- ई-लर्निंग सुविधेशी राज्यभर व्यापक प्रमाणात भागीदारी केल्याची घोषणा करणारे तामिळनाडू हे भारतातील राज्य ठरले
- तामिळनाडूतीलविविध सरकारी शाळांतील 1.5 दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आता मॅटिफिक ही ई-लर्निंग सुविधा उपलब्ध
मुंबई,: तामिळनाडू सरकारनेकिंडरगार्टन ते सहावी या इयत्तांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण पद्धतीने गणित शिकण्यास उत्तेजन देण्याच्या हेतूने, मॅटिफिक या ऑस्ट्रेलियन ई-लर्निंग सुविधेशी भागीदारी करून देशामध्ये डिजिटल शिक्षण साकार करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. या भागीदारीच्या निमित्ताने कंपनीने भारतात प्रायोगिक तत्त्वावर पहिलीवहिली अंमलबजावणी केली आहे. तामिळनाडूतील 1.5 दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांना आता मॅटिफिकसुविधा उपलब्ध होणार असून त्यामध्ये खेळांचे स्वरूप दिलेले हजारो उपक्रम आणि अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट कौशल्यांचा समावेश करणाऱ्या वर्कशीट यांचा समावेश असणार आहे.
स्टेमच्या (सायन्स टेक्नालॉजी इंजिनीअरिंग अँड मॅथेमॅटिक्स) बाबतीत तामिळनाडू प्रवर्तक असून गणित हा या सर्व कार्यांचा खऱ्या अर्थी गाभा आहे. स्टेम क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी वाढत असून, गणिताचे शिक्षण देण्यावर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये रुजवण्यासाठी, राज्य सरकारने गणिताची रुची वाढवण्यासाठी व पर्यायाने त्यातील शैक्षणिक गुणवत्ता वधारण्यासाठी सर्व सरकारी शाळांमध्ये मॅटिफिकची अंमलबजावणी केली आहे.
याविषयी बोलताना, शालेय शिक्षण मंत्री तिरू के. ए. सेंगोट्टेयनयांनी सांगितले, “मॅटिफिकच्या मदतीने राज्यातील 150हून अधिक शाळांमध्ये प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल 25.3% वाढला. तामिळनाडूतील सर्व विद्यार्थ्यांसाठीमॅटिफिक सादर करताना आणि भारतातील डिजिटल शिक्षणामध्ये आघाडी घेताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शिक्षण हे रंजक व कौशल्याभिमुख असावे, असे आम्हाला वाटते. विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढण्यासाठी, तसेच शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये रंजकता आणण्यासाठीमॅटिफिकयोगदान देऊ शकेल, असा विश्वास आहे.”
“देशात शैक्षणिक सुधारणा राबवण्यासाठी मुख्यमंत्री तिरु ई. पलनीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारेतामिळनाडूसरकार आघाडीच्या स्थानी आहे.शिक्षण मंत्री तिरू के. ए. सेंगोट्टेयन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूतील शिक्षण क्षेत्र प्रगती करत आहे आणि इतर राज्यांनाही त्यासाठी प्रेरणा देत आहे.तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्यातामिळनाडूने अत्याधुनिक शिक्षणासाठीही महत्त्वाचे केंद्र असल्याचे सिद्ध केले आहे. शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने तामिळनाडू हे राज्य भारतातील स्टेम क्रांतीमध्ये आघाडीवर राहणार आहे.तामिळनाडूसरकारशी भागीदारी करताना, तसेच संपूर्णतामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये मॅटिफिकसुविधेला उत्तेजन देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. यातून समाधानकारक परिणाम दिसून आल्याने भविष्यातही तामिळनाडूच्या यशामध्ये सहभागी होण्यासाठीमॅटिफिकउत्सुक आहे”,असेमॅटिफिक इंडियाचे व्हीपी राजीव कृष्णन म्हणाले.
गणित शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक नवनव्या व सुधारित पर्यायांच्या प्रतीक्षेत असताना, मॅटिफिकला शैक्षणिक निकाल व मुलांचा सहभाग या बाबतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. संपूर्ण प्रायोगिक प्रकल्पामध्ये, 150 हून अधिक शाळांनी स्थानिक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने गणिताचे धडे देण्यासाठीमॅटिफिकसुविधेचा वापर केला. परिणामी, 21,000 हून अधिक विद्यार्थ्यांना या सुविधेच्या मदतीने शिकवण्यात आले. पहिली ते सहावी या इयत्तांमध्ये सरासरी सुधारणा 25% झाली.
मॅटिफिकच्या प्रायोगिक अंमलबजावणीमुळेतामिळनाडूला भारतात गणिताच्या शिक्षणामध्ये मजबूत पाया निर्माण करणे शक्य झाले आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च शिक्षण घेणयाची, तसेच स्टेम करिअर करण्याची तयारी होणार आहे. त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे. शाळांसाठी प्रायोगिक प्रकल्पाच्या बाबतीत मॅटिफिकला मिळालेल्या यशाच्या अनुषंगाने,मॅटिफिक यापुढेहीशिक्षण मंत्री तिरू के. ए. सेंगोट्टेयन यांच्यासोबत काम करणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत मॅटिफिक वापरता यावे, या हेतूने तामिळमध्ये ही सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तामिळनाडूतील प्राथमिक डिजिटल गणिताचा स्रोत ठरण्यासाठी, शिक्षक व विद्यार्थी यांना भविष्यात लाभ मिळावा यासाठी सर्व शाळांमध्ये उपलब्ध होण्यासाठीमॅटिफिकउत्सुक आहे.तसेच, भारतातील अन्य राज्यांतील शाळांमध्येही प्रायोगिक प्रकल्प राबवण्याची संधी मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये अशाच प्रकारचे निकाल दिसून येतील, अशी अपेक्षा मॅटिफिकला आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः शोध लावून शिकावे, यास उत्तेजन देण्यासाठी, तसेच त्याच वेळी स्थानिक अभ्यासक्रमाचेही (ICSE/CBSE)पालन करण्यासाठी मॅटिफिकखेळांवर आधारित तत्त्वांचा वापर करते. प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ व अभ्यासक्रम तज्ज्ञ यांनी तयार केलेल्या मॅटिफिकमध्ये, प्रत्येक विद्यार्थी, समूह व वर्ग यांच्यासाठी विविध विषयांवरील निकाल देण्यासाठी तार्किक क्रमवारी व टप्पे यांचा वापर केला जातो. जगभर हजारो शिक्षक वापरत असलेले मॅटिफिक पालकांना दिलासा देते आणि विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव देते. कंपनीने होम मार्केटसाठी भारतात अलीकडेचमॅटिफिकगॅलेक्सी दाखल केले आहे.
मॅटिफिकविषयी:
मॅटिफिकया पुरस्कार-विजेत्या गणित ई-लर्निंग सुविधेला 60 हून अधिक देशांतील लाखो शिक्षक व विद्यार्थी यांनी पसंती दिली आहे आणि या सुविधेचे 40 हून अधिक भाषांमध्ये स्थानिकीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, तसेच गणिताची आवड लक्षणीय वाढवण्यासाठीमॅटिफिकउपयुक्त असल्याचे शैक्षणिक बाबतीत सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना घरी किंवा शाळेत गुंतवून ठेवण्यासाठी मॅटिफिक निरनिराळ्या उपक्रमांचा अवलंब करते.