· प्राईस बँड प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी १५६ ते १६४ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
· फ्लोर प्राईस ही इक्विटी समभागांच्या दर्शनी मूल्याच्या १५६ पट तर कॅप प्राईस १६४ पट आहे.
· बोली/ऑफर गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि सोमवार, १८ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी बोली लावता येतील.
· कमीत कमी ९० इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ९० च्या पटीत इक्विटी समभागांसाठी बोली लावता येतील.
पुणे: झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडचा (कंपनी) आयपीओ गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये ३९२० मिलियन (फ्रेश इश्यू) रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सचा आणि समभागांची विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून १०४४९८१६ पर्यंतच्या समभागांच्या (ऑफर फॉर सेल) विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख बुधवार १३ सप्टेंबर २०२३ निश्चित करण्यात आली आहे. ही ऑफर गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ रोजी खुली होईल व सोमवार १८ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल.
प्राईस बँड प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी १५६ ते १६४ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ९० इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ९० च्या पटीत इक्विटी समभागांसाठी बोली लावता येतील.
नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जे भांडवल उभे राहील ते ३००० मिलियन रुपयांच्या ग्राहक अधिग्रहण व धारणा खर्चासाठी; ४०० मिलियन रुपयांच्या तंत्रज्ञान व उत्पादन विकासासाठी; कंपनीच्या १७०.८३ मिलियन रुपयांच्या कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी वापरले जाईल आणि उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल. सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाणार असलेली रक्कम ही नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांमधून मिळालेल्या एकूण रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसेल.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये राज पी नारायणन यांच्याकडून १५२९६७७ पर्यंत; अविनाश रमेश गोडखिंडी यांच्याकडून १५२९६७७ पर्यंत; (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर), व्हेंचरईस्ट प्रोऍक्टिव्ह फंड एलएलसी यांच्याकडून २८३०४९९ पर्यंत; जीकेएफएफ व्हेंचर्सकडून २०४६०२६ पर्यंत; व्हेंचरईस्ट सेडको प्रोऍक्टिव्ह फंड एलएलसीकडून ५३८५५७ पर्यंत; व्हेंचरईस्ट ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून ११८०४० पर्यंत (व्हेंचरईस्ट प्रोऍक्टिव्ह फंडच्या वतीने) (सर्व मिळून समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार), झूझू सॉफ्टवेयर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून १७६५५४० पर्यंत; (समभाग विक्री करू इच्छिणारे कॉर्पोरेट), आणि कोटेश्वर राव मेदुरी यांच्याकडून ९१८०० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे व्यक्ती) (हे सर्व मिळून समभाग विक्री करू इच्छिणारे) इक्विटी समभागांचा समावेश आहे.
हे इक्विटी समभाग दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात आहेत आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. या ऑफरसाठी एनएसई हे नियुक्त करण्यात आलेले स्टॉक एक्स्चेंज आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(२) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. अँकर गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आल्यानंतर तितके इक्विटी समभाग क्यूआयबी पोर्शनमधून कमी केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड्सकडून आलेली एकूण मागणी ही जर नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील उरलेले इक्विटी समभाग नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससहित क्यूआयबीसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) उपलब्ध करवून दिले जातील. त्यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंड्सकडून आलेली एकूण मागणी ही जर नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर उरलेले इक्विटी समभाग नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर क्यूआयबीसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) उपलब्ध करवून दिले जातील. सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३२(३ए) नुसार, या नेट ऑफरमधील जास्तीत जास्त १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग ०.२ मिलियन रुपयांपेक्षा जास्त आणि १ मिलियन रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १ मिलियन रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि जास्तीत जास्त १०% भाग सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे रिटेल व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, पण यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.
सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे आहेत.