• कामगिरी आणि कार्यक्षमता: 125 सीसी एचईटी बीएसव्हीआय पीजीएम- एफआय इंजिन ईएसपी (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर)
• #अक्वाएटरिझोल्यूशन – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरमुळे प्रत्येकवेळेस धक्का न बसता आणि कोणत्याही आवाजाशिवाय सुरू
• इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेमुळे वेळेआधी आणि सुखद प्रवासासाठी मिळते माहिती उदा. किती अंतरानंतर इंधनाची टाकी संपेल, सरासरी इंधन कार्यक्षमता आणि प्रत्यक्षातील इंधन कार्यक्षमता.
• तंत्रज्ञान – गाडी थांबल्यानंतर बंद होणारी यंत्रणा आणि इंजिन कट- ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर
जबरदस्त आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा
· नव्या एलईडी डीसी हेडलॅम्पमुळे सोयीस्कर कमी वेग आणि रात्रीच्या प्रवासासाठी पुरेसा प्रकाश
· इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन – एकाच बटनाच्या मदतीने इंजिन चालू/बंद करण्याची सोय
· एकत्रित हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच – दोन्हींवर नियंत्रण करण्यासाठी एकच स्विच
· बहुपयोगी स्विच – सीट अनलॉक करा आणि बोटाने इंधनाची टाकी उघडा
· सुधारित ग्राउंड क्लियरन्ससह (+16 एमएम) टेलिस्कोपिक सस्पेंशनमुळे प्रवास आणखी सफाईदार
ग्राहकाला मिळणार जबरदस्त स्टाइल आणि मूल्य
• नवा एलईडी स्प्लिट पोझिशन लॅम्पमुळे मिळतो आकर्षक फ्रंट स्टान्स
• आधुनिक व स्टायलिश टेल लॅम्प, स्पिल्ट ग्रॅब रेल आणि साइड पॅनेलवर थ्रीडी लोगो एम्बलेम
• ग्राझिया बीएसव्हीआयवर सहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज
• ग्राझिया 125 दोन प्रकारांत उपलब्ध – स्टँडर्ड आणि डिलक्स
• आकर्षक किंमत रू. 73,336 (स्डँडर्ड प्रकारासाठी, एक्स- शोरूम गुरुग्राम, हरियाणा)
नवी दिल्ली, 24 जून 2020 – #अक्वाएटरिझोल्यूशन सह पुढे जात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आधुनिक, शहरी स्कूटर – उठावदार, आकर्षक, पूर्णपणे नवी ग्राझिया 125 बीएसव्हीआय लाँच केली.
नवी ग्राझिया 125 सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘फॉर्म, स्टायलिंग आणि तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय बदल करत सादर करण्यात आलेली ग्राझिया 125 बीएसव्हीआय तरुणाईचे लक्ष वेधून घेईल. नवी ग्राझिया ट्रेंड सेटिंग ग्राहकांसाठी स्टायलिश पद्धतीने प्रवासाचा नवा अनुभव देणारी असेल. होंडाचे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले ईएसपी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण नवी वैशिष्ट्ये आणि आकर्षक स्टायलिंग या गाडीला खास बनवतात. ’
जबरदस्त बुद्धीमत्ता
नवी ग्राझिया 125 आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये, बोल्ड डिझाइन्स यांसह रायडर्सचे लक्ष वेधून घेईल.
ग्राझिया 125 मध्ये भारत स्टेज व्हीआयचे पालन करणारे, होंडाचे विश्वासार्ह 125 सीसी पीजीएम- एफआय एचईटी (होंडा इको तंत्रज्ञान) इंजिन बसवण्यात आले असून त्याला एनहान्स्ड स्मार्ट पॉवरची (ईएसपी) जोड देण्यात आली आहे.
नवी ग्राझिया 125 भविष्यातील तंत्रज्ञान वर्तमानात आणणारी असून हे तंत्रज्ञान म्हणजेच अचूक आणि अभिजात एनहान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) भारताला जागतिक स्तरावर नेईल.
एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील गोष्टी एकत्रित करण्यात आल्या आहेत.
– होंडाच्या अनोख्या एसीजी स्टार्टरमुळे भारतीय रस्त्यांवर #अक्वाएटरिझोल्यूशन सुरू झाले आहे, कारण या स्टार्टरमुळे इंजिन धक्क्याशिवाय आणि वाहन चालवताना करंट निर्माण करण्यासाठी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरने सुरू होते. यामुळे पारंपरिक स्टार्टर मोटरची गरज भासत नाही आणि पर्यायाने गियर मेशिंगचा आवाजही येत नाही.
– दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे इंजिन कमी प्रयत्नांत सुरू होते – एक म्हणजे थोड्याशा उघडलेल्या एक्झॉस्ट व्हॉल्व्ह्जसह (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला) डिकॉम्प्रेशनच्या प्रभावी वापरामुळे तसेच स्विंग बॅक वैशिष्ट्यांमुळे जे इंजिनला किंचित विरूद्ध दिशेने फिरवते आणि त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ मिळतो. पर्यायाने कमी उर्जेसह इंजिन सुरू करणे सोपे होते.
– सुधारित टम्बल फ्लो – होंडाने इंटिग्रेटेड डाय- कास्टिंग प्रक्रियेसह जगातील पहिले टम्बल फ्लो तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान इनलेट पोर्ट शेपचा पूर्ण वापर करत टम्बल फ्लोची निर्मिती करते आणि रिव्हर्स फ्लोचा वापर करून अतिरिक्त भाग समाविष्ट न करता ज्वलन घडून येते.
– नवी प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) – हे इंजिन डेटा तसेच सहा बुद्धीमान सेन्सर्सकडून (इंजिन ऑइल तापमान सेन्सर, इंजिन वेग सेन्सर, ऑक्सिजन सेन्स, हवेच्या दाबाशी संबंधित सेन्सर, हवेच्या तापमानाशी संबंधित सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर) सतत मिळणाऱ्या अभिप्रायाच्या मदतीने सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरते आणि पर्यायाने अखंडित आणि एकसारखे पॉवर आउटपुट मिळते.
– घर्षणात घट – ऑफसेट सिलेंडर, कॉम्पॅक्ट वेट क्रँकशाफ्ट आणि पिस्टनमुळे एकंदर इंजिन घर्षणात घट होते. त्यातून इंधनाची कार्यक्षमता वाढते. पिस्टन कुलिंग जेट्स कार्यक्षमता सुधारतात व इंजिनचे जास्तीत जास्त तापमान कायम राखतात.
– नव्या ग्राझिया 125 मध्ये आयडलिंग स्टॉप यंत्रणा देण्यात आली आहे, जी ट्रॅफिक लाइट किंवा इतर छोट्या थांब्यावर आपोआप इंजिन बंद करते. त्यामुळे इंधनाचा अनावश्यक वापर होत नाही व पर्यायाने उत्सर्जनात घट होते. थ्रॉटलच्या मदतीने इंजिन सहजपणे परत सुरूही करता येते.
जबरदस्त आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा
नवे डीसी हेडलॅम्प अखंडित प्रकाश देतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस खराब रस्त्यांवर आणि कमी वेग असताना गाडी चालवणे सोयीस्कर होते.
यामध्ये अनोखा बहुपयोगी स्विच देण्यात आला आहे. याच्या मदतीने सीट अनलॉक करता येते तसेच बाहेरील बाजूल असलेल्या इंधाच्या टाकीचे झाकणही उघडता येते.
दुहेरी काम करणारा इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच खालच्या बाजून दाबल्यानंतर इंजिन सुरू होते आणि वरच्या बाजूने दाबल्यानंतर इंजिन बंद होते.
इंटिग्रेडेट हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विचमुळे एकाच स्विचच्या मदतीने हाय/लो बीम आणि पासिंग सिग्नल देणे शक्य होते.
इंजिन कट- ऑफची जोड असलेले साइड स्टँड इंडिकेटर साइड स्टँडवर लावला असताना इंजिन सुरू होऊ देत नाही आणि प्रवास आणखी सोपा व सोयीस्कर होतो.
इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले – पूर्णपणे डिजिटल मीटरला नवे इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यावर डिस्टन्स टु एम्प्टी (टाकीत असलेल्या इंधनाच्या जोरावर गाडी किती अंतर जाऊ शकेल), सरासरी इंधन कार्यक्षमता (एकंदर इंधन कार्यक्षमता दर्शवणारा डिस्प्ले) आणि प्रत्येक प्रवासासाठी प्रत्यक्षातील इंधन कार्यक्षमता इत्यादी माहिती देण्यात येते. या मीटरवर थ्री स्टेप इको इंडिकेटर, घड्याळ, सर्व्हिसिंगची आठवण करणारा इंडिकेटर तसेच मायलेजशी संबंधित इतर माहितीही दिली जाते.
थ्री स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेंशनमुळे रायडरला त्याचा आरामदायीपणा आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार तीन टप्प्यांत आपली रायडिंगची पसंती निवडता येते.
अतिरिक्त ग्राउंड क्लियरन्ससह (+16एमएम) देण्यात आलेले टेलिस्कोपिक सस्पेंशन नव्या ग्राझिया बीएसव्हीआयवरील प्रवास आणखी आरामदायी बनवतो.
सीटखालील स्टोअरेजची नव्याने रचना करण्यात आली असून पुढील बाजूस देण्यात आलेला अधिक मोठा, उच्च दर्जाचा ग्लोव्ह बॉक्स जास्त उपयुक्त झाला आहे.
ग्राझिया 125 मध्ये इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) बसवण्यात आले आहे. या होंडाच्या आधुनिक कॉम्बी ब्रेक सिस्टीममधील (सीबीएस) अनोखा इक्विलायझर फक्त डाव्या बाजूचा लिव्हर दाबून एकाच वेळेस पुढील आणि मागच्या चाकांमध्ये उर्जेचे समान वितरण करतो. यामुळे ब्रेकिंग अंतर कमी होतो आणि नेहमीच्या ब्रेकिंगच्या तुलनेत जास्त चांगला समतोल साधला जातो.
जबरदस्त स्टाइल
नवा स्प्लिट एलईडी पोझिशन लॅम्प ग्राझिया 125 ला जास्त आक्रमक लूक देतो. नवा टेल लॅम्प, जेटपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेले रियर विंकर्स आणि स्प्लिट ग्रॅब रेल आधुनिक प्रतिमा तयार करतात.
साइड पॅनेलवरील थ्रीडी लोगो एम्बलेम आणि फ्लोअर पॅनेलवरील होंडाचे असामान्य बॅजिंग ग्राझिया 125 चे रुप आणखी खुलवतात. प्रीमियम ब्लॅक अलॉय व्हील्स गाडीच्या एकंदर डिझाइन आणखी भर घालतात.
आवश्यक विश्वासार्हता
या क्षेत्रात होंडाने पहिल्यांदाच सहा वर्षांची खास वॉरंटी पॅकेज (3 वर्षांची नेहमीची + 3 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी) ग्राझिया 125 वर दिले आहे.
किंमती, प्रकार आणि आकर्षक रंग
ग्राझिया 125 या आठवड्यापासून पाठवली जाईल. तिचे स्टँडर्ड व डिलक्स असे दोन प्रकार असून ते मॅट सायबर यलो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल सायरन ब्लू आणि मॅट अक्सिस ग्रे या चार उठावदार रंगांत उपलब्ध आहेत. ग्राझिया 125 बीएसव्हीआय रू. 73,336 मध्ये (स्टँडर्ड प्रकार, एक्स शोरूम गुरुग्राम, हरियाणा) उपलब्ध करण्यात आली आहे.
*स्टँडर्ड प्रकारात उपलब्ध
**डीलक्स प्रकारात उपलब्ध