‘टीसीएस आयॉन’ने सादर केले ‘रिमोट अॅसेसमेंट’चे उत्पादन;
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या नवीन उत्पादनाच्या माध्यमातून उमेदवारांचे सुरक्षित डिजिटल मूल्यांकन घरातूनच करणे ‘एआय / एमएल अल्गोरिदम’मुळे शक्य
मुंबई, 19 मे, 2020 : विद्यापीठांना व परिक्षा मंडळांना विद्यार्थ्यांच्या परिक्षा दूरस्थ पद्धतीने आणि मोठ्या संख्येने, तसेच निष्पक्ष, सुरक्षित व पारदर्शक वातावरणात घेता याव्यात, याकरीता ‘टीसीएस आयॉन’ या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या उपकंपनीने ‘रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली सादर केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) (बीएसई: 532540, एनएसई: टीसीएस) ही कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्ला सेवा व व्यवसायातील सोल्युशन पुरविणारी जागतिक कंपनी आहे.
सध्या ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे शिक्षण संस्था आणि परीक्षा मंडळांचे वेळापत्रक खूपच विस्कळीत झाले आहे. ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मुळे विद्यार्थ्यांना घरातून किंवा कोठूनही परीक्षा देणे शक्य होते. त्यामुळे त्यांना ‘कोविड’च्या आव्हानावर मात करता येईल.
परीक्षा मंडळांच्या आवश्यकतेनुसार, ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली परिक्षेच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण तीन स्तरांवर करते. मूलभूत स्तरावर, ती डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन हे उमेदवाराचे उपकरण बंदिस्त करून त्यातून केवळ परीक्षा देता येईल इतपतच ती सक्षम ठेवते. दुसर्या स्तरावर, ही प्रणाली उपकरणाच्या कॅमेऱ्याच्या कार्यावर नियंत्रण मिळवून ‘क्लाऊड’वरील मध्यवर्ती सर्व्हरवर व्हिडिओ प्रक्षेपित करते. हा व्हिडिओ प्रक्षेपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘मशीन लर्निंग फ्रेमवर्क’ वापरुन तपासला जातो. संभाव्य गैरप्रकारांचा शोध घेण्यासाठी आणि पर्यवेक्षकांना सतर्क करण्यासाठी या व्हिडिओ प्रक्षेपणाचे विश्लेषण केले जाते. तिसर्या स्तरामध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा एकत्र उपयोग करून पर्यवेक्षक उमेदवारांवर प्रत्यक्ष वेळी व कोठूनही लक्ष ठेवण्याकरीता सज्ज होतात.
उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्यासाठी भरपूर वैशिष्ट्ये असलेली व्यवस्थादेखील या प्रणालीमध्ये पर्यवेक्षकांकरीता उपलब्ध आहे. ‘टीटीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मध्ये प्रश्न विचारण्याच्या 50 हून अधिक प्रकारांचा विचार करता येतो. वस्तुनिष्ठ प्रश्न, आकृत्या, आणि सूत्रे यांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची संधी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रणालीतून मिळते. प्रश्नपत्रिका द्रूतगतीने तयार करणे, त्या ‘एनक्रिप्टेड’ स्वरूपात सुरक्षित ठेवणे व ऐन परिक्षेपूर्वी त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करणे ही सुविधादेखील ‘टीटीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मध्ये उपलब्ध आहे.
विद्यार्थ्याने दिलेल्या बहुसंख्य उत्तरांचे मूल्यांकन या प्रणालीद्वारे केले जाऊ शकते. वस्तुनिष्ठ उत्तरांचे मूल्यमापन परिक्षकांकडून करण्याची सोय यात आहे. ही प्रणाली ‘टीसीएस आयॉन रिमोट मार्किंग प्लॅटफॉर्म’शी अखंडीत संलग्न असते. त्यातून परीक्षक त्यांच्या घरातूनच उमेदवारांची उत्तरे तपासून त्यांना गुण देऊ शकतात. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचे डिजिटल पद्धतीने विश्लेषण होते व ते गुण संबंधितांना कळविले जातात. अशा प्रकारे परिक्षांचे निकाल अत्यंत कमी वेळेत प्रसिद्ध होऊ शकतात.
‘टीसीएस आयॉन’चे जागतिक स्तरावरील प्रमुख अधिकारी वेंगुस्वामी रामास्वामी म्हणाले की, “दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेण्याची क्षमता विकसीत करून शिक्षण क्षेत्राला मदत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यातूनच आम्ही ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली निर्माण केली. विद्यार्थी, पर्यवेक्षक किंवा परीक्षा मंडळांचे अधिकारी हे कोणत्याही ठिकाणी असले, तरी या प्रणालीच्या मदतीने परीक्षा मंडळांचे प्रशासक हे सुरक्षित मार्गाने आणि वेगाने परीक्षा घेण्यास सक्षम असतील. यामुळे अधिकाऱ्यांना परीक्षेची प्रक्रिया त्वरीत आखून पूर्ण करण्यात मदत होईल.”
अनेक नामांकित परीक्षा मंडळे आणि शिक्षण संस्था यांनी शैक्षणिक परीक्षा घेण्यासाठी ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ प्रणालीचा लाभ घेणे यापूर्वीच सुरू केले आहे. या प्रणालीद्वारे आतापर्यंत दोन कोटी 80 लाखांहून अधिक उमेदवारांचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. या संदर्भात इच्छुक संस्था https://iur.ls/RemoteAssessments वर नोंदणी करून त्यांच्या परिक्षेच्या वेळापत्रकाचे त्वरीत नियोजन करू शकतात.