· नोकिया जी २१ तीन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देतो: या विभागातील इतर स्पर्धकांच्या तुलनेत दुप्पट सुरक्षा अपडेट्स, अँडरॉईड ओएस आणि ५० एमपी ट्रिपल एआय कॅमेरा सेटअप; ४+६४ जीबी आणि ६+१२८ जीबी प्रकारांमध्ये उपलब्ध
· एचएमडी ग्लोबलने फीचर फोन्स – नोकिया १०५ आणि नोकिया १०५ प्लस, स्मार्टफोन्स- नोकिया सीओ१ प्लस आणि अॅक्सेसरीज – नोकिया कम्फर्ट इअरबड्स आणि नोकिया गो इअरबड्स+ वर अनेक ऑफर देऊन आपला मोबाइल इकोसिस्टम पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.
दिल्ली: एचएमडी ग्लोबलने कमी बॅटरीच्या चिंतेशी मुकाबला करण्यासाठी तीन दिवसांची बॅटरी लाईफ असलेला नोकिया जी २१ निर्मित नोकिया सीओ१ प्लस, नोकिया १०५ आणि नोकिया १०५ प्लस हे दोन नवीन फीचर फोन यासह नोकिया कम्फर्ट इअरबड्स आणि नोकिया गो इअरबड्स+ अशा दोन नवीन ऑडिओ अॅक्सेसरीज असा परवडणाऱ्या वाजवी किमतीतील विविध उपकरणे सादर करत असल्याचे जाहीर केले आहे.
नवीन नोकिया जी २१ स्मार्टफोन रोमांचक अनुभव देतो ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन परिपूर्णपणे जगू शकता. टिकाऊपणा आणि गुणवत्ता या नोकियाच्या प्रमुख वैशिष्ट्यांना साजेसे असे याचे आकर्षक डिझाइन आहे. नोकिया जी २१ मध्ये एआय इमेजिंगसह स्नॅपी ५० एमपी ट्रिपल कॅमेरा आहे. तीन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ तो पुरवितो आणि दोन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि या विभागात दुप्पट सुरक्षा अपडेट्सची खात्री देतो. *
एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सनमीत सिंग कोचर: “नोकिया फोन्सचे माहेरघर असणाऱ्या एचएमडी ग्लोबल मध्ये आम्ही प्रत्येकासाठी सर्वोत्तम मोबिलिटी सुविधा सादर करण्यावर विश्वास ठेवतो. शक्य तितक्या जास्त लोकांना प्रिमियम स्मार्टफोनचा अनुभव देणारी स्टायलिश नॉर्डिक डिझाईन्स असलेली नोकिया जी-सिरीज ही आमची मध्यम श्रेणीची स्मार्टफोन मालिका आहे. ज्यांना निर्मिती करायला आवडते अशांसाठी कमी बॅटरीची आणि सुरक्षेची चिंता कमी करणारी अर्थपूर्ण वैशिष्ट्ये नोकिया जी २१ मध्ये आहेत. स्मार्टफोन हा त्यांच्यासाठी असतो जे केवळ गोष्टीवेल्हाळ नसतात तर काहीतरी निर्माण करणारेही असतात. त्यांना त्यांच्या जीवनातील अनुभवांचे वर्णन करायला आवडते आणि त्यासाठी त्यांना चांगला फोन आवश्यक असतो. लगेच संपणारी बॅटरी नाही तर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी असते, कमी प्रकाशातही उत्तम तपशील टिपू शकणारा कॅमेरा किंवा तुमचा डेटा सुरक्षित ठेवणारी अद्ययावत अँडरॉईड ओएस यंत्रणा हवी असते. हा असा स्मार्टफोन आहे जो नेहमी तुमच्या पाठीशी असतो.”
नोकिया जी २१ स्मार्टफोनसोबतच कंपनीने फीचर फोन्स, एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आणि वेअरेबल ऍक्सेसरीजचा समावेश असलेल्या उत्पादनांच्या श्रेणीचेही अनावरण केले. यामुळे डिव्हाइसेसच्या मध्यम श्रेणीतील एक आश्वासक ब्रँड म्हणून ब्रँडचे स्थान अधिक मजबूत होत आहे.
गेल्या वर्षभरात एचएमडी ग्लोबल मूल्यानुसार भारतात सातत्याने प्रथम क्रमांकाचा फीचर फोन ब्रँड राहिला आहे. २ जी आणि ४ जी च्या संपूर्ण श्रेणीसह फिचर फोन्स १२९९ रुपयांपासून ३७९९ रुपयांपर्यंत किमतीला आहेत. नोकिया १०५ हे जागतिक स्तरावर सर्वाधिक विकले जाणारे फीचर फोन मॉडेल आहे, जे आता सर्व-नवीन स्टायलिश डिझाइनमध्ये रीफ्रेश केले गेले आहे आणि वायरलेस एफएम रेडिओसह येते. सादरीकरणाच्या वेळी एचएमडी ग्लोबलने नवीन नोकिया १०५ + फीचर फोन देखील प्रदर्शित केला ज्यात ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि एमपी३ प्लेयर आहे आणि नोकिया सीओ १ प्लस हा लोकप्रिय एंट्री लेव्हल स्मार्टफोन मेमरी अपग्रेड सादर करतो.
अनावरण केलेल्या इतर उत्पादनांच्या मालिकेवर भाष्य करताना श्री. सनमीत सिंग कोचर म्हणाले, “एचएमडी ग्लोबलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्व किंमती विभागांमध्ये ग्राहकांना सुलभतेसह चांगला अनुभव देत आहोत. आमच्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये फीचर फोन, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि अॅक्सेसरीज विभागावर एक मजबूत लाइन अप आहे. त्यामुळे सर्वांना कनेक्टिव्हिटी साध्य होते.”
नोकिया कम्फर्ट इअरबड्स आणि नोकिया गो इअरबड्स+ हे दोन नवीन इअरबड्स देखील या सादरीकरणाच्या वेळी प्रदर्शित केले गेले.
नोकिया जी २१- असा स्मार्टफोन जो नेहमी तुमच्या पाठीशी असतो.
स्मार्टफोन्सच्या जगात नोकिया फीचर फोनचा वारसा नेताना नोकिया जी २१ उत्कृष्ट बॅटरी लाइफ पुरवते आणि बॅटरी लाइफ कमी हा ग्राहकांसाठी नेहमीच्या असलेल्या चिंतेच्या मुद्द्याला भूतकाळातील गोष्ट बनवते. तीन दिवसांच्या अतुलनीय बॅटरी लाइफसह तुम्ही चार्जरशिवाय पूर्ण वीकेंड आरामात बाहेर जाऊ शकता.
तीन वर्षांचे मासिक सुरक्षा अपडेट्स या किंमत श्रेणीतील बहुतेक स्मार्टफोन्सपेक्षा दुप्पटीहून अधिक सुरक्षा अपडेट्स सादर करतात. याचाच अर्थ नोकिया जी २१ तुमच्या सुरक्षिततेसाठी मागे राहून अखंडपणे कार्य करेल. त्यामुळे तुम्ही तुमचा दिवस चिंतामुक्त व्यतीत करू शकता.
अँडरॉईड द्वारे समर्थित फोनला दोन वर्षांसाठी अँडरॉईड ओएस अपग्रेड मिळतील. हे अँडरॉईड १२ TM साठी तयार आहे. त्यामुळे तुमच्याकडे नेहमी नवीनतम वैशिष्ट्यांचा अॅक्सेस असतो आणि तुमच्याकडे असलेला स्मार्टफोन तुम्ही जास्त काळ ठेवू शकता. .[i]
डाव्या कॅमेरा लेन्स स्टॅकसह सर्व-नवीन डिझाइन सादर करताना नोकिया जी २१ बारीक आणि अधिक अर्गोनॉमिक आहे. जी-सिरीजमध्ये प्रथमच ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटची शक्ती अनलॉक केल्याने, सुधारित रीफ्रेश दर स्क्रोलिंग आणि टायपिंगला अधिक प्रवाही बनवते आणि फोटो अधिक चांगले दिसतात. कमी प्रकाशातही सुंदर तपशील पुरवून नोकिया जी २१ चा ५०एमपी ट्रिपल-लेन्स एआय कॅमेरा अगदी व्यावसायिक फोटोग्राफी सारखे फोटो काढण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. समोरच्या बाजूला अगदी संध्याकाळच्या सेल्फीमध्ये योग्य प्रमाणात प्रकाश आणि स्पष्टता असेल याची खात्री तो करतो.
या श्रेणीतील इतर सादरीकरणे
नोकिया सीओ१ प्लस हा फीचर-पॅक्ड एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे जो बजेट सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट गोष्टी सादर करतो. नवीन २+३२ जीबी व्हेरिएंट अपग्रेड आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ किंवा चित्रपट, संगीत आणि दस्तऐवज दुप्पट प्रमाणात ठेवू शकता. फीचर फोन अपग्रेडर्ससाठी वापरण्यास सोप्या अँडरॉईड गो ओएस सह असलेला हा पहिला आदर्श स्मार्टफोन आहे. तो २४ भारतीय भाषांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्सचे पाठबळ पुरवितो. एक वर्षाची बदली हमी आणि रिलायन्स जिओ ऑफरसह अधिक परवडणारी क्षमता प्रदान करतो. त्यामुळे आता भारत कोणत्याही अडथळ्याशिवाय अधिक स्मार्ट होऊ शकतो.
नोकिया १०५ मध्ये एक भारदस्त, आधुनिक डिझाइन आहे जे तुमच्या हातात अगदी व्यवस्थित बसते, तर मूळ रंग स्क्रॅचची दृश्यमानता कमी करतो. हेडसेटशिवाय वायरलेस एफएम रेडिओमुळे जाता जाता बातम्या, खेळ आणि मनोरंजन यांचा आनंद घेता येतो. तुमचे मनोरंजन करण्यासाठी स्नेकसह प्री-लोडेड गेम्ससह देखील आहेत आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाइफ म्हणजेच तुम्ही तासनतास बोलू शकता.
नोकिया १०५ प्लस सर्वांसाठी अधिक मूल्यवर्धन, कनेक्टिव्हिटी आणि गुणवत्ता आणण्यासाठी रीफ्रेश केले आहे. फोनमध्ये मोठी 1000 mAH बॅटरी, एक समर्पित एसडी कार्ड स्लॉट, एमपी३ म्युझिक प्लेयर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंगमध्ये पॅक आहे. हेडसेटशिवाय वायरलेस एफएम रेडिओसह तुम्ही तुमचे आवडते खेळ, बातम्या आणि मनोरंजन ऐकू शकता. नोकिया १०५ प्लसचा नवीन अर्गोनॉमिक, आधुनिक अवतार आणि आटोपशीर आकार खास हाताला छान वाटावा आणि तुमच्या खिशात सहज मावावा यासाठी तयार करण्यात आला आहे. रोजच्या दिवसाला वापरताना अधिक काळ टिकावा यासाठी स्क्रॅच आणि बंप रेझिस्टंट असा बाह्य भाग तयार केला आहे. त्याच्या मजबूत उच्च-गुणवत्तेच्या डिझाइनमुळे हे शक्य झाले आहे.
नोकिया कम्फर्ट इअरबड्स २९ तासांचा वेळ देतात, आटोपशीर नैसर्गिक एर्गोनॉमिक डिझाइनसह जास्तीत जास्त आराम देतात. हे IPX5 पाणी आणि घाम प्रतिरोधक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या संगीताचा आनंद घेऊ शकता किंवा अगदी घामाने भरलेल्या उन्हाळ्याच्या हवामानातही संपर्कात राहू शकता. उदा. जसे की दिल्ली येथे आधीपासूनच आहे किंवा पावसातही मजा घेऊ शकता.
नोकिया गो इअरबड्स+मध्ये २६ तासांचा वेळ देताना थम्पिंग बास साठी मोठे १३ मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि ते IPX4 घाम आणि पाणी प्रतिरोधक आहेत आणि वापरण्यास-सुलभ टच कंट्रोल्स आहेत त्यामुळे तुम्ही ऊनपाऊस केव्हाही अखंडपणे कनेक्ट राहू शकता.
किंमत आणि उपलब्धता
नोकिया जी २१ स्मार्टफोन- ४/६४ जीबी व्हेरिएंट १२,९९९ रुपयांना आणि ६/१२८ जीबी प्रकार १४,९९९
रुपयांना रिटेल आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लेयर्स आणि nokia.com वर उपलब्ध असेल. रिटेल ग्राहक लाँच ऑफर म्हणून बजाज फिनसर्व्हद्वारे समर्थित ट्रिपल झिरो फायनान्स ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
नोकिया १०५ दोन रंगांमध्ये १२९९ रुपयांपासून उपलब्ध होईल आणि नोकिया १०५ प्लस लाल/चारकोल या दोन उत्कृष्ट रंगांमध्ये १,३९९ रुपयांपासून नंतर उपलब्ध होईल आणि ऑडिओ अॅक्सेसरीज – नोकिया कम्फर्ट इअरबड्स २,७९९ रुपये आणि नोकिया गो इअरबड्स+ १,९९९ रुपयांना उपलब्ध असतील.
ही सर्व उपकरणे संपूर्ण भारतात जवळील स्टोअरमध्ये उपलब्ध असतील, मग तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेत किंवा मोठ्या स्वरूपातील स्टोअरमध्ये किंवा ई-कॉम साइटवर खरेदी करण्यास प्राधान्य देत असाल. आमची उपकरणे सर्वांना सुलभतेने उपलब्ध होतील याची आम्ही खात्री केली आहे.