१२९ टक्क्यांची वाढ; सप्टेंबर २०२२मध्ये यूटिलिटी वाहनांची ३४,२६२ युनिट्सच्या विक्रीमुळे एसयूव्ही बाजारात पहिला क्रमांक
• १२९ टक्के वाढीसह ६४,४८६ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री, क्यू२-एफ२२ मध्ये १७९,६७३ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ७७ टक्के वाढ.
• एयसूव्ही सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर, एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३४,२६२ इतकी एसयूव्हींची विक्री, सप्टेंबर २१च्या तुलनेत १६६ टक्क्यांची वाढ
• इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची ४,०७१ युनिट्स इतकी आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री, सप्टेंबर २१च्या तुलनेत १७० टक्क्यांची वाढ
मुंबई, ४ ऑक्टोबर, २०२२ : भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ (एम अँड एम लि.) या कंपनीने आज सप्टेंबर २०२२ या महिन्यात झालेल्या आपल्या एकूण विक्रीची आकडेवारी जाहीर केली. महिंद्राच्या युटिलिटी व्हेइकल्स सेगमेंटने या महिन्यात ३४,२६२ एसयूव्ही इतकी सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री १६६ टक्क्यांनी वाढलेली असून यामुळे ही कंपनी या उद्योगातील पहिल्या क्रमांकाची उत्पादक बनली आहे. एकूणच, कंपनीच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाने १२९ टक्क्यांची वाढ साध्य करीत ६४,४८६ वाहनांची सर्वोच्च मासिक विक्री नोंदवली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत ७७ टक्क्यांची वाढ साधत कंपनीने १७९,६७३ वाहनांची सर्वाधिक तिमाही विक्री केली आहे. या महिन्यात २,५३८ वाहनांची निर्यात झाली. व्यावसायिक वाहन श्रेणीत ‘महिंद्रा’ने ऑगस्ट २०२२ मध्ये २१,६६६ वाहने विकली.
‘एमअँडएम’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख वीजय नाकरा यांच्या मते, “सप्टेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आणि त्यामुळे हा महिना अतिशय रोमांचक होता. एसयूव्ही, ३.५ टनांहून कमी क्षमतेची एलसीव्ही आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत मालवाहतूक करणाऱे आमचे इतर ब्रॅंड्स या आमच्या उत्पादनांच्या विविधांगी पोर्टफोलिओला खूप मोठी मागणी आहे. सप्टेंबर महिन्यात आमच्या एसयूव्ही वाहनांची विक्री सर्वाधिक, म्हणजे ३४,२६२ युनिट्स इतकी झाली, तसेच इतर सर्व वाहने मिळून या महिन्यात विक्रीचा आकडा ६४,४८६ इतका आतापर्यंतचा सर्वोच्च असा झाला, याचा आम्हाला आनंद आहे.”
प्रवासी वाहने विक्री गोषवारा (देशांतर्गत) – सप्टेंबर २०२२ | ||||||
श्रेणी | सप्टेंबर | सप्टेंबरपर्यंत | ||||
एफ-२३ | एफ-२२ | फरक (टक्के) | एफ-२३ | एफ-२२ | एफ-२२ | |
यूटिलिटी वाहने | ३४,२६२ | १२,८६३ | १६६% | १६७,०५२ | ९२,०१६ | ८२% |
कार्स*+ व्हॅन्स | २४६ | २७१ | – ९% | १,६७१ | १,३३९ | २५% |
प्रवासी वाहने | ३४,५०८ | १३,१३४ | १६३% | १६८,७२३ | ९३,३५५ | ८१% |
*उपरोक्त देशांतर्गत विक्रीमध्ये उपकंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या विक्रीचाही समावेश.
व्यावसायिक वाहने व तीनचाकी विक्रीचा गोषवारा (देशांतर्गत) – सप्टेंबर २०२२ | ||||||
श्रेणी | सप्टेंबर | सप्टेंबरपर्यंत | ||||
एफ-२३ | एफ-२२ | फरक (टक्के) | एफ-२३ | एफ-२२ | फरक (टक्के) | |
एलसीव्ही < २ टन | ४,४५२ | १,५२५ | १९२% | २१,६०८ | १३,०९५ | ६५% |
एलसीव्ही २ टन – ३.५ टन | १६,४१३ | ७,२५९ | १२६% | ९७,२६० | ५४,४२२ | ७९% |
एलसीव्ही > ३.५ टन + एमएचसीव्ही | ८०१ | ६८४ | १७% | ४,२०८ | २,४९२ | ६९% |
तीनचाकी (इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससह) | ५,७७४ | २,९८१ | ९४% | २५,५८० | १०,७८५ | १३७% |
निर्यात – ऑगस्ट २०२२ | ||||||
श्रेणी | सप्टेंबर | सप्टेंबरपर्यंत | ||||
एफ-२३ | एफ-२२ | फरक (टक्के) | एफ-२३ | एफ-२२ | फरक (टक्के) | |
एकूण निर्यात | २,५३८ | २,५२९ | ०% | १५,७५६ | १४,३७९ | १०% |