ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा हयातीचा दाखला व्हॉट्सअॅपवर ‘आय-सर्व्ह व्हिडिओ कॉल’द्वारे सादर करणे शक्य
· हयातीचा दाखला सादर करण्यासाठी दरवर्षी शाखेत जाण्याचा शारीरिक ताण कमी
पुणे: भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ’ कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांची ‘वर्षासनाची पेन्शन क्लेम प्रक्रिया’ सुलभ करण्याच्या दृष्टीने एकमेवाद्वितीय अशी व्हिडिओ-आधारीत ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेशन’ (हयातीचा दाखला) सुविधा सुरू केली आहे. या नवीन सेवेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आता आपला हयातीचा दाखला किंवा जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने कंपनीच्या प्रतिनिधीला सोप्या व्हिडिओ कॉलद्वारे सादर करणे शक्य झाले आहे. बजाज अलियान्झ लाइफ पॉलिसीधारकांसाठी व्हॉट्सअॅपवर ‘आय-सर्व्ह व्हिडिओ कॉलिंग’ सुविधेद्वारे ही नवीन सेवा उपलब्ध आहे.
ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा आणणारी ‘बजाज अलियान्झ लाइफ’ ही पहिली कंपनी होती; आणि आताही पॉलिसीधारकांसाठी वर्षासन पेन्शन क्लेम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व्हिडिओ-आधारित डिजिटल हयातीचा दाखला सुविधा तिनेच प्रथम आणली आहे. या साध्या व सोप्या प्रक्रियेसाठी पॉलिसीधारकास कंपनीच्या ‘आय-सर्व्ह व्हिडिओ कॉलिंग’ सुविधेद्वारे ‘व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल’ करता येणे आवश्यक आहे, तसेच कंपनीच्या प्रतिनिधीला आपले अस्तित्व डिजिटलपणे सिद्ध करता येणे आवश्यक आहे. अशा प्रकारे हयातीचा दाखला सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता कॉन्टॅक्टलेस, पेपरलेस आणि ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेशन’ सेवेसह त्रास-मुक्त झाली आहे. यामुळे ग्राहकांना कंपनीच्या प्रतिनिधीशी सुरक्षित व संरक्षित वातावरणात थेट संपर्क साधता येईल. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन रचना करण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच सेवा आहे. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांना कोविड साथीच्या काळात आपला हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कंपनीच्या शाखांमध्ये थेट जाण्याची गरज उरलेली नाही.
या नवीन सेवेबद्दल भाष्य करताना ‘बजाज अलियान्झ लाइफ’चे कामकाज व ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख कैझाद हिरामनेक म्हणाले, “आपण सध्या ज्या नवीन व्यावसायिक वातावरणात काम करीत आहोत, त्याचा विचार करून आम्ही आमच्या ग्राहकांना स्मार्ट डिजिटल सोल्यूशन देण्यावर भर देत आहोत. ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेशन’ ही सेवा ग्राहकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आणली गेली आहे. साथीच्या काळात डिजिटल पद्धत अवलंबण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, हेदेखील आम्ही लक्षात घेतले आहे. ग्राहकांना जास्त परिचित असलेल्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठीच्या तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात; त्यातून त्यांना उत्कृष्ट अनुभव मिळून त्यांच्यासाठी आम्ही करीत असलेले प्रयत्न सार्थकी लागतात, असेच माझे मत आहे.”
‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’बद्दल
बजाज अलियान्झ लाइफ ही भारतातील आघाडीची खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे. बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि अलियान्झ एसई या दोन सामर्थ्यवान आणि यशस्वी कंपन्यांच्या भागिदारीतून ही कंपनी निर्माण झाली आहे. बजाज फिनसर्व्ह ही भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग वित्तीय संस्था आहे, तर अलियान्झ एसई ही जगातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापक आणि विमा कंपनी आहे.
2001 मध्ये ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने आपले कामकाज सुरू केले. दोन दशकांपेक्षाही कमी कालावधीत आपली उपस्थिती कंपनीने देशभरात विस्तारली. 556 शाखा, 80,000 हून अधिक एजंट्स (31 मार्च 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार), विश्वासू भागीदारांच्या सर्वसमावेशक संच आणि ऑनलाइन विक्री चॅनेल यांद्वारे लाखो ग्राहकांना ती सेवा देते. ‘लाइफ गोल्स.डन’ या ब्रॅंड आश्वासनातून कंपनी आरओएमसी (रिटर्न ऑफ मॉर्टॅलिटी चार्जेस) यासह, काही नावीन्यपूर्ण यूलिप योजना सादर करते. अशी योजना आखणारी ती पहिली कंपनी ठरली आहे. ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने ग्राहकांच्या आनंदात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सतत परिवर्तन केले आहे. कंपनी अनेक ‘प्लॅटफॉर्म’द्वारे ग्राहकांशी सतत संपर्कात राहते. ‘बजाज अलियान्झ लाइफ प्लॅकॅथॉन’ या उपक्रमातून तिने 2020 मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले आहे.