पुणे, २५ ऑगस्ट २०२२: येझदीच्या पुनरागमनासाठी श्रेणीबाबत पुनर्विचार केला जात होता तेव्हापासून जावा-येझदी मोटारसायकल्समध्ये एक विचार पक्का झाला होता – ब्रँडची सच्ची वृत्ती परत आणायची आणि ब्रँड ज्यासाठी निर्माण करण्यात आला आहे ते सर्व व इतर अनेक विचार प्रत्यक्षात साकार करणारी मॉडेल्स प्रस्तुत करायची. येझदी ऍडव्हेंचर, स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर ही मॉडेल्स म्हणजे साहस, दिलखुलास मौजमजा आणि थरार यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत.
क्लासिक लाईन्स आणि आधुनिक टचेस यांचा परिपूर्ण मिलाप असलेली, अतिशय अनोख्या स्टाईलची मोटरसायकल येझदी रोडस्टर तिच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाला उठाव देणाऱ्या, डार्क व क्रोम थीम्समधील पाच मॅट फिनिश्ड रंगांसह सादर करण्यात आली होती.
या श्रेणीची रंगत अजून जास्त वाढवण्यासाठी जावा येझदी मोटरसायकल्सने येझदी रोडस्टर रेन्जमध्ये दोन नवे रंग सादर केल्याची घोषणा आज केली. इन्फर्नो रेड आणि ग्लॅशियल व्हाईट हे दोन रंग आता रोडस्टरमध्ये उपलब्ध होणार आहेत. फ्युएल टॅन्कवर ग्लॉस फिनिश आणि संपूर्ण मोटरसायकलवर लक्षवेधी ऑब्सिडीयन ब्लॅक थीम या दोन्ही रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही रंग पॅशन स्पेक्ट्रमच्या विरुद्ध टोकांचे असले तरी प्रिमोर्डियलमध्ये इंटरलिंक्ड आहेत. रायडर्सच्या भिन्न वृत्तींना आकर्षित करेल असा हा अनोखा प्रकार आहे.

नव्या अवतारामध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन येझदी रोडस्टर जोडीचे नामकरण “फायर अँड आईस” असे करण्यात आले आहे. मने कायमची जिंकून घेण्यासाठी सुसज्ज असलेल्या आयकॉनिक मोटरसायकल प्रस्तुत करून ब्रँडने निसर्गातील प्रभावी शक्तींना नमन केले आहे. रोडस्टरचा उपजत गुणधर्म म्हणजे उत्तेजना जागृत करण्याचे काम या मोटरसायकल अतिशय खुबीने करतात. दोन्ही मोटरसायकल्सची किंमत २,०१,१४२ रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली)
रोडस्टर परिवारात दोन नव्या सदस्यांचे स्वागत करताना क्लासिक लिजेंड्सचे सीईओ श्री. आशिष सिंग जोशी म्हणाले, “आमच्या Kommuniti मध्ये रायडर्सना आकर्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये येझदी रोडस्टर हे एक लक्षणीय यश आहे. लॉन्च करण्यात आल्यापासून हे आमचे एक सर्वात लोकप्रिय मॉडेल ठरले आहे. आजवर या मॉडेलने देशभरातील कितीतरी रायडर्सना अगणित साहसांमध्ये व अनुभवांमध्ये साथ देऊन आपल्या ट्रू-ब्ल्यू रोडस्टर गुणधर्माचे पुरेपूर पालन केले आहे. इन्फर्नो रेड आणि ग्लेशियल व्हाईट या दोन नव्या रंगांनी आमच्या रोडस्टर रेन्जमध्ये नव्या ऊर्जेचा संचार केला आहे. या दोन नव्या रंगांमुळे ही श्रेणी आता अजून जास्त उठावदार दिसेल व अधिकाधिक रायडर्सना स्वतःकडे आकर्षित करेल.”
ते पुढे म्हणाले, “या मोटरसायकलमधून मिळणारा अस्सल ‘रोडस्टर‘ अनुभव हा मात्र अजिबात बदललेला नाही. येझदी रोडस्टर म्हणजे क्लासिक ‘रोडस्टर‘ मोटरसायकलचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अस्सल, रांगडा, प्रमाणबद्ध फॉर्म आणि सक्षम चेसिसमध्ये माउंट करण्यात आलेले पोटेंट इंजिन शहरांमधील गर्दीत आणि लांबलचक हायवेजवर देखील उत्तम कामगिरी बजावते.”
येझदी रोडस्टरमध्ये लिक्विड-कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड, डीओएचसी सिंगल सिलिंडर ३३४सीसी इंजिन आहे जे ७३०० आरपीएमला सर्वाधिक २९.७ पीएस पॉवर व ६५०० आरपीएमला २९ एनएम टॉर्क प्रदान करते. त्यामुळे शहरांमध्ये व हायवेजवर देखील दमदार कामगिरी बजावली जाते. या इंजिनमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन आहे ज्यामध्ये सहज सुरळीत शिफ्ट्ससाठी स्टॅंडर्ड असिस्ट अँड स्लीपर क्लच देण्यात आला आहे.
ही मोटरसायकल ड्युएल क्रेडल चेसिसवर चालते जे उत्तम ऑन-रोड मॅनर्स, सरळ रेषेत असताना तसेच कोपऱ्यांसारख्या जागेत असताना स्थिरता देते. ३२०एमएम डिस्क अप फ्रंट आणि मागे २४० एमएम डिस्क ब्रेकिंग सांभाळते व त्यासोबत कॉन्टिनेन्टलचे ड्युएल चॅनेल एबीएस आहे. या श्रेणीतील सर्वोत्तम तंत्रज्ञानामुळे फ्लोटिंग कॅलिपर्समुळे पुरेशा प्रमाणात बाईटसह ब्रेकिंगचा अनुभव हा एक आनंद ठरतो.
आरामदायी स्प्लिट सीट्स, कॉम्पॅक्ट हेडलॅम्प आणि सुबद्धरित्या पॅक करण्यात आलेला इंजिन एरिया यामुळे याच्या एकंदरीत डिझाईनला एक दृढता प्रदान केली गेली आहे. चंकी टायर्स, अलॉय व्हील्स, चॉप्ड फेन्डर्स यामुळे याचे तगडे लूक्स अधिकच उठून दिसतात. हाय कॉन्ट्रास्ट डिस्प्लेसह डिजिटल स्पीडोमीटर रायडरला सर्व महत्त्वाची माहिती पुरवतो आणि एलईडी हेडलॅम्प्स व टर्न सिग्नल्स यामुळे इल्युमिनेशन अधिक चांगले मिळते.
येझदी लाईन-अपमधील विशिष्ट उद्देशांनी तयार करण्यात करण्यात आलेल्या तीन मॉडेल्सपैकी रोडस्टर अशी मोटरसायकल आहे जी येझदीचा थरार आणि रोमांच यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सर्वांच्या नजरा केवळ यांच्यावरच खिळून राहतील असे तगडे रूप आणि सरस कामगिरी यामुळे प्रत्येक राईड अधिकाधिक दमदार करण्याची क्षमता यामध्ये आहे. जगप्रवासासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या साहसांमध्ये भाग घेण्यासाठी भरवशाची व पसंतीची साथीदार हा येझदीचा वारसा रोडस्टर पुढे चालवत आहे. साधेपणा, विश्वसनीयता आणि मजबुती यामुळे त्या काळातील डेअरडेव्हिल रायडर्सची येझदी ही ‘परफेक्ट पार्टनर इन क्राईम’ बनली होती.
येझदी रोडस्टरचा जन्म याच वृत्तीमधून झाला. आजवर या मोटरसायकलने आपल्या देशातील प्रत्येक आव्हानात्मक ठिकाणी प्रवास केला आहे. उमलिंग-ला, थारचे वाळवंट, ईशान्य भारतातील आजवर कोणीही न पाहिलेली ठिकाणे अशा अनेक ठिकाणी उत्तम कामगिरी बजावून येझदी रोडस्टरने आपल्या पूर्वजांच्या लौकिकाला साजेसे यश मिळवले आहे.