गुरुग्राम, 15 मे 2020 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आपली दालने टप्प्याटप्प्याने सुरू केल्यानंतर तसेच या आठवड्यात डिस्पॅचेसला सुरुवात केल्यानंतर रिटेल विक्रीने जोर पकडला असून कंपनीने रिटेल विक्रीचा 21,000 युनिट्सचा टप्पा पार केल्याचे आज जाहीर केले.
त्याचप्रमाणे 2.5 लाख होंडा ग्राहकांनी कंपनीच्या देशभरातील डीलरशीप्स आणि अधिकृत सेवा आउटलेट्स येथे त्यांच्या दुचाकींचे सर्व्हिसिंग केले आहे.
सुरक्षेस प्रथम प्राधान्य देत 45 टक्के होंडा वितरक आणि एकूण नेटवर्कपैकी 30 टक्के टचपॉइंट्स आता परत सुरू झाले आहेत. ही सर्व दालने सरकारच्या नियमावलीचे पालन करत असून होंडाने वितरित केलेल्या सर्वसमावेशक ‘डीलरशीप ऑपरेशन्स रिझम्प्शन’ माहितीपुस्तिकेचेही पालन करत आहेत.
होंडा कशाप्रकारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आजच्या परिस्थितीत आपल्या नेटवर्कमध्ये व्यवसायातील सातत्य राखत आहे याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभाहाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘आजच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये होंडा टुव्हीलर्स इंडिया नव्या यंत्रणेशी जुळवून घेत पुढे जाण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. आरोग्य आणि स्वास्थ्याची सुरक्षा जपत होंडा नेटवर्क आपल्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीकडे भारतातील लोकप्रिय बीएसव्हीआय उत्पादने उपलब्ध असून लवकरच रिटेल्समध्ये भरीव वाढ होईल असा आमचा अंदाज आहे. आमच्या टच पॉइंट्समध्ये सर्व्हिसिंगसाठी येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या ही ग्राहकांच्या होंडा व कंपनीच्या नेटवर्कवरील त्यांना स्वच्छता व सुरक्षित अंतराच्या नव्या नियमांची काळजी घेत त्यांना सेवा दिली जाईल या विश्वासाची पावती आहे.’
यापुढचे पाऊल जास्त मनःशांती देण्यासाठी व ग्राहकांना आकर्षक रिटेल वित्त योजना तसेच खरेदीतील जास्त सोयीस्करपणा देण्यासाठी होंडा नेटवर्कमध्ये उचलण्यात आले आहे. होंडा ग्राहकांना आता किंमतीच्या 100 टक्के कर्ज मिळवता येणार असून त्याचबरोबर कमी डाउन पेमेंट आणि 12,000* रुपयांपर्यंतची बचत अशा सुविधाही मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांना 20 पेक्षा जास्त डेबिट व क्रेडिट कार्डांच्या श्रेणीतून निवड करत ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. होंडाच्या विविध डीलरशीप्सकडे ऑनलाइन आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.
सुरक्षेला प्राधान्य देत कोव्हिड- 19 ची साखळी तोडण्याचे होंडाचे आवाहन
होंडा टुव्हीलर्स इंडियाने आपल्या सर्व कस्टमर टचपॉइंट्स येथे सर्वसमावेशक डीलरशीप ऑपेरशन्स रिझम्प्शन माहितीपुस्तिका वितरित केली आहे. होंडाची सर्व वितरक दालने आणि वर्कशॉप्स कोव्हिड- 19 ची साखळी तोडण्यासाठी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर तसेच सुरक्षा व आरोग्याच्या सर्व नियमांचे कसून पालन करत आहे.