ठेवी आणि कर्जांमध्ये जोमदार वाढीची कामगिरी; परतावा गुणोत्तरामध्ये देखील सुधारणा
अॅक्सिस बँक या देशातील खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज आपले आर्थिक वर्ष २०२२ मधील चौथ्या तिमाहीचे आणि वार्षिक आर्थिक कामगिरीचे निकाल जाहीर केले. बँकेने या तिमाहीत निव्वळ नफा रू. ४,११८ कोटी नोंदवला असून त्यामध्ये ५४% वार्षिक आणि १४% तिमाही वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीत हा निव्वळ नफा रू. २,६७७ कोटी इतका होता. बँकेच्या नक्त व्याज उत्पन्नात (एनआयआय) आर्थिक वर्ष २०२२च्या चौथ्या तिमाहीमध्ये वार्षिक १७% वाढ झाली असून तो रू. ८,८१९ कोटींवर गेला आहे, आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीत तो रू. ७,५५५ कोटी होता. बँकेचे नक्त व्याज मार्जिन (एनआयएम) आर्थिक वर्ष २०२२च्या चौथ्या तिमाहीत ३.४९% झाले आहे. कासा (CASA) ठेवीमध्ये १६% वार्षिक आणि ७% तिमाही वाढ दिसून आली आहे; तर कासा गुणोत्तर ४५% नोंदवले गेले आहे. बँकेच्या कामकाजी उत्पन्नात वार्षिक १८% वाढ दिसून आली असून ते आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीतील रू. ११,०९६ कोटींवरून वाढून यंदा आर्थिक वर्ष २०२२च्या चौथ्या तिमाहीत रू. १३,०४२ कोटींवर गेले आहे. ३१ मार्च २०२२ रोजी बँकेने ढोबळ अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) आणि निव्वळ अनुत्पादित मालमत्ता (नेट एनपीए) यांची पातळी अनुक्रमे २.८२% आणि ०.७३% टक्के इतकी राखण्यात यश मिळविले आहे; ३१ डिसेंबर २०२१ रोजी ही पातळी अनुक्रमे ३.१७% आणि ०.९१% इतकी होती.
बँकेच्या शुल्क उत्पन्नात ११% वार्षिक आणि १२% तिमाही वाढ नोंदवली गेली असून ते रू. ३,७५८ कोटींवर गेले आहे. रिटेल शुल्कात १४% वार्षिक आणि १४% तिमाही वाढ झाली असून बँकेच्या एकूण उत्पन्नापैकी याचा हिस्सा ६६% इतका नोंदवला गेला आहे. बँकेचे एकंदर भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (सीएआर) १८.५४% वर स्थिर असून त्याचे सीईटी वन गुणोत्तर बँकेने १५.२४% इतके राखले आहे. बँकेच्या आंतर्देशीय (स्थानिक) उपव्यवसायांनी देखील जोमदार कामगिरी करून दाखविली असून आर्थिक वर्ष २०२२ साठी त्यांचा एकत्रित करपश्चात नफा रू. १,१९५ कोटी नोंदवला गेला असून त्यामध्ये वार्षिक ४४% वाढ झालेली आहे; एकत्रित १६.६७ टक्क्यांच्या आरओई (वार्षिक) मध्ये त्याचे ८० बेसिस पॉईंट्स इतके योगदान आहे.