पुणे – जागतिक पातळीवरील बलाढ्य व फॉर्च्युन 500 यादीतील कंपनी ‘एनटीटी डाटा’ आपल्या ग्राहकांना यशस्वी प्रकल्प वितरणासाठी आपल्या अभिनवता कार्यक्रमाला चालना देण्याच्या हेतूने पुणे व अन्य ठिकाणच्या नवउद्योग (स्टार्ट-अप) समुदायाचा शोध घेत आहे, अशी माहिती कंपनीच्या सरमुख्यालयातील तंत्रज्ञान व अभिनवता विभागाचे प्रमुख व वरिष्ठ उपाध्यक्ष हिरोशी तोमियासु यांनी नुकतीच येथे दिली. “नवउद्योग चापल्य व अभिनवता देतात तर बडे उद्योग विकासासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करतात. ही खरोखर दोघांच्याही फायद्याची स्थिती आहे आणि अशा निवडक नवउद्योगांसमवेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) व व्हिजन ॲनॅलिटीक्स क्षेत्रात यशस्वी प्रकल्प वितरीत करुन गेली दोन वर्षे आम्ही त्याचा अनुभव घेत आहोत.”, असेही ते पुढे म्हणाले.
सुपीक अशा नवउद्योग समुदायात प्रवेश मिळवण्याच्या हेतूने ‘एनटीटी डाटा’ने ‘टीआयई पुणे’शी ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पार्टनरशिप प्रोग्रॅम’ (टीआयपीपी) या पुढाकारात सहयोग केला आहे. या उपक्रमाचे हे तिसरे सत्र आहे. यासंदर्भात श्री. तोमियासु म्हणाले, “टीआयईशी पुन्हा एकदा सहयोग करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. नवउद्योगांच्या मदतीने ग्राहकांना उत्कृष्टता देण्यात व अभिनवतेला चालना देण्यात आमची बांधीलकीही पुढचा टप्पा गाठणार आहे. नवउद्योगांना परदेशात विस्तारण्यासाठी तसेच प्राथमिक बाजारपेठांपलिकडे शोध घेण्यासाठी कंपन्यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि अशी स्थिती सर्वांसाठी फायदेशीर आहे.”
गेल्या दोन वर्षांत २० देशांतील ५०० हून अधिक नवउद्योगांनी ‘टीआयपीपी’ उपक्रमासाठी अर्ज केले असून ५० हून अधिक नवउद्योगांना ‘एनटीटी डाटा’शी सहयोगाची संधी मिळाली आहे. फ्लायबेस, डीपटेक, इन्स्पेक्टलॅब्ज आदी अभिनव नवउद्योगांनी या उपक्रमात प्रवेश मिळवून अल्पावधीतच अनेकपटींनी विकास साधला आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमात निवड झालेल्या इन्स्पेक्टलॅब्ज कंपनीचे संस्थापक देवेश त्रिवेदी म्हणाले, “टीआयपीपी हा उपक्रम आमच्यासाठी महान ठरला आहे. भारताबाहेर स्थित तंत्रज्ञान नवउद्योगांना जपान, अमेरिका व अन्य विकसीत बाजारपेठांतील जागतिक दर्जाचे ग्राहक मिळवणे खूप कठीण असते. ‘एनटीटी डाटा’चा जगभर विस्तार असल्याने त्यांनी आम्हाला योग्य अशा जागतिक ग्राहकांशी जोडून दिले. याखेरीज हा उपक्रम अगदी नवउद्योगाभिमुख आहे. त्यात तुमच्याकडून पहिल्याच दिवशी अंतिम उत्पादन सज्ज ठेवण्याची अपेक्षा केली जात नाही. बाजारपेठेत चालेल असे सुयोग्य उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्नांची पुनरावृत्ती करण्याची इच्छा दर्शविली जाते. या उपक्रमाच्या मदतीशिवाय आम्ही आमचा नवउद्योग वाढवू शकलो नसतो.”
हा सहयोग पुढील क्षेत्रात अभिनव तंत्रज्ञानांवर काम करणाऱ्या नवउद्योगांसाठी आहे.
· आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) – कॉम्प्युटर व्हिजन, एनएलपी/व्हॉइस
· क्लाऊड – पब क्लाऊड/ हायब्रीड क्लाऊड कंटेनर/मायग्रेशन
· सर्व्हिस मॅनेजमेंट – आयटीएसएम/आयटीओएम सर्व्हिसनाऊ – कन्सल्टिंग/ गॅप सोल्यूशन्स
· डाटा ॲनॅलिटीक्स – डाटा इंजिनिअरिंग बिग डाटा/स्केलेबल
· ओरॅकल एक्झाडाटा, ओडीए, मायग्रेशन सर्व्हिसेस
· एडीएम – डेव्ह/टेस्टिंग ऑटोमेशन परफॉर्मन्स मॅनेजमेंट
· आरपीए: बिझनेस प्रोसेस कन्सल्टिंग/रीइंजिनिअरिंग/इंटेलिजन्स
· सिक्युरिटी – सायबरसिक्युरिटी, आयडी मॅनेजमेंट
आपल्या प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत https://www.tiepune.org/ntt-data/ या संकेतस्थळावर
अथवा namrata@tiepune.org या ई-मेलवर पाठवा.