मुंबई, ८ जुलै २०२१: भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आणि व्हॉल्युमच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने सुप्रो प्रॉफिट ट्रक्सची नवी श्रेणी आज बाजारपेठेत दाखल केली. अतिशय यशस्वी ठरलेल्या सुप्रो प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेली ही कार्गो मूव्हरची नवी श्रेणी किफायतशीर, अधिक जास्त शक्तिशाली असून याची वजन वाहून नेण्याची क्षमता अधिक जास्त आहे, त्याबरोबरीनेच मायलेज देखील जास्त देते. या श्रेणीची ही सर्व दर्जेदार व दमदार वैशिष्ट्ये ग्राहकांना त्यांच्या साहाय्याने नफा देखील अधिक जास्त मिळेल याची पुरेपूर हमी देतात.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सीईओ श्री. वीजय नाक्रा यांनी सांगितले, “सुप्रो हा आमच्या ग्राहकांकडून प्राधान्य दिला जाणाऱ्या छोट्या व्यावसायिक वाहन प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. कार्यक्षमता आणि अभियांत्रिकी क्षमता यामुळे ग्राहकांना सुप्रो आवडतो. नवे सुप्रो प्रॉफिट ट्रक सादर करून आम्ही ग्राहकांच्या लाभ कमावण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करत उत्पादन मूल्यामध्ये लक्षणीय वृद्धी घडवून आणली आहे. किंमत स्पर्धात्मक असून देखील सुप्रो प्रॉफिट ट्रक या श्रेणीतील आघाडीची कामगिरी बजावतात, इंधन बचत क्षमता उत्तम आहे आणि यामध्ये डिझेल व सीएनजी पॉवरट्रेन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. मला पक्की खात्री आहे की, आमूलाग्र बदल घडवून आणण्याबरोबरीनेच ही श्रेणी आमच्या ग्राहकांना वृद्धी व समृद्धी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यात मोलाची भूमिका बजावेल.”
सुप्रो प्रॉफिट ट्रकसोबत आकर्षक आर्थिक साहाय्य पर्याय देखील देण्यात येत आहेत. ग्राहकांना ५ वर्षांपर्यंत कालावधीसाठी कर्ज उपलब्ध होऊ शकतील, आयआरआर १२.९९% पासून पुढे इतका कमी असल्याने कर्ज परतफेडीच्या मासिक हफ्त्याची रक्कम कमी करण्यात मदत होईल. ग्राहकांना सुप्रो प्रॉफिट ट्रकवर १००% पर्यंत कर्ज देखील घेता येईल.
महाराष्ट्रातील चाकण येथील महिंद्राच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये तयार करण्यात येणाऱ्या सुप्रो प्लॅटफॉर्मवर अनेक काटेकोर परीक्षणे करण्यात आली असून त्यामध्ये कामगिरी, सुरक्षा आणि विश्वसनीयता या सर्व निकषांवर सुप्रो प्रमाणित ठरला आहे. महिंद्रा ब्रँडच्या विश्वसनीयतेचे पाठबळ असलेल्या सुप्रोमध्ये दमदार एसी, मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि या श्रेणीतील सर्वोत्तम ३ वर्षांची / ८०,००० किमीपर्यंतची (यापैकी जे आधी संपेल तोपर्यंतची) वारंटी देखील मिळते.
सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनी
अतुलनीय कामगिरी
सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीमध्ये महिंद्राचे शक्तिशाली डायरेक्ट इंजेक्शन (डीआय) डिझेल बीएस-६ इंजिन आहे जे १९.४ केडब्ल्यू शक्ती देते आणि उत्तम पिक अप व ऍक्सिलरेशन देते. ४-स्ट्रोक, २-सिलिंडर ९०९ सीसी डिस्प्लेसमेंट इंजिन ५५ एनएम टॉर्कला २६ एचपी शक्ती निर्माण करते. यामध्ये ४-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीमध्ये इंधन बचत करणारे फ्युएल स्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामध्ये पॉवर आणि इको असे दोन मोड आहेत, जे एका लिटरमध्ये तब्बल २३.३० किमी इतके या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देते.
सर्वात जास्त वजन वाहून नेताना देखील या श्रेणीतील सर्वाधिक मायलेज आणि कामगिरी
सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीमध्ये १३ इंचांचे टायर्स असून ग्राउंड क्लियरन्स तब्बल १७० एमएम आहे. त्यामुळे याच्या संपूर्ण क्षमतेइतके वजन वाहून नेताना देखील हा ट्रक अधिक जास्त कामगिरी आणि अधिक जास्त पिकअप देतो.
सीएनजी पर्याय
सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. यामध्ये शक्तिशाली २०.०१ केडब्ल्यू (२७बीएचपी) इंजिन आहे जे ६० एनएम टॉर्क आणि २३.३५ किमी/किलो इतके उत्तम मायलेज देते. या श्रेणीतील सर्वात जास्त ७५० किलो पेलोड आणि ३ वर्षे किंवा ८०,००० किमी पर्यंतची या श्रेणीतील सर्वोत्तम वॉरंटी देखील सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीसोबत मिळते.
आराम व सुविधा
सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनीमध्ये नवे ट्रान्समिशन आहे ज्यामुळे गियर शिफ्टिंग कारमध्ये ज्याप्रकारे असते तसे करता येते. त्यामुळे गाडी चालवताना दमणूक कमी होते व ग्राहक अधिक लांबवरच्या ट्रिप्स करून अधिक जास्त कामे व कमाई करू शकतात.
या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा
२२० एमएमचे प्रचंड मोठे फ्रंटल नोज डिझाईन असल्यामुळे समोरून काही अपघात झाल्यास गाडीचे कमीत कमी नुकसान होते अशाप्रकारे सुप्रो प्रॉफिट ट्रक मिनी उच्च स्तराची सुरक्षा देतो. याची बॉडी अतिशय मजबूत असल्यामुळे सर्वात दुष्कर भूप्रदेशांमध्ये देखील हा अगदी आरामात चालवता येतो.
सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सी
नवीन सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सीमध्ये १०५० किलो इतके अधिक जास्त पेलोड, अधिक मोठे आर१४ टायर्स, १९६ एमएमचा जास्त ग्राउंड क्लियरन्स व संपूर्णतः नवीन ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
दमदार, प्रभावी कामगिरी
सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सीमध्ये महिंद्राचे शक्तिशाली डायरेक्ट इंजेक्शन (डीआय) टर्बो डिझेल बीएस-६ इंजिन आहे जे ३५.४ केडब्ल्यू, ४७ एचपी व १०० एनएम टॉर्क देते. इतकी दमदार कामगिरी बजावून देखील सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सीचे मायलेज या श्रेणीतील सर्वात जास्त म्हणजे २१.९४ किमी/लिटर इतके जास्त आहे. हा ट्रक दिसायला कॉम्पॅक्ट असला तरी ८.२ फीट कार्गो बॉक्समधील याची वजन वाहून नेण्याची क्षमता १०५० किलो आहे. त्यामुळे सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सी कमी संचालनात्मक खर्चात देखील अधिक जास्त वजनाच्या मालाची ने-आण करू शकतो. त्यामुळे कमीत कमी वेळात अधिक जास्त काम होते व मालकांचा नफा वाढतो.
श्रेणीतील सर्वोत्तम आराम आणि सुविधा
सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सीची डे केबिन अतिशय आरामदायी आहे यामध्ये डेक बॉडी कार्गो पर्याय देखील उपलब्ध आहे. एअर कंडिशनिंग, पॉवर स्टीयरिंग यासारखी वैशिष्ट्ये देखील यामध्ये असल्याने हा ट्रक आपल्या इतर स्पर्धक गाड्यांच्या तुलनेत अधिक जास्त आरामदायी आणि ड्राइव्ह करण्याच्या दृष्टीने सहजसोपा बनला आहे. यातील नवीन ट्रान्स्मिशनमुळे एखाद्या कारप्रमाणे गियर शिफ्ट यामध्ये आहे. सहाजिकच सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सी अधिक जास्त सहजतेने चालवता येतो, दमणूक कमी होते, याच्या साहाय्याने अधिक लांबवरच्या, अधिक जास्त ट्रिप्स करता येतात, ज्यामुळे अधिक जास्त कमाईच्या संधींचा लाभ घेता येतो.
सुरक्षा वैशिष्ट्ये
सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सीमध्ये ड्युएल एलएसपीव्हीसोबत एक्स स्प्लिट ब्रेक्स देण्यात आले आहेत जे अधिक चांगल्या ब्रेकिंग यंत्रणेचे लाभ देतात. ईएलआर सीट बेल्ट्स आणि २२० एमएमचे फ्रंटल नोज डिझाईन सुरक्षा देते शिवाय कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशात हा ट्रक अगदी आरामात चालवता येतो.
सुप्रो प्लॅटफॉर्म
आजच्या घडीला सुप्रो ब्रँड पॅसेंजर आणि कार्गो वाहनांची भारतातील सर्वात विशाल श्रेणी सादर करतो. वेगवेगळे बॉडी प्रकार, इंजिन पर्याय, इंधन पर्याय देणारी ८ वाहने या ब्रँडमध्ये असून ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा ती पूर्ण करतात. सुप्रो श्रेणीमध्ये शक्तिशाली व कार्यक्षम डीआय डिझेल इंजिनांचे (१९.२ केडब्ल्यू (२६ बीएचपी), (३५.४ केडब्ल्यू (४७ बीएचपी) आणि सीएनजी (१८.८ केडब्ल्यू (२६ बीएचपी) असे पर्याय उपलब्ध आहेत.
कार्गो वाहतुकीसाठी सुप्रोमधील वाहने आपल्या मालकांच्या नफ्यामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याच्या क्षमतांसाठी ओळखली जातात. म्हणूनच त्यांचे ‘प्रॉफिट ट्रक’ असे अगदी साजेसे नाव ठेवण्यात आले आहे. ‘प्रॉफिट ट्रक्स’ ची सुप्रो श्रेणी उत्तम मायलेज आणि अधिक जास्त वजन वाहून नेण्याच्या क्षमतेचे लाभ मिळवून देते आणि तरीही त्यांचा संचालनात्मक खर्च कमी असतो. सुप्रो कार्गो श्रेणीमध्ये डेकच्या लांबीमध्ये ७.५ फीट (मिनी) आणि ८.२ फीट (मॅक्सी) तसेच केबिन-बॉडी-चेसिस (सीबीसी) फॉर्म असे प्रकार उपलब्ध आहेत.
पॅसेंजर वाहतुकीमध्ये सुप्रो ब्रँड ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करणाऱ्या व्हॅन्सची भारतातील सर्वात विशाल श्रेणी सादर करतो. सेमी-हार्डटॉप आणि हार्डटॉप या प्रकारांमध्ये १०-सीटर पर्याय सुप्रो व्हॅन्समध्ये उपलब्ध आहेत. अधिक जास्त जागा, आराम व सुरक्षा यांच्याबरोबरीनेच श्रेणीतील सर्वात जास्त मायलेज असे लाभ ही वाहने आपल्या मालकांना मिळवून देतात. कौटुंबिक वापर, कंत्राटी वाहतूक, स्टेज कॅरीज, विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांची वाहतूक अशा विविध कारणांसाठी सुप्रोच्या बहुउपयोगी व्हॅन्स वापरता येतात. सुप्रो व्हॅन प्लॅटफॉर्मवर महिंद्राने सर्वाधिक किफायतशीर, फॅक्टरी फिटेड, बी प्रकारची डिझेलवर चालणारी ऍम्ब्युलन्सदेखील उपलब्ध करवून दिली आहे.