रस्तेवाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उद्योग विभागातील ‘एमएसएमई’चे संचालक पी. एम. पार्लेवार यांच्या हस्ते ‘बूस्टर डिझेल’ या ‘नवांकुर इन्फ्रानर्जी मोबाईल इंधन पंपा’चे उद्घाटन
· इंधन प्रत्यक्ष वापरणाऱ्यांची घरपोच डिझेल वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी बूस्टर डिझेल देईल संपूर्ण नागपुरात सेवा.
· रेपोज मोबाईल बाऊजर सोल्यूशन’मुळे विक्रेते व ग्राहक या दोघांनाही इंधन वितरण प्रक्रिया अखंडीत व सुरक्षित पद्धतीने मिळते. आयओटी तंत्रज्ञानामुळे या ‘बाऊजर सोल्यूशन’ला एक नावीन्यपूर्ण उत्कृष्टतेचे स्वरूप..
· भारतातील २२०हून अधिक शहरांमध्ये १५००हून अधिक भागीदारांच्या माध्यमातून, २५००हून अधिक रेपो मोबाईल पेट्रोल पंपांद्वारे ‘रेपोज’ची सेवा उपलब्ध.
· रेपोज एनर्जीने विकसित केलेले पूर्णपणे बिल्ट फ्युएल बाउझर महिंद्रा फ्युरिओ श्रेणीच्या हलक्या आणि मध्यम व्यावसायिक वाहनांवर उपलब्ध.
· हलक्या व मध्यम ट्रकची श्रेणी असलेली ‘महिंद्रा फ्युरिओ’ वाहने ही खास भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पिनिनफारिना’ने डिझाइन केली आहेत. जागतिक दर्जाचे डिझाइन आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी, सर्वात सुरक्षित, सर्वात अर्गोनॉमिक आणि आरामदायक केबिन अशा वैशिष्ट्यांमुळे या श्रेणीने नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. जास्त मायलेजची हमी आणि उत्पादनाचे इतर श्रेष्ठ गुणधर्म यांमुळे या श्रेणीला एका संपूर्ण बिझनेस सोल्यूशनचे स्वरूप लाभले आहे.
नागपूर, २५ मे, २०२२ : इंधनाचे घरपोच वितरण हे मॉडेल देशभरात झपाट्याने विकसित झाले आहे आणि कोविडनंतरच्या काळात ते आणखी वेगाने वाढले आहे. जागतिक पुरवठा साखळी आणि इंधन व्यापाराचे अर्थशास्त्र, विद्यमान वितरण मॉडेलची संरचनात्मक मर्यादा, ग्राहकांची बदलती खरेदी वर्तणूक आणि तांत्रिक व्यत्यय अशा अनेक घटकांमुळे हे मॉडेल विकसीत झाले आहे. इंधन प्रत्यक्षात वापरणाऱ्या नागपुरातील ग्राहकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, नवांकुर इन्फ्रानर्जीने आपला मोबाईल इंधन पंप – ‘बूस्टर डिझेल’ – सादर केला आहे. या मोबाईल इंधन पंपाचे उद्घाटन रस्तेवाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी, तसेच उद्योग विभागातील एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नवांकुर इन्फ्रानर्जीचे संचालक नचिकेता पांडे म्हणाले, “इंधनाचे प्रत्यक्ष वापरकर्ते आणि उद्योग क्षेत्र यांची घरपोच इंधन पोचवण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी बूस्टर डिझेल हे इंधन बाऊझर संपूर्ण नागपुरात सेवा देण्यास सज्ज आहे. हा बाऊजर ‘महिंद्रा फ्युरिओ ११’ या ट्रकवर बसविण्यात आला आहे. तो दुहेरी वितरण करणारा ‘अल्फा मोबाईल इंधन पंप’ आहे. हा मोबाइल इंधन बाउझर पुण्यातील ‘रेपोज एनर्जी’ या कंपनीने तयार करून आम्हाला पुरविला आहे. ‘डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरी’ हा उपक्रम एक कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधा निर्माण करेल आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिझेल पुरविण्याची एक कायदेशीर व ग्राहकाभिमुख यंत्रणा उभी राहील.”
“महिंद्रा’ आणि ‘रेपोज’च्या भागीदारीत आम्ही या प्रदेशात मोबाईल इंधन वितरणामध्ये आमची उपस्थिती आणखी वाढवू”, असे नवांकुर इन्फ्रानर्जीचे संचालक महेंद्र निलावार यांनीही म्हटले.
घरपोच इंधन वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी ‘रेपोज एनर्जी’ने हलकी व मध्यम व्यावसायिक श्रेणीची वाहने वापरण्याचे ठरविले असून त्याकरीता ‘फ्युरिओ ट्रक’ उपयोगात आणण्यासाठी ‘महिंद्रा’शी करार केला आहे.
या प्रसंगी बोलताना,’ रेपोज एनर्जी’चे सह-संस्थापक चेतन वाळुंज म्हणाले, “फिरत्या सुविधांच्या सहाय्याने सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दिशेने संपूर्ण जग वाटचाल करीत असताना, भारतातही डिझेलचे वितरण ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. मोबाईल पेट्रोल पंपांद्वारे डिझेलचे वितरण करणे ही आमची एक मोठी कामगिरी आहे. ‘फ्युएल बाउझर’च्या उपयोजनेसाठी ‘महिंद्रा फ्युरिओ’तर्फे आम्हाला उत्कृष्ट आणि अत्यंत उपयुक्त असे उत्पादन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो आणि भविष्यात सर्व प्रकारच्या ऊर्जा साधनांच्या वितरणात क्रांती आणू शकतो, असा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे.”
या प्रसंगी बोलतांना, ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’मधील व्यापारी वाहन विभागाचे व्यवसाय प्रमुख जलज गुप्ता म्हणाले, “अनेक उद्योगांमध्ये डिझेलचा बराच खप होत असतो. तेथे डिझेल एकदम व मोठ्या प्रमाणात लागत असते. हे उद्योग बॅरल्स आणि बाउझर्स यांसारख्या अयोग्य साधनांचा वापर करून पंपांवरून डिझेल खरेदी करतात. यामध्ये गळती, चोरी, डेड मायलेज अशा प्रकारांतून डिझेल वाया जाते, तसेच मनुष्यबळावर मोठा खर्चही होतो. त्यामुळे या उद्योगांचे मोठे नुकसान होते. ‘फ्युएल बाऊझर’ व्यवसायामधील ‘रेपोज एनर्जी’च्या कौशल्याची जोड घेऊन, आम्ही या उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्रउभारणीत आमचे योगदान देण्यासाठी आकर्षक स्वरुपाचे उत्पादन सादर करीत आहोत. ‘महिंद्रा’च्या व्यापारी वाहनांच्या श्रेणीतील हलक्या व मध्यम स्वरुपाच्या गाड्यांमध्ये काही विशेष गुणधर्म आहेत. या गाड्या ‘फ्युएल बाउझर’च्या कामासाठी अगदी योग्य व फायदेशीर ठरणार आहेत. आम्ही नवांकुर इन्फ्रानर्जीचे अभिनंदन करतो, कारण ते इंधन उद्योजक आहेत आणि भारताच्या ऊर्जा वितरण क्षेत्रात कार्यक्षमता आणण्यासाठी आपले योगदान देत आहेत.”