इनिऑस होंडा इरुला रेसिंग टीमच्या मंथाना कुमार यांच्यासाठी दुहेरी पोडियमचा आनंद
· NSF250R खुला विभाग – पुण्यातील 14 वर्षीय सार्थक यांनी मिळवली पहिली NSF 250R, तर कविन क्विंतल दुसऱ्या आणि वरूण एस तिसऱ्या क्रमांकावर
· CBR150R नोव्हिस क्लास – नवे रायडर श्याम सुंदर यांनी जिंकले इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप CBR150R नोव्हिस क्लासचे विजेतेपद. त्यांच्यापाठोपाठ विवेक रोहित कपाडिया आणि रक्षित एस दवे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर.
चेन्नई– यंदा रेसिंगची धमाल केवळ दोन वीकेंडपुरती सीमित असल्यामुळे 2020 इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीप आणि इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप विजेतेपदाच्या सर्व विभागांतील होंडा रायडर्ससाठी आव्हानात्मक, मजेदार आणि खूप काही शिकवणारा अनुभव ठरला.
होंडाच्या रेसिंग डीएनचे प्रतीक ठरलेल्या होंडाच्या 24 तरुण रायडर्सनी इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपच्या NSF250R खुला विभाग आणि CBR150R नोव्हिस विभागात सर्वोत्तम कामगिरी करताना कोणतीही कसर ठेवली नाही. पुण्याचे सार्थक चव्हाण नेतृत्वात आघाडीवर राहिले. 14 वर्षांच्या तरुणाने आपल्या चमकदार कामगिरीने इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R खुल्या विभागाचे विजेतेपद मिळवले, तर त्यांच्यानंतर चेन्नईचे कविन क्विंतल दुसऱ्या व वरूण एस तिसऱ्या स्थानावर आले.
अतिशय धाडसी रेसिंग करणारे चेन्नईचे स्याम सुंदर 2020 इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप CBR150R नोव्हिस क्लासचे विजेते ठरले, तर त्यांच्यापाठोपाठ बेळगावच्या रोहित कपाडिया यांनी दुसरे व चेन्नईच्या, वयाने सर्वात लहान असलेल्या 12 वर्षांच्या रक्षित दवे यांनी तिसरे स्थान मिळवले.
इनिऑस होंडा इरुला रेसिंग टीम रायडर्सनी इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीप PS165cc मधे 10 पोडियम्ससह 3 विजय मिळवले. कुशल रायडर मंथाना कुमार यांच्यासाठी हा रविवाक आशा आणि धाडसाचा होता. सकाळच्या रेसमधे आम्हाला त्यांचे संघर्ष कौशल्य पाहायला मिळाले आणि त्यांनी 2:00.711 या सर्वोत्तम लॅपवेळेसह तिसऱ्या स्थानावर येत फेरी पूर्ण केली. दुपारच्या अंतिम फेरीत मंथाना यांनी प्रचंड धाडसाने आगेकूच करत अखेरीस या सीझनमधला आपला पहिला विजय मिळवला. यासह मंथाना यांनी 2020 चॅम्पियनशीपमधे 4 पोडियम्स व तिसरे स्थान मिळवले.
आपल्या भावना व्यक्त करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रभू नागराज म्हणाले, ‘रविवारचा दिवस संमिश्र भावनांचा होता, कारण राजीव सेतू यांना मशिनच्या काही तांत्रिक अडचणींमुळे रेसबाहेर जावे लागले, मात्र मंथाना कुमार यांनी पुढे होत होंडा टीमला दुहेरी पोडियम मिळवून दिले. विविध मर्यादा आणि वेळेचे बंधन असूनही इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमधे आमच्या तरुण रायडर्सनी केलेल्या कामगिरीमुळे मी भारावून गेलो आहे. सार्थक आणि श्याम या दोघांनीही आपापल्या विभागात असामान्य कामगिरी केली. आमच्या नव्या रायडर्सनाही चांगला अनुभव मिळाला आणि ते जास्त चांगल्या प्रकारे पुढच्या सीझनसाठी सज्ज झाले आहेत. मी सर्व रायडर्सचे त्यांनी केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो. आता 2021 च्या सीझनची उत्सुकता आहे.’
प्रो- स्टॉक 165 सीसीच्या चौथ्या रेसमधे सर्वोत्तम लॅप वेळेसह मंथाना कुमार आघाडीवर
पोडियम विजयासाठी तीव्र संघर्ष करत होंडाच्या मंथाना कुमार यांनी विजय खेचून आणला. सकाळच्या फेरीमधे त्यांनी अटीतटीची लढत दिली आणि आपल्या जवळच्या स्पर्धकापासून केवळ 0.077 सेकंदांनंतर तिसऱ्या स्थानावर आणि पोडियम विजयापासून केवळ 4.238 सेकंदांवर असताना रेस पूर्ण केली. आपला आत्मविश्वास दर्शवत मंथांना यांनी दुपारी तिसऱ्या स्थानावरून सुरुवात केली आणि स्पर्धेवर मात करत 4.185 सेकंदांच्या फरकाने पोडियम जिंकले, तसेच 2:01.498 ही सर्वोत्तम लॅप वेळ नोंदवली. दुर्देवाने पीएस 165 क्लास मशिनमधे काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राजीव सेतू या रेसमधे सहभागी होऊ शकले नाही.
इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप – NSF 250R आणि CBR 150R विभाग
NSF250R तरुण सार्थक चव्हाण यांची थरारक रेस पाहायला मिळाली. शेवटच्या ग्रिडवरून सुरुवात करूनही त्यांनी आपले रेसिंग कौशल्य दाखवत फिनिश लाइन पार केली व पोडियम जिंकले. यामुळे ते इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R खुल्या विभागाचे विजेते ठरले. त्यांच्यानंतर बेंगळरूचे सॅम्युअल मार्टिन यांनी दुसरे, तर वलनचेरीचे मोहसिन पी यांनी तिसरे स्थान मिळवले. पोडियम विजयासाठी संघर्ष करताना सार्थक यांनी सॅम्युअल यांच्या तुलनेत 0.52.128 चा मोठा फरक दर्शवत 0.52.128 लॅप वेळेसह रेस पूर्ण केली. या रेसमधे आघाडीचे रायडर्स अनपेक्षितपणे रेसबाहेर गेल्यामुळे पोडियमवर नव्या रायडर्सना संधी मिळाली.
CBR150R नोव्हिस विभागात झालेल्या रेसमधे होंडाच्या तरुण रायडर्समधे अटीतटीची लढत झाली आणि ज्यात या विभागाचे विजेते श्याम सुंदर यांनी 13:30.923 लॅप वेळेसह पोडियम मिळवले व ते इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप CBR150R नोव्हिस क्लासचे विजेते ठरले. ट्रॅकवर त्यांना सातारच्या ईक्षन शानभाग यांनी चांगली टक्कर दिली. ईशन यांनी आपल्या या पहिल्याच सीझनमधे अंतिम रेसमधे पहिले पोडियम मिळवले आणि केवळ 0.415 सेकंदांच्या फरकाने दुसरे स्थान मिळवले. त्यांच्यानंतर विवेक रोहित कपाडिया यांनी रेसच्या सुरुवातीपासूनच पहिल्या स्थानासाठी लढत दिली, मात्र सहाव्या लॅपपर्यंत ते तिसऱ्या स्थानावर केले. पुण्याचे शुभंकर जोशी यांनीही चांगली कामगिरी करत 2:12.918 ची सर्वोत्तम वेळ नोंदवत चौथ्या स्थानावर सांगता केली.