मुंबई,महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, XUV300 या आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला ग्लोबल एनसीएपीकडून सर्वोच्च 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याचे आज जाहीर केले आहे. या जागतिक गौरवामुळे, ग्लोबल एनसीएपीने आजवर चाचणी केलेल्या सर्व 5-स्टार रेटेड कारमध्ये XUV300 हे सर्वाधिक पॉइंट मिळवणारे पहिले भारतीय वाहन ठरले आहे.
XUV300 ही 4 स्टार चाइल्ड सेफ्टी रेटिंग मिळवणारे पहिले भारतीय वाहन ठरली आहे. 5-स्टार सेफ्टी रेटिंगसाठी साइड इम्पॅक्ट कामगिरी आवश्यक असते, आणि XUV300 साइड इम्पॅक्ट कामगिरी ही सर्व 5-स्टार रेटेड कारमध्ये एक सर्वोत्तम आहे.
या यशाविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, “5-स्टार रेटिंगमधून आमची सुरक्षेबद्दल असणारी कमालीची बांधिलकी अधोरेखित होत असल्याने महिंद्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आजचे जागरुक ग्राहक वाहन खरेदीचा निर्णय घेताना सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देतात. आम्ही XUV300 ची निर्मिती करताना ती भारतातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक ठरेल, या दृष्टीने निर्मिती केली आहे. या सन्मानामुळे आम्हाला आणि भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगाला भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी अशाच प्रकारे सुरक्षेचे मापदंड साध्य करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळणार आहे”.
महिंद्रा XUV300 मध्ये या श्रेणीतील पहिली ठरणारी विविध वैशिषट्ये समाविष्ट आहेत, जसे 7 एअरबॅग, सर्व 4 व्हील्सवर डिस्क ब्रेक्स, फ्रंट पार्किंग सेन्सर्स व हीटेड ओआरव्हीएम. यामुळे कमालीची सुरक्षितता प्राप्त होते. आज, XUV300ने ग्लोबल एनसीएपी या कन्झ्युमर कार सेफ्टी टेस्टिंग बॉडीसाठीच्या अम्ब्रेला बॉडीकडून 5-स्टार रेटिंग मिळवून भारतात वाहन सुरक्षेच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण केला आहे. महिंद्रा XUV300 साठी अधिकृत ग्लोबल एनसीएपी चाचणी नुकतीच जर्मनीमध्ये घेण्यात आली.
XUV300 मधील चोख सुरक्षा
XUV300 मध्ये पुढील या श्रेणीतील पहिली वैशिषट्ये समाविष्ट आहेत*:
1. श्रेणीतील पहिले नी एअरबॅग, ड्युएल-फ्रंट, साइड व कर्टन एअरबॅग यासह 7 एअरबॅग
2. श्रेणीतील पहिले सर्व 4 व्हील्सवर डिस्क ब्रेक (सब 4-मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये).
3. श्रेणीतील पहिले फ्रंट पार्किंग सेन्सर्स
4. श्रेणीतील पहिले हीटेड ओआरव्हीएम
5. इलेक्ट्रक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम – डायनॅमिक स्टीअरिंग टॉर्क, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, रोल-ओव्हर मिटिगेशन व ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्टसह
6. सर्व प्रकारांसाठी ABS व EBD स्टँडर्ड
7. फ्रंट व रिअर फॉग लॅम्प
8. ISOFIX चाइल्ड सीट माउंट
9. टायर-ट्रॉनिक्स (टायर प्रेशर व तापमान यांची देखरेख करणारी सिस्टीम)
10. सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमांइडर
11. सर्व सीटवर 3-पॉइंट सीट बेल्ट
–सुरक्षेच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण, सर्व 5 स्टार रेटेड भारतीय वाहनांमध्ये मिळवले सर्वाधिक पॉइंट
–4 स्टार चाइल्ड सेफ्टी रेटिंग मिळवणारे पहिले भारतीय वाहन