टाटा समूहातील एक उद्योग आणि ट्रेन्ट लिमिटेडचा ब्रँड असलेल्या वेस्टसाइडने आपले नवे स्टोर पुणे शहरामध्ये फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियममध्ये सुरु केले आहे
पुणे, ०६ सप्टेंबर २०२३: भारतातील एक महान उद्योगसमूह टाटा परिवारातील सदस्य असलेल्या वेस्टसाइडने आपले नवे स्टोर पुणे शहरामध्ये सुरु केले आहे. फॅशनबाबत विशेष चोखंदळ असलेल्या पुणेकरांसाठी वेस्टसाइडने पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम, सर्व्हे नंबर १३२/२३, सयाजी हॉटेलच्या मागे, वाकड येथे आपले नवे स्टोर सुरु केले आहे. वेस्टसाइडचे हे नवे स्टोर तब्बल २०,००० चौरस फुटांचे आहे. प्रसंग, दिवस कोणताही असो, त्याला साजेशी स्टाईल अगदी सहजपणे करता यावी यासाठी या नवीन स्टोरमध्ये कपडे, ऍक्सेसरीज, कॉस्मेटिक्स आणि फूटवेयरचे वेस्टसाइडचे जवळपास सर्व ब्रँड एकाच ठिकाणी, अगदी सहज खरेदी करता येतील असे उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.
आपल्या ग्राहकांना असामान्य रिटेल अनुभवासह फॅशनच्या सर्वात नवीन व आधुनिक ट्रेंड्सचा लाभ, अतिशय सहजसोप्या किमतींना उपलब्ध करवून देण्याचा वेस्टसाइड ब्रँडचा उद्देश या नवीन स्टोरमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करण्यात आला आहे. आपल्या ग्राहकांना मनोसोक्त खरेदी अगदी सहजपणे करता यावी यासाठी या स्टोरमध्ये सर्व उत्पादने अतिशय आकर्षक व ग्राहकांसाठी सोयीस्कर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहेत. विस्कळीतपणाचा लवलेश नसलेले, सुबक डिस्प्ले हे वेस्टसाइडचे वैशिष्ट्य आहे. या सर्व उत्पादनांमधून सध्याची सर्वात नवी फॅशन ठळकपणे दर्शवण्यात येते. अनोख्या स्टाईलबरोबरीनेच नावीन्याबाबत देखील वेस्टसाइड विशेष जागरूक आहे, त्यांचे कलेक्शन दर तीन आठवड्यांनी शुक्रवारी रिफ्रेश केले जाते.
चला तर मग, फॅशनमध्ये सर्वात आवडती लेबल्स याठिकाणी आहेत, तुम्हाला जे आवडेल ते बिनधास्त खरेदी करा कारण याठिकाणी किमती देखील सर्वोत्तम आहेत. वेस्टसाइडमध्ये भारतीय पद्धतीचे कपडे देखील वेस्टर्न वेयर इतकेच ट्रेंडी व आकर्षक आहेत. उत्साच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, प्रसंगी घालता येतील असे कपडे मिळतील. दररोजच्या एथनिक वॉर्डरोबमध्ये आधुनिकता हवी असेल तर उत्सा सर्वोत्तम आहे. ग्राहकांना अतिशय आवडणाऱ्या बॉम्बे पेसलेमध्ये समकालीन, सर्जनशील, मुक्तपणा दर्शवणारे, फ्युजन असलेले कपडे आहेत. वर्क हे कोऑर्डीनेटेड एथनिक वेयर आहे, आधुनिक, भव्य आणि सोफिस्टिकेटेड प्रसंगांसाठी हे उत्तम आहे. तर झुबा प्रीमियम डे-वेयर आहे, यामध्ये शान व आधुनिकता यांचा राजेशाही संगम आढळतो.
पार्टी-ग्लॅम आणि फॅशन यांची प्रचंड आवड असलेल्या तरुणींसाठी न्यूऑनचे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. हा तरुणाईचा ब्रँड आहे. स्मार्ट व फेमिनाईन कॅज्युअल्स हवे आहेत? तर मग एल. ओ. व्ही. खरेदी करा. कर्व्ही महिलांसाठी आरामदायी, स्मार्ट, कॅज्युअल कपडे जियामध्ये आहेत. ९ टू ९ फॅशनसाठी वॉर्डरोब हे वर्कवेयर अतिशय स्टायलिश, सोफिस्टिकेटेड आणि आत्मविश्वास मिळवून देणारे आहे. कॅज्युअल्सपासून फ्युजन व इंडियनपर्यंत तुम्हाला हवे त्या प्रकारचे कपडे या कलेक्शनमध्ये आहेत.
वेस्टसाइडने आपल्या पुरुष ग्राहकांचीही व्यवस्थित काळजी घेतली आहे. डब्ल्यूईएसमध्ये आहे वर्क टू वीकएंड रेन्ज, आरामदायी व शहरी लाउंज वेअरसह. मिलेनियल्स सर्वाधिक प्राधान्य देतात फॅशनला, न्यूऑन मेन हे मिलेनियल्ससाठी अतिशय विचारपूर्वक बनवण्यात आलेले स्ट्रीट-वेअर कलेक्शन आहे जो नेहमीच ट्रेंडमध्ये असते. एथनिक टच असलेले रिलॅक्स्ड अर्बन वेयर हवे असेल तर ई.टी.ए. मध्ये मिळेल. आधुनिक एथनिक शैलीने प्रेरित असलेले हे कलेक्शन अधिक जास्त भारतीय, कलात्मक आहे.
स्टुडिओ वेस्टमध्ये भारतीय महिलांबरोबरीनेच पुरुषांसाठी देखील सौंदर्य उत्पादनांची विशेष श्रेणी प्रस्तुत करण्यात आली आहे. कॉस्मेटिक्स, फाईन फ्रॅग्रन्स व मिस्ट, शानदार बाथ अँड बॉडी उत्पादने यांची विशाल श्रेणी असलेली ही कॉस्मेटिक लाईन आधुनिक, सर्जनशील आहे. आत्मविश्वासी, स्वतःला अभिव्यक्त करणे ज्यांना आवडते अशा फॅशनेबल व्यक्तीसाठी ही कॉस्मेटिक श्रेणी उत्तम आहे.
वेस्टसाइडच्या किड्स वेयरमध्ये फॅशन व उपयुक्तता यांचा परिपूर्ण मिलाप घडवून आणला गेला आहे. अतिशय सुंदर, ट्रेंडी कपड्यांचे हे कलेक्शन लहान मुलांमधील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. मोहक ड्रेसेस, स्टायलिश टॉप्स, आरामदायी नीटवेयर व वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील असे बॉटम्स, यांचे विविध प्रसंगी वापरता येतील अशा कपड्यांचे सुंदर कलेक्शन वेस्टसाइडने प्रस्तुत केले आहे.
आराम व स्टाईल मिळवून देणारे वेस्टसाइडचे फूटवेयर कलेक्शन खरोखरीच आकर्षक आहे. कॅज्युअल स्नीकर्स, शानदार हील्स, स्टर्डी बूट्स आणि स्पोर्टी सँडल्स यांच्यापैकी काहीही हवे असेल तरी वेस्टसाइडमध्ये मनाजोगती खरेदी होऊ शकते. आत्मविश्वासाने चालण्याचा आनंद मिळवायचा असेल तर वेस्टसाइडचे फूटवेयर कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवे.
तुम्हाला खरेदीचा जास्तीत जास्त अनुभव घेता यावा यासाठी वेस्टस्टाईलक्लब मेम्बरशिप आहे, आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि वाढदिवसानिमित्त भेटी मिळवून देण्यासाठी वेस्टसाइडने हा उपक्रम प्रस्तुत केला आहे.