एअर इंडियाने आपल्या अतिथींचा प्रवास अनुभव अजून समृद्ध व्हावा यासाठी ‘प्रोजेक्ट अभिनंदन’ चालू केले
गुरुग्राम,: भारतातील आघाडीची जागतिक वाहक कंपनी, एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना म्हणजेच विमानतळावरील एअरइंडियाच्या अतिथींना विमानतळांवर वैयक्तिककृत आणि त्रासमुक्त अनुभव देण्याच्या उद्दिष्टाने प्रथमच ‘अभियान अभिनंदन’ (प्रोजेक्ट अभिनंदन) सुरू केले आहे (हिन्दी भाषेमध्ये ‘अभिनंदन’ हा अभिवादन करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे).
या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, एअरइंडियाने १६ प्रमुख भारतीय विमानतळांवर खास प्रशिक्षित सेवा आश्वासन अधिकारी रुजू केले असून ते विमानतळावरील एअरइंडियाच्या अतिथींना गरज असल्यास; चेक इन क्षेत्र, बोर्डिंग दरवाज्याच्या जवळ, ट्रान्सिटच्यावेळी किंवा आगमन हॉल अशा विमानतळावरील सर्व टचपॉईंट्सवर सेवा देतील व आवश्यक ते सर्व सहाय्य करतील.
प्रवाश्यांच्या विमानतळावरील समस्या समजून घेता याव्यात म्हणून एअरइंडियाच्या सेवा आश्वासन अधिकाऱ्यांना खास प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना अतिथींबरोबर सक्रियपणे मिसळता यावे, ग्राहकांना मदत करता यावी किंवा ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन सोडविता याव्यात यासाठी धोरणात्मक महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच टचपॉईंट्सवर रुजू केले जाईल. विमान चुकणे, समान उशिरा येणे यांसारख्या विमानतळावर अकस्मात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
एअरइंडियाचे ग्राहक अनुभव आणि ग्राउंड हॅंडलिंग विभागाचे प्रमुख अधिकारी श्री. राजेश डोग्रा याबाबत म्हणाले, “एखाद्या व्यक्तीने अनेक वेळा विमानाने प्रवास केलेला असला तरी कधीकधी अनपेक्षितपणे विमानतळावरील अनुभव त्रासदायाक होऊ शकतो. आमच्या अतिथींचा विमानतळावरील अनुभव सोईस्कर करण्यासाठी, त्यांच्या प्रवासाच्या एकूण अनुभवात अर्थपूर्ण बदल आणण्यासाठी आणि एकूणच जेव्हा ते आमच्यासोबत विमानाने प्रवास करणार आहेत तेव्हा त्यांना आरामदायी व स्वागतार्ह वाटावे यासाठी केलेला ‘अभियान अभिनंदन’ (प्रोजेक्ट अभिनंदन) हा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विमान प्रवास हा एक अत्यंत आनंददायी आणि रोमांचक अनुभव असतो. आमच्या अतिथींना हा अनुभव सहजपणे मिळावा अशी आमची इच्छा आहे. एअरइंडियाला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची विमान वाहतूक सेवा कंपनीमध्ये परावर्तित करण्यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन मार्गांचा अभ्यास आणि मूल्यमापन करीत असतो. ‘अभियान अभिनंदन’ (प्रोजेक्ट अभिनंदन) सेवा हे त्यादृष्टीने एक पाऊल आहे.”
अहमदाबाद, बंगळूर, कालिकत, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, कोलकाता, कोची, हैदराबाद, लखनौ, मुंबई, नागपूर, पुणे, वाराणसी आणि विशाखापट्टणम या १६ विमानतळांवर एअरइंडियाचे सेवा आश्वासन अधिकारी एअरइंडियाने प्रवास करणाऱ्या विमानतळावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या आमच्या सर्व अतिथींना, त्यांचे बूकिंग कोणत्याही वर्गाचे असले तरीही, मदत करतील.
ग्राउंड हॅंडलिंग कर्मचारी, एअरइंडियाचे अन्य कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त हे सेवा आश्वासन अधिकारी विमानतळांवर उपस्थित असतील. एअरइंडियाने विमानतळांवर १०० पेक्षा जास्त सेवा आश्वासन अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील केलेली आहे.