‘फ्लिपकार्ट’ व ‘नोकिया’च्या साईट्सवर उपलब्ध
· ‘नोकिया 5.4’ हा खास निर्मात्यांसाठी आहे; त्याच्या अपग्रेड केलेल्या ‘48-मेगापिक्सेल क्वाड कॅमेर्या’मध्ये ‘शटर लॅग’ पूर्णपणे घालविण्यात आला आहे; ‘प्रोफेशनल कलर ग्रेडिंग’सह प्रगत रेकॉर्डिंग क्षमता, जी ‘होम मूव्हीज’ व ‘वर्क व्हिडियो’ पाहताना सिनेमासारखी अनुभूती देते आणि ‘ओझो स्पेशल ऑडिओ’.
· दीर्घकाळ टिकून राहील असा दणकट व सुरक्षित; दोन वर्षांचे सॉफ्टवेअर अपग्रेड आणि तीन वर्षांची दरमहाची सिक्युरिटी अपडेट्स यांचे वचन; यातून ग्राहकांना मानसिक शांती.
· नवीनतम एआय तंत्रज्ञानासह ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 मोबाईल प्लॅटफॉर्म’मुळे अधिक गतिमान, बॅटरीचे दीर्घ आयुष्य, चांगले छायाचित्रण आणि वाढीव कार्यक्षमता या गोष्टी मिळण्याची फोनमध्ये क्षमता.
पुणे-17 फेब्रुवारी 2021 : ‘नोकिया फोन’चे घर असलेल्या ‘एचएमडी ग्लोबल’ या कंपनीने आपले ‘नोकिया 5.4’ हे मॉडेल सादर करीत असल्याची आज घोषणा केली. भारतात ‘फ्लिपकार्ट डॉट इन’ आणि ‘नोकिया डॉट कॉम’ या वेबसाईट्सवर ‘पोलर नाईट’ व ‘डस्क’ या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. ‘4 जीबी / 64 जीबी’ आणि ‘6 जीबी / 64 जीबी’ अशा रॅम / रॉमच्या कॉन्फिग्युरेशनमध्ये हा फोन 13,999 व 15,999 रुपये या सर्वोत्तम किंमतींना मिळेल.
जिओ नेटवर्क वापरणाऱ्या ‘नोकिया 5.4’च्या ग्राहकांना 4,000 रुपये किमतीचे अतिरिक्त लाभ मिळतील. यांमध्ये, 349 योजनेच्या प्रीपेड रिचार्जवर 2000 रुपयांचा तात्काळ कॅशबॅक आणि भागीदार कंपन्यांकडून 2000 रु. किमतीचे व्हाउचर यांचा समावेश आहे. ही ऑफर नवीन, तसेच विद्यमान जिओ ग्राहकांना लागू आहे.
निर्मिती करणाऱ्यांसाठी
प्रगत रेकॉर्डिंग क्षमता आणि सिनेमाई प्रभाव असलेला ‘48 एमपी क्वाड कॅमेरा’, बॅटरीचे दोन दिवसांचे आयुष्य आणि ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 मोबाईल प्लॅटफॉर्म’ची ताकद या वैशिष्ट्यांतून ‘नोकिया 5.4’ हा फोन या श्रेणीतील इतर कोणत्याही फोन्सपेक्षा सरस ठरतो आणि तो पैशाचा पुरेपूर मोबदला देतो.
आधुनिक निर्मात्यांसाठी डिझाइन व उत्पादित केलेला नवीन ‘नोकिया 5.4’ फोन हा अखंड चित्रीकरणाचा अनुभव शोधणार्या नवोदित व्हिडिओग्राफर्ससाठी अगदी योग्य ठरतो. ‘48 एमपी क्वाड कॅमेरा’, ‘16 एमपी फ्रंट कॅमेरा’ आणि ‘ओझो स्पेशल (अवकाशीय) ऑडिओ’ या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या ‘नोकिया 5.4’मध्ये एक अनोखे ‘सिनेमा’ फंक्शन आहे. त्यातून ‘24 एफपीएस’ (फिल्म इंडस्ट्री स्टँडर्ड) छायाचित्रण निघू शकते आणि वापरकर्त्यांना ‘21: 9 सिनेमॅटिक’ स्वरुपात छायाचित्रण करता येते. यातील क्वाड कॅमेऱ्यात ‘शटर लॅग’ पूर्णपणे घालविण्यात आला आहे. याचा अर्थ, छायाचित्र घेताना आपण कधीही महत्त्वाचा क्षण चुकणार नाही – आपण जरी आपल्या उत्कट स्वरुपाच्या प्रकल्पाचे काम करीत असू किंवा मौल्यवान असे कौटुंबिक क्षण हस्तगत करीत असू, तरी.
एकूण कामगिरीचा विचार केला असता, ‘नोकिया 5.4’ हा मोबाईल वेगवान आणि नितळ अनुभव देतो. खरे तर, तो आपल्याला ‘42 कम्युट्स’ उर्जा देण्यास पुरेसा आहे (सरासरी जागतिक कम्युट 67 मिनिटे आहे) आणि तरीही आपण मुलांसह हा मोबाईल वापरू शकतो किंवा त्यावर इमेल वाचू शकतो, इतकी बॅटरी शिल्लक राहते.
नवीनतम ‘सिक्युरिटी पॅच अपडेट्स’ आणि ‘अँड्रॉइड अपग्रेड्स’ ऑफर करण्यास वचनबद्ध असलेला हा नोकिया स्मार्टफोन आत व बाहेर सुंदरपणे डिझाइन केलेला आहे. कंपनीतर्फे या फोनला तीन वर्षांच्या कालावधीत दरमहा सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मानसिक शांतता लाभणार आहे. 2020च्या ‘ब्रँड ट्रस्ट रँकिंग’मध्ये नोकिया स्मार्टफोन प्रथम क्रमांकावर असून, अधिक परवडणारी उपकरणे विकसीत करण्याच्या दृष्टीने या फोनने उद्योगातील मापदंड वाढविला आहे.
‘एचएमडी ग्लोबल’चे उपाध्यक्ष सनमितसिंग कोचर या प्रसंगी म्हणाले, “व्यग्र स्वरुपाच्या आधुनिक जीवनातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ‘नोकिया 5.4’ फोन बनविला आहे. छायाचित्रे आणि व्हिडियोद्वारे क्षण टिपण्यासाठी दररोज हा फोन संधी उपलब्ध करील. त्या दृष्टीने आम्ही ‘48 एमपी’चा विलक्षण कॅमेरा आणि ‘ओझो स्पेशल ऑडिओ’सह चित्रपट बनविण्याची क्षमता एकत्रित केली आहे. ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ™ 662 मोबाइल प्लॅटफॉर्म’ची विश्वासार्हता, दोन दिवस चालणारी बॅटरी, तीन वर्षे देण्यात येणारी सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन सॉफ्टवेअर अपग्रेड्स या वाढीव सुविधांमुळे, ‘नोकिया 5.4’ हा फोन आधुनिक भारतीयांचा परिपूर्ण सहकारी बनू शकेल, अशी माझी खात्री आहे.”
‘फ्लिपकार्ट’चे वरिष्ठ संचालक आदित्य सोनी म्हणाले, “नवीन नोकिया 5.4 मोबाईल फोन भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. छायाचित्रे व व्हिडिओ काढण्यासाठी यात देण्यात आलेला उच्च दर्जाचा कॅमेरा आणि ‘ओझो स्पेशल ऑडिओ’ यांमुळे हा स्मार्टफोन व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्हींसाठी उत्कृष्ट निवड ठरू शकतो. आम्ही ग्राहकांना प्रथम स्थान देणारे आहोत. ‘नोकिया 5.4’ सादर केल्याने आमचा मिड-प्रीमियम उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये मोलाची भर पडत आहे. या पोर्टफोलिओमधून लोकांच्या वाढत्या गरजांची पूर्तता होत असते.”
साधकांसारखे क्षण काबीज करा
‘48 एमपीचा क्वाड कॅमेरा’ आणि ‘16 एमपीचा फ्रंट कॅमेरा’ यांच्या शक्तिशाली संयोजनामुळे आपल्याला अतिशय आकर्षक छायाचित्रे व व्हिडिओ घेता येतात. उजेडात, अंधारात, घरात किंवा बाहेर, दिवसाच्या कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी अविश्वसनीय स्वरुपाचे तपशील या छायाचित्रांमध्ये येतात. मुख्य कॅमेर्याच्या ‘अल्ट्रा-वाइड’ लेन्स या विस्तृत लँडस्केप शॉट्स व त्यांची खोली टिपू शकतात, तर ‘मॅक्रो कॅमेर्या’ने पोर्ट्रेट आणि अगदी क्लोज-अप्सचे स्नॅप्स चांगले येतात. ‘नोकिया 5.4’मध्ये शटरचा लॅग अगदी शून्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे हलत्या वस्तूंचे छायाचित्रण अगदी सहज शक्य होते व ही छायाचित्रे आयुष्यभराची ठेव बनू शकतात.
यातील ‘सिनेमा’ मोड फंक्शनचा उपयोग ‘24 एफपीएस’ (चित्रपट उद्योगातील मानक) आणि ‘21:9 सिनेमॅटिक फॉरमॅट’चे व्हिडिओ घेण्यासाठी करता येतो. व्यावसायिक कलर ग्रेडिंगच्या पर्यायांमुळे छायाचित्रित केलेल्या कच्च्या फुटेजचे रुपांतर एखाद्या चित्रपटाच्या तोडीच्या व्हिडिओमध्ये होऊ शकते. नितळ मोशन शॉट्स मिळविण्यासाठी, आपण हे फूटेज ‘60 एफजीएस’ व्हिडिओ रेकॉर्डिंगपर्यंत सहज डायल करू शकतो – हे प्रमाण चित्रपट उद्योगाच्या मानकांपेक्षा जवळजवळ तीन पटींनी अधिक आहे. आपल्या मुलाने स्केटबोर्डवर मिळवलेल्या कौशल्याचे किंवा आपल्या घरातील कुत्र्याच्या एखाद्या मस्तीचे चित्रण करीत असलात, तरी यातील ‘हाय फ्रेम रेट’मुळे प्रत्येक बारीक हालचाल आपल्याला व्यवस्थित टिपता येईल. प्रतिमा स्थिरीकरण, ओझो स्पेशल ऑडिओ आणि व्हिडिओतील वाऱ्याचा नॉईस घालवता येण्यासारख्या वैशिष्ट्यांमुळे, ‘नोकिया 5.4’ आजच्या व्यग्र जीवनशैलीसाठी अगदी योग्य आहे.
‘क्वालकॉम’सह ‘एआय’वर अवलंबून राहा
आपण काम करीत असा, गेम खेळत असा, चित्रपट पाहात असा, छायाचित्रे काढत असा किंवा आपल्या लहानग्यांचे मनोरंजन करीत असा, ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ™ 662’द्वारे समर्थित ‘नोकिया 5.4’ स्मार्टफोनमध्ये आपल्याला अधिक गती, बॅटरीचे दीर्घ आयुष्य, उत्कृष्ट इमेजिंग आणि वाढीव कार्यक्षमता देण्याची ताकद आहे. नवीन ‘एआय’ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्यामुळे, हे सॉफ्टवेअर बॅकग्राउंडमध्ये स्मार्ट निर्णय घेते व आपल्याला दररोजच्या कामात मदत करते.
स्टाईलिश, लक्षवेधी, दणकट
‘नोकिया 5.4’चा डिस्प्ले ‘6.39 इंच एचडी प्लस पंच-होल’ व लक्षवेधक आहे. व्हिडिओ आरामात पाहता येण्याजोगा त्याचा स्क्रीन मोठा असूनही खिशात व हातात सहज मावेल इतका सुटसुटीतही आहे. त्याच्या उत्कृष्ट बांधणीमुळे, ‘नोकिया 5.4’ बाहेरच्या भागातही चांगला दिसतो आणि तितकाच आतूनही तो सुंदर आहे. नोकियाचे सर्व हॅंडसेट दणकट व टिकाऊ आहेत. उत्पादन करताना त्यांच्या अतिशय कठीण अशा चाचण्या घेतलेल्या असतात, एखादा 10 वर्षांचा मुलगा या फोन्सवर उभा राहिला तरी त्याचे वजन झेपेल, इतके हे फोन दणकट असतात. टिकाऊ स्वरुपाच्या मागील कव्हरमुळे आणि लक्षवेधी डिझाईनमुळे नोकियाच्या ‘नॉर्डिक’ वारशाची आठवण येते. जबरदस्त जिवंत रंगांमध्ये (पोलर नाईट व डस्क) उपलब्ध असणारा ‘नोकिया 5.4’ मोबाईल आपल्याला एक मोहक लूक देतो, त्यामुळे आपल्याला तो उचलून घेण्याचा मोह होतोच. हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाची आठवण करून देणारा हा फोन, आपण हलताच रंगांच्या छटाही बदलू शकतो.
दिवसचे दिवस टिकणारी ऊर्जा, तसेच सुरक्षित व अद्ययावत राहणे
दोन दिवस उर्जा टिकवून ठेवणारी बॅटरी असलेला ‘नोकिया 5.4’ फोन हा आपल्या गतिमान, कायम कार्यरत असलेल्या आयुष्याचा व जीवनशैलीचा विश्वासू सहकारी आहे. ‘एआय-असिस्टेड अॅडॉप्टिव्ह बॅटरी’ तंत्रज्ञानामुळे अॅप्सचा स्मार्ट वापर आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी वैयक्तिकृत ऊर्जा मिळू शकते.
दीर्घकाळापर्यंत टिकून राहणारा आणि सुरक्षित असा ‘नोकिया 5.4’ हा फोन ‘अॅंड्रॉईड 11’ या ऑपरेटिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. तीन वर्षांपर्यंत दरमहा सिक्युरिटी अपडेट्स व दोन वर्षे सॉफ्टवेअर अपग्रेड्स मिळाल्यामुळे आपण अधिक सुरक्षित आणि अद्ययावत राहू शकाल. उत्कृष्टता राखण्याच्या ‘एचएमडी ग्लोबल’च्या कटिबद्धतेमुळे, नोकिया स्मार्टफोन आपल्या क्षेत्रात अग्रभागी आहे. सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स यांच्या जोडीला दणकट बांधणी असलेले हे फोन, आपण खरोखरीच विश्वास ठेवू शकू, असा पोर्टफोलिओ देऊ करीत आहेत.
फोन घेतल्यावर कुटुंबियांकडून, विशेषतः मुलांकडून होणाऱ्या त्याच्या वापरामुळे चिंता निर्माण होऊ नये म्हणून, मनाची आणखी शांतता मिळविण्यासाठी, यातील ‘फॅमिली लिंक’अप हे आपल्याला मदत करेल. फोनमध्ये आपल्याला डिजिटल स्वरुपात काही साधे नियम सेट करता येतात आणि फोनच्या वापरावर नियंत्रण ठेवता येते. अशा प्रकारे, हे अॅप आपल्याला आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यास मदत करेल. या व्यतिरिक्त, जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा मदत करण्यासाठी आपण ‘गूगल असिस्टंट’वर अवलंबून राहू शकता – फक्त “हे गूगल” म्हणा.
–अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा – एचएमडी ग्लोबल प्रेस ऑफिस – hmd@adfactorspr.com
‘एचएमडी ग्लोबल’बद्दल :
फिनलँड या देशातील एस्पु येथे मुख्यालय असलेली एचएमडी ग्लोबल ओय हे नोकिया फोनचे घर आहे. विविध स्तरांतील ग्राहकांसाठी, वेगवेगळ्या किंमती असणारे स्मार्टफोन व फीचरफोन यांचे डिझाईन व मार्केटिंग ‘एचएमडी’तर्फे करण्यात येते. नाविन्यता आणि गुणवत्ता यांबाबत कटिबद्ध असलेली एचएमडी कंपनी, ही फोन आणि टॅबलेट या उत्पादनांसाठी नोकिया ब्रँडची एकमेव परवानाधारक आहे. अधिक माहितीसाठी, www.www.hmdglobal.com पाहा.
‘नोकिया’ हा नोकिया कॉर्पोरेशनचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. ‘क्वालकॉम’ आणि ‘स्नॅपड्रॅगन’ हे ‘क्वालकॉम इन्कॉर्पोरेटेड’चे ट्रेडमार्क आहेत. ते युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांमध्ये नोंदणीकृत आहेत. ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन’ हे ‘क्वालकॉम टेक्नोलॉजीज इंक’ आणि / किंवा तिच्या सहाय्यक कंपन्यांचे उत्पादन आहे. ‘गूगल’, ‘अँड्रॉइड’ आणि ‘फॅमिली लिंक’ या गूगल एलएलसीच्या ट्रेडमार्क आहेत. सर्व उत्पादनांची नावे, ट्रेडनेम्स आणि नोंदणीकृत ट्रेडमार्क ही त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत. सर्व स्पेसिफिकेशन्स, वैशिष्ट्ये आणि देण्यात आलेली इतर माहिती कोणत्याही सूचनेशिवाय बदलली जाऊ शकते. ऑफर करताना बदल लागू होऊ शकतात.