नवी दिल्ली: सोनीने आज नवीन व्लॉग कॅमेराझेडव्ही -१ एफ (ZV-1F) बाजारात आणला. सर्जनशीलता, सुलभ व्लॉगिंग फंक्शन्स, अत्याधुनिक प्रगत कनेक्टिव्हिटी आणि इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये यांनी भरलेला आणि ज्यांना आकर्षक फोटो आणि व्हिडिओ टिपायचे आहेत अशा व्लॉगर्स आणि कंटेंट निर्मात्यांद्वारे उत्तम परिणामांसाठी सर्रास वापरला जाईल असा (गो-टू) नवीन कॅमेरा आहे. आशयाला (कंटेंट) एकदम खास व वेगळे बनवण्यासाठी या पॉकेटच्या आकाराच्या कॅमेऱ्याला सोनीच्या नवीनतम तंत्रज्ञानासह व्लॉगिंगसाठी सानुकूल करण्यात आले आहे.
सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग व्यवसाय प्रमुख श्री. मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “झेड व्ही-१ एफ (ZV-1F) हा एक पुढील पिढीच्या कंटेंट निर्मात्यांचा व्लॉगिंग अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. उच्च गुणवत्तेच्या कंटेंटच्या सतत वाढणाऱ्या मागणीमुळे निर्मात्यांना जो उत्कृष्ट दर्जाचे परिणाम देईल आणि त्याचबरोबर वापरण्यास सोपे देखील असेल आणि खास करून ज्यामधून कंटेंट वायरलेस पद्धतीने सामाईक करता येईल अशी सर्व वैशिष्ठ्ये एकत्रित एका कॅमेऱ्यात मिळतील अश्या (all–in–one) कॅमेऱ्याची गरज आहे, आम्ही झेड व्ही-१ एफ (ZV-1F) मध्ये इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये देखील समाविष्ट केली आहेत, ज्याचा उद्देश शून्य पर्यावरणीय पाऊलखुणा (झिरो एनवायरमेंटल फूटप्रिंट) साध्य करणे आहे कारण शाश्वतता हे सोनीच्या मुख्य लक्ष्य केंद्रांपैकी एक क्षेत्र आहे.”
किंमत आणि उपलब्धता:
झेडव्ही -१ एफ (ZV-1F) संपूर्ण भारतभर ५ एप्रिल २०२३ पासून सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.
मॉडेल | किंमत (रुपयांमध्ये) | उपलब्धता |
झेडव्ही -१ एफ (ZV-1F) | ५०,६९०/- | ५ एप्रिल २०२३ पासून |