमुळे उत्तम स्वाद येईल. यामुळे स्वयंपाकामधील पदार्थ वाटण्याची प्रक्रिया करणे वाचेल. गायीच्या शुद्ध दुधापासून बनवलेले असल्याने, तसेच त्यामध्ये परिरक्षक (प्रीझर्वेटिव्ह) आणि कृत्रिम
रंगांचा समावेश नसल्याने आरोग्याबाबत विशेष जागरूक असलेल्या ग्राहकांसाठीही ‘गो चीज’ हा आवडता पर्याय असू शकेल.
नव्या स्वादाचे पदार्थ बाजारात आणत असल्याच्या निमित्ताने बोलताना पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी महेश इसरानी म्हणाले, ‘या उत्पादनाची आम्ही सोशल मीडिया आणि इतर नेहमीच्या माध्यमांतून अभिनव
पद्धतीने जाहिरात करतो आहोत. चटणी चीजच्या या विविध स्वादांची विक्री ही चीज स्लाइस प्रकारातील आमच्या एकूण विक्रीच्या 20 टक्के आहे. ग्राहकांना नेमके काय हवे आहे, हे जाणण्यासाठी केल्या जाणा-या आमच्या ग्राहककेंद्री
संशोधन व विकासाची नवे पदार्थ विकसित करण्यामध्ये मोठी भूमिका आहे. चीज प्रकारातील विविध स्वादांची भारतातील बाजारपेठ ही अजून बाल्यावस्थेत असली, तरी ग्राहकांचा नवा कल पाहता, आगामी काळात त्याला पुष्कळ
मागणी असेल, असा आमचा अंदाज आहे.’
पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले, ‘पराग मिल्क फूड्समध्ये आम्ही स्वतःला ‘द चीज पीपल’ असे अभिमानाने संबोधतो. चीज तयार करणे हे आमचे झपाटलेपण आहे आणि ‘गो’ या नाममुद्रेअंतर्गत ‘गो चीज’ हा आमचा सर्वांत मोठा उत्पादनप्रकार आहे. आम्ही नुकतेच ‘गो चटणी चीज’ बाजारात आणले आणि त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमच्या अंतर्गत अंदाजापेक्षाही तो अधिक होता. आमच्या ग्राहकांचा आरोग्य आणि पोषणमूल्ये यावर भर असल्याचे आम्ही जाणतो. संपूर्णपणे गायीच्या शुद्ध दुधाद्वारे बनविल्या जाणा-या आमच्या सर्व उत्पादनांद्वारे ग्राहकांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही झटतो आहोत. नव्या उत्पादनांद्वारे आमचा ब्रँड अधिक मजबूत होईल आणि आमच्या उत्पादनांची स्वीकारार्हता आणखी वाढेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.’
कंपनीने सर्व स्वादांचा मिळून एकत्रित असा ‘स्पाइस अप’ हा कॉम्बो पॅक बाजारात आणला आहे. याची किंमत 160 रुपये प्रति 200 ग्रॅम इतकी आहे. ग्राहकांना सर्व स्वादांची चाचपणी करता यावी, यासाठी हा कॉम्बो पॅक असून, यानंतर प्रत्येक स्वादाचे स्वतंत्र पॅक बाजारात आणले जातील.
पराग मिल्क फूड्स लि.बाबत
पराग मिल्क फूड्स लि. या खासगी डेअरी कंपनीची स्थापना सन 1992मध्ये झाली. कंपनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे स्वतःचे उत्पादन केंद्र आहे. महाराष्ट्रात मंचर येथे आणि आंध्र प्रदेशात पालमनेर येथे कंपनीची केंद्रे आहेत.
पराग मिल्क फूड्सची स्वतःची भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म प्रा. लि. ही डेअरी असून, तेथे 2000हून अधिक विशेष संकरित गायी आहेत. येथे दूध काढण्याच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करण्यात आले आहे. ‘गोवर्धन’ या ब्रँडखाली कंपनी तूप, दही, पनीर आदी पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ तयार करते, तर ‘गो’ या ब्रँडखाली
नव्या युगातील चीज, यूएचटी दूध, योगर्ट अशी उत्पादने बनवली जातात. ‘शेत ते घर’ या संकल्पनेतून ‘प्राइड ऑफ काउज’ हा ब्रँड विकसित करण्यात आला असून, तो गायीच्या उत्तम दर्जाच्या दुधाची मागणी असलेल्या ग्राहकांसाठी आहे. प्रवासामध्ये असताना पोटाला तात्पुरता आधार देऊ शकेल, असे ‘टॉप अप’ हे
दुग्धजन्य पेयही कंपनीने तयार केले आहे.