विक्रीमध्ये 28 टक्क्यांची वाढ
मुंबई, 1 ऑगस्ट, 2020 : 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि. या कंपनीच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे (एफइएस) जुलै 2020 या महिन्यातील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी आज घोषित करण्यात आली. तीनुसार, जुलै 2020 मध्ये या ब्रॅंडचे 24,463 इतके ट्रॅक्टर देशात विकले गेले. 2019 च्या जुलैमध्ये ही संख्या 19,174 होती. जुलै 2020 मध्ये ट्रॅक्टरची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) 25,402 इतकी होती. मागील वर्षी याच काळात ती 19,992 होती. जुलै 2020 मध्ये 939 इतक्या ट्रॅक्टरची निर्यात झाली.
या कामगिरीबद्दल टिप्पणी करताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’चे ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रेसिडेंट हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही जुलै 2020 मध्ये देशांतर्गत बाजारात 24,463 ट्रॅक्टर विकले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीत 28 टक्के वाढ झाली आहे. जुलै या महिन्यातील ही आमची सर्वात जास्त झालेली विक्री आहे. या महिन्यात मागणी जोरदार होती. शेतकऱ्यांकडील पैशाची उपलब्धता, खरिपाची जास्त पेरणी, जून व जुलैमध्ये वेळेवर झालेला व सामान्य स्वरुपातील मान्सून आणि सरकारने ग्रामीण भागातील खर्चात केलेली वाढ यांमुळे सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काही राज्यांमध्ये अजूनही स्थानिक स्तरावर टाळेबंदी, तसेच ‘कोविड-19’चा विशिष्ट पुरवठादारांच्या कामावर परिणाम, यांमुळे या महिन्यात अनेक आव्हाने उभी राहिली. मात्र बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम टिकून पुढील काही महिन्यांमध्ये ट्रॅक्टरला मागणी जोरदार राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाजारामध्ये आम्ही 939 ट्रॅक्टर विकले आहेत, त्यातही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे.’’
फार्म इक्विपमेंट सेक्टर (एफडी + एसडी + ग्रोमॅक्स) | ||||||
जुलै | संचयित जुलै | |||||
वर्ष 20 | वर्ष 21 | वाढ (टक्के) | वर्ष 20 | वर्ष 21 | वाढ (टक्के) | |
देशांतर्गत विक्री | 19174 | 24463 | 28 | 102087 | 89040 | उणे 13 |
निर्यात | 818 | 939 | 15 | 4255 | 2019 | उणे 53 |
एकूण | 19992 | 25402 | 27 | 106342 | 91059 | उणे 14 |
*निर्यातीमध्ये सीकेडी समाविष्ट
’महिंद्रा’बद्दल
महिंद्रा समूह हा 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे. हा समूह लोकांना नवीन समृद्ध ’मोबिलिटी सोल्यूशन्स’ देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान वाढविण्यास मदत करतो. नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो. भारतात युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे. महिंद्र ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपारीक उर्जा, कृषी व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे. भारतातच मुख्यालय असलेला महिंद्र उद्योग समूह 100 देशांमध्ये 2,56,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देतो.