पुणे (शरद लोणकर): जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी असलेल्या FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी असलेल्या FedEx Express ने २०४० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याच्या आपल्या जागतिक ध्येयाचा एक भाग म्हणून भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्यांना सुरुवात करत असल्याची घोषणा आज केली.
इलेक्ट्रिक वाहनाची चाचणी बंगळूरू मध्ये एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. FedEx Express कार्यक्षेत्रामध्ये वाहन तंत्रज्ञानाची चाचणी होईल. यात संपूर्ण सामानासह नेहमीच्या मार्गावर वाहनाची कार्यशील परिणामकता तपासली जाईल. सकारात्मक चाचणी निकालांनंतर FedEx Express च्या चाचण्या दिल्लीमध्ये होतील.
वेगाने वाढत असलेल्या इ-कॉमर्स विकासामुळे वाहतूक वाढत आहे. भारतातील FedEx वाहतूक ताफ्यात भर घालत असलेल्या प्रत्येक नव्या इलेक्ट्रिक वाहनामुळे पाच प्रवासी कारला लागेल इतका इंधनाचा वापर आणि उत्सर्जन कमी होऊ शकेल.
FedEx Express च्या इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहम्मद सायेघ म्हणाले, “संपूर्ण जगाला जबाबदार पद्धतीने आणि स्त्रोतपूर्ण पद्धतीने जोडण्याचे FedEx Express चे ध्येय आहे आणि भारतात आमच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचणीची घोषणा करताना मला प्रचंड आनंद होत आहे. २०४० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याच्या आमच्या जागतिक ध्येयाशी सुसंगत अशी ही गोष्ट आहे.”
“भारतात इ-कॉमर्स ची वाढ होत असताना पर्यावरणावरील भार कमी करून या प्रगतीला पाठबळ देण्याचे मार्ग आम्ही सातत्याने शोधत आहोत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्यांच्या सुरुवातीने आम्हांला या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे नेले आहे,” असेही ते म्हणाले.
वाहनांचे इलेक्ट्रिफीकेशन हे कार्बन न्युट्रल कार्यध्येयाकडे पोहोचण्याच्या FedEx च्या प्रवासातल्या महत्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. २०४० पर्यंत, जगभरातील संपूर्ण FedEx पार्सल आणणे आणि पोहोचवणे सेवा ही इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून म्हणजेच शून्य उत्सर्जन अशी होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या वाहनांच्या जागी टप्प्याटप्प्याने हे वाहनांचे इलेक्ट्रिफीकेशन ध्येय साध्य केले जाणार आहे. २०२५ पर्यंत FedEx Express च्या जगभरातल्या पार्सल आणणे आणि पोहोचवण्यासाठीची ५०% वाहने इलेक्ट्रिक करण्याचे ध्येय असून २०३० पर्यंत हे प्रमाण वाढवून १००%वर न्यायचे आहे.
“आमच्या सगळ्या कार्यक्षेत्रात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या एकीकरणात चाचणी हा महत्वाचा भाग आहे. आमचा व्यवसाय, ग्राहक आणि आमच्या टीम मधील सदस्यांना सेवा देण्यासाठी योग्य तंत्रज्ञान शोधणे या गोष्टीची FedEx Express वाहनांच्या ताफ्यात यशस्वीपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात महत्वाची भूमिका असेल,” असे सायेघ म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे धोरण हे आपल्या सृष्टीचे आरोग्य जपत ग्राहकांना जागतिक बाजारपेठेशी जोडून घेत भारतात आपल्या सेवा आणि सुविधा विस्तारण्याच्या FedEx च्या बांधिलकीशी सुसंगत आहे.