दिल्ली, 30 सप्टेंबर, 2021 : ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (सीईएएमए) या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणांच्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने आज एरिक ब्रॅगांझा यांची 2021-23 या कालावधीसाठी प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली. ब्रॅगांझा हे सध्या ‘हायर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि.’ या कंपनीचे प्रेसिडेंट आहेत. त्यांनी ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपप्रमुख कमल नंदी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी असलेले ब्रॅगांझा यांना सुमारे 35 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व उपकरणे या उद्योगामध्ये त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापनातील महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ‘हायर इंडिया’मध्ये त्यांच्याकडे कंपनीच्या देशांतर्गत कामकाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे. ब्रॅगांझा यांच्याकडील ज्ञान व अनुभव यांच्या विपुलतेमुळे कंपनीला भारतीय बाजारपेठेत गेल्या 10 वर्षांमध्ये उल्लेखनीय वाढ साध्य करता आली. या उद्योगाच्या सर्वांगीण विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. एरिक ब्रॅगांझा यांना 2017मध्ये ‘सीईएएमए’द्वारे ‘मॅन ऑफ अप्लायन्सेस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या नियुक्तीबाबत बोलताना एरिक ब्रॅगांझा म्हणाले, “या महत्त्वाच्या उद्योगासमोर सध्या काही आव्हाने उभी आहेत. एक उद्योग म्हणून, आपल्याला कठीण कालावधीवर मात करण्यासाठी नव्याने कल्पना करणे आणि पुनर्रचना करणे आवश्यक आहे. आज उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स हे क्षेत्र ग्राहकांच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनले आहे. या उद्योगासमोरील समस्यांची सोडवणूक आणि उद्योगाची शाश्वत वाढ यांसाठी सीईएएमए ही संस्था सतत प्रयत्नशील आहे. उपकरणांच्या उद्योगातील सर्व प्रमुख उत्पादन श्रेणींमध्ये देशांतर्गत बाजारपेठ वाढवण्यासाठी सीईएएमए सरकारसोबत अत्यंत जवळून काम करेल. आम्ही इतर उत्पादन श्रेणींमध्ये अधिक पीएलआय योजनांची अपेक्षा करतो. त्यामुळे भारतातील कॉम्पोनन्ट्सचे उत्पादन वाढेल आणि त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, मौल्यवान परकीय चलन त्यातून वाचेल, मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवस्था निर्माण होईल आणि निर्यातीच्या बाजारात आमच्या उत्पादन क्षमतेसह शेजारील देशांशी स्पर्धा करता येईल. या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. यातील संबंधित भागधारकांसह शाश्वत गुंतवणूकीद्वारे या महत्त्वाच्या उद्योगासाठी मूल्यवर्धन निर्माण करण्याच्या सीएएमएच्या धोरणात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.”
संस्थेचे निवडून आलेले इतर पदाधिकारी :
उपप्रमुख (उत्तर): जसबीर सिंह (अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अंबर एंटरप्रायजेस इंडिया)
उपप्रमुख (पश्चिम): कावल मिरचंदानी (संचालक, मिर्क इलेक्ट्रॉनिक्स)
उपप्रमुख (दक्षिण): सुनील वाच्छानी (अध्यक्ष, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया)
उपप्रमुख (पूर्व): अनुज पोद्दार (कार्यकारी संचालक, बजाज इलेक्ट्रिकल्स)
मानद सचिव: विकास गुप्ता (संचालक, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट)
मानद खजिनदार: मोहित वर्मा (व्यवस्थापकीय संचालक, सी-नेट कम्युनिकेशन इंडिया)
सीईएएमएबद्दल :
‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (सीईएएमए), ही 1978 साली स्थापन झालेली एक अखिल भारतीय संस्था आहे. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे या उद्योगाचे ती प्रतिनिधित्व करते. उत्पादक, विक्रेते आणि इतर भागधारकांमध्ये निकोप स्पर्धा आणि योग्य कार्यपद्धती राखण्यासाठी ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांचा उद्योग व त्याचे घटक यांचा विकास करणे हे या सर्वोच्च संस्थेचे उद्दिष्ट आहे. गेल्या 42 वर्षांपासून मजबूतपणे पाय रोवलेली, ही ना-नफा संस्था या क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी, आपल्या सदस्यांच्या सामान्य हिताची काळजी घेण्याचा सतत प्रयत्न करते.