करपश्चात नफा आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ~४९४ कोटी रुपये तर
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ~१,०५३ कोटी रुपये
आर्थिक वर्ष २०२२ मधील निव्वळ महसुल ~३४%नी वाढून ४,६४७.३२ कोटी रुपयांवर पोहोचला
पुणे, १९ मे २०२२: फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (एनएसई:FINPIPE| बीएसई:500940) आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निष्कर्ष जाहीर केले.
आर्थिक निष्कर्षातील प्रमुख बाबी (स्टॅन्डअलोन): (भारतीय रुपये – कोटी)
रुपये – कोटी | आर्थिक वर्ष २०२२ चौथी तिमाही | आर्थिक वर्ष २०२१ चौथी तिमाही | फरकाची टक्केवारी | आर्थिक वर्ष २०२२ | आर्थिक वर्ष २०२१ | फरकाची टक्केवारी |
संचालनातून उत्पन्न | १५९४.५७ | १२४९.०८ | २७.७% | ४,६४७.३२ | ३,४६२.२७ | ३४.२% |
ईबीआयटीडीए (व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडी तरतुदीपश्चात कंपनीची मिळकत)* | २६४.६६ | ४१०.०५ | -३५.५% | १,०२३.७४ | ९८९.३० | ३.५% |
ईबीआयटीडीए मार्जिन (%) | १६.६% | ३२.८% | २२.०% | २८.६% | ||
घसारा | २१.५५ | १९.७० | ८३.४ | ७७.७२ | ||
ईबीआयटी (व्याज आणि करपूर्व मिळकत)* | २४३.११ | ३९०.३५ | -३७.७% | ९४०.३४ | ९११.५८ | ३.२% |
ईबीआयटी % | १५.२% | ३१.३% | २०.२% | २६.३% | ||
आर्थिक खर्च | ८.०६ | १.८४ | १४.०९ | ७.२७ | ||
इतर उत्पन्न | २४.७६ | १३.५६ | ८३.१६ | ७२.४८ | ||
करपूर्व नफा* | २५९.८१ | ४०२.०५ | -३५.४% | १,००९.४१ | ९७६.८० | ३.३% |
करपूर्व नफा % | १६.३% | ३२.२% | २१.७% | २८.२% | ||
अपवादात्मक घटक (नफा) | ३७६.०६ | – | ३७६.०६ | – | ||
कर | १४२.०७ | १०४.७३ | ३३२ | २४८.७८ | ||
करपश्चात नफा | ४९३.८० | २९७.३३ | ६६.१% | १,०५३.४७ | ७२८.०२ | ४४.७% |
करपश्चात नफा% | ३१.०% | २३.८% | २२.७% | २१.०% | ||
विक्री मेट्रिक टनमध्ये | ||||||
पीव्हीसी रेसिन (एक्स्टर्नल) | २३,७०१ | २६,८२५ | -११.६% | ५७,०९५ | ७५,८१८ | -२४.७% |
पाईप्स व फिटिंग्स | ७८,६२९ | ६०,२३२ | ३०.५% | २,३६,८९५ | २,१२,०६० | ११.७% |
* अपवादात्मक घटक वगळण्यात आले आहेत.
आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीतील ठळक बाबी:
· आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत संचालनातून मिळणारे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीत एकूण उत्पन्नाच्या तुलनेत (१२४९.०८ कोटी रुपये) २७.७% वाढून १५९४.५७ कोटी रुपयांवर पोहोचले.
· आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत पाईप्स आणि फिटिंग्स विभागाचा व्हॉल्युम मागील वर्षीच्या याच तिमाहीतील व्हॉल्युमच्या तुलनेत (६०,२३२ मेट्रिक टन) ३०.५% वाढून ७८,६२९ मेट्रिक टनांवर पोहोचला.
· आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत अपवादात्मक घटकांच्या आधीचे ईबीआयटीडीए (व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडी तरतुदीपश्चात कंपनीची मिळकत) मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (४१०.०५ कोटी रुपये) ३५.५% कमी होऊन २६४.६६ कोटी रुपये नोंदवण्यात आले.
· आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत करपश्चात नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (२९७.३४ कोटी रुपये) ६६.१% नी वाढून ४९३.८० कोटी रुपये नोंदवण्यात आला.
आर्थिक वर्ष २०२२ मधील आर्थिक कामगिरीतील ठळक बाबी:
· आर्थिक वर्ष २०२२ मध्ये संचालनातून मिळणारे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत (३,४६२.२७ कोटी रुपये) ३४.२% वाढून ४,६४७.३२ कोटी रुपयांवर पोहोचले.
· आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पाईप्स आणि फिटिंग्स विभागाचा व्हॉल्युम मागील वर्षीच्या तुलनेत (२,१२,०६० मेट्रिक टन) ११.७% वाढून २,३६,८९५ मेट्रिक टनांवर पोहोचला.
· आर्थिक वर्ष २०२२ मध्ये अपवादात्मक घटकांच्या आधीचे ईबीआयटीडीए (व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडी तरतुदीपश्चात कंपनीची मिळकत) मागील वर्षीच्या तुलनेत (९८९.२९ कोटी रुपये) ३.५% वाढून १,०२३.७१ कोटी रुपये नोंदवण्यात आले.
· आर्थिक वर्ष २०२२ मध्ये करपश्चात नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (७२८.०१ कोटी रुपये) ६६.१% नी वाढून १,०५३.४७ कोटी रुपये नोंदवण्यात आला.
कंपनीने बजावलेल्या यशस्वी कामगिरीविषयी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश पी छाब्रिया यांनी सांगितले, “आपल्या चाळीसाव्या आर्थिक वर्षात कंपनीने अतिशय लक्षणीय कामगिरी बजावली आहे. आव्हानात्मक परिस्थिती असून देखील आमच्या टीमने या वर्षभरात उत्तम यश संपादन केले आहे. विकासाच्या दिशेने सातत्याने सुरु असलेल्या वाटचालीला प्रोत्साहन देणाऱ्या फिनोलेक्स परिवारामुळे हे सर्व संभव झाले आहे. परिवारातील प्रत्येक सदस्याने फिनोलेक्सचे यश हे आपले स्वतःचे यश ही भावना मनात बाळगून स्वतः आणि स्वतःच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावावी यासाठी अथक मेहनत केली आहे.”