पुणे: बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे हिच्या हस्ते आज सीझन्स मॉलमधील मॅक्स स्टोर येथे मॅक्स सेलिब्रेटस् इंडिया’ फेस्टिव्हल कलेक्शन 2016चे उद्घाटन झाले. मॅक्सच्या तविशाकलेक्शनची वेशभूषा केलेल्या मुग्धाने;होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या मुलांसोबत रॅम्पवॉक केला. यावेळी ती अत्यंत आकर्षक दिसत होती.मॅक्सस्टोरमध्ये चाहत्यांमध्ये व उत्सवाची खरेदी
करणाऱ्यांमध्ये यावेळी याचीच चर्चा होती.
उद्घाटनाच्या या कार्यक्रमात मुग्धा गोडसे म्हणाली, “उत्सवाच्या मोसमातील उत्साह आणि रंग हे मला नेहमीच आवडत आलेले आहेत. मॅक्सचा नवीनतम फेस्टिव्हल कलेक्शन हा उत्सवातील सर्वच गोष्टींचे साकार रूप आहे. ‘तविशा कलेक्शन’ हे माझे अत्यंत आवडीचे असून ते आधुनिक महिलांच्या पारंपरिक
वेशभूषेच्या सर्व गरजा स्टाईलशी तडजोड न करता पूर्ण करते.”
मॅक्स फॅशन इंडियाचे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. पियुष शर्मा म्हणाले,मॅक्स फॅशनचे नवीनतम फेस्टिव्हल कलेक्शन पुण्यात सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. पुणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून येथील लोक फॅशनच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहेत. सणासाठीच्या वेशभूषांद्वारे
आमच्या ग्राहकांना आम्ही प्रभावित करू, अशी आम्हाला आशा आहे. सणासाठीची खरेदी आणखी संस्मरणीय व्हावी, यासाठी या वर्षी मॅक्स;च्या वतीने संजीव कपूर विरासत कलेक्शन भेटवस्तूंची ऑफरही देण्यात येत आहे.”
उत्सवाच्या निमित्ताने मॅक्स फॅशन विरासत कलेक्शनची मर्यादित आवृत्तीची एक्स्लुजिव्ह ऑफर देत आहे. जयपूर येथील रॉयल सिटी पॅलेस येथील झरोखा (खिडक्या) आणि पानांच्या सजावटीने प्रेरित असलेल्या विरासत कलेक्शनमध्ये भारतातील प्रख्यात शेफ संजीव कपूर यांनी तयार केलेल्या उच्च प्रतीच्या कॉफी
मग, कप आणि बशांचा समावेश आहे.मॅक्स फॅशन आपल्या मौल्यवान ग्राहकांना 3499 रुपयांच्या खरेदीवर कॉफी मगची एक जोडी देऊ करत आहेत.मॅक्सयेथे सणाची खरेदी करणाऱ्यांना 6,999 रुपयांच्या कोणत्याही खरेदीवर 4 कप आणि बशांची मर्यादित आवृत्ती असलेले सुंदर विरासत कलेक्शन भेट मिळेल.
मॅक्सच्या फेस्टिव्हल कलेक्शनद्वारे सणांच्या खरेदीला एक राजेशाही स्पर्श मिळतो. फुलकारी एम्ब्रॉयडरीने प्रेरित असलेली विविध भारतीय परिधाने, अलंकृत ब्रॉकेडस् ते नाट्यमय बारोक व हातमाग याद्वारे या कलेक्शनमध्ये कुटुंबातील सर्वांसाठी खास वस्तू मिळतात. ‘तविश’. यात सुंदर चंदेरी, कलात्मक रेशमी आणि ब्रॉकेडची विपुल एम्ब्रॉयडरी असलेल्या कुर्त्यांपासून बंडी, जॅकेट एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. उजळ रंगातील घेरदार स्कर्ट, पारंपरिक अनारकली, रत्नजडीत टोन्ड् क्रॉप टॉप, जोमदार रंगांतील थरांचे कुर्ते आणि मॅक्सी ड्रेस हे आपला वार्डरोब उजळण्याचा परिपूर्ण मार्ग होय. मुलांसाठीच्या उत्साहदायक पारंपरिक कलेक्शनमध्ये सुंदर चंदेरी लेहंगा-चोळी, मॅक्सी ड्रेस आणि मॅजेंटा, जोमदार नारंगी आणि एमेराल्ड रंगातील आनंददायक
ब्रॉकेड यांचा समावेश आहे.
मॅक्सबद्दल
मॅक्स हा आघाडीचा फॅशन ब्रँड असून त्यात ग्राहकांना संपूर्ण कुटुंबासाठी कपडे, संबंधित साहित्य आणि पादत्राणे एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. लँडमार्क ग्रुपचा फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्सने देशात ‘किफायती किमतीत नवीनतम फॅशन’ ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय फॅशन व दर्जाच्या बाबतीत
चोखंदळ ग्राहकांना व्यापक पर्याय उपलब्ध होतात. नवीनतम फॅशन ट्रेंडचे परिधान, पादत्राणे आणि संबंधित साहित्य येथे मिळतात. स्टोरमध्ये आंतरराष्ट्रीय खरेदीचे वातावरण मिळत असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाकरिता
खरेदी हा एक आनंद देणारा अनुभव ठरतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅक्सचे 16 देशांमध्ये 350 दुकाने असून भारतात मॅक्सचे 60 शहरांमध्ये 150 हून अधिक दुकाने आहेत. आर्थिक वर्ष 2016-17 च्या अखेरपर्यंत भारतात 190 दुकानांचे जाळे निर्माण करण्याची या ब्रँडची योजना आहे.