नवी दिल्ली– भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी गृह वित्त कंपनी असलेल्या पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने गृह कर्ज आणि मालमत्तेवर दिल्या जाणाऱ्या कर्जासह एकंदर रिटेल कर्ज दरात 15 बेसिस पॉइंट्सची घट केली आहे. 9 मे 2020 पासून नवे दर अमलात येणार आहे. फेब्रुवारी 2020 च्या आधी फ्लोटिंग दराने कर्ज घेतलेल्या सर्व रिटेल ग्राहकांना याचा फायदा होणार असून कोव्हिड- 19 लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा व मदत मिळणार आहे.
पीएनबी हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीरज व्यास म्हणाले, ’75 बीपीएसने दरात कपात करण्याच्या आरबीआयच्या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला खात्री आहे, की दरातील ही घट आणि तीन महिन्यांच्या मुदतवाढीसह सर्व रिटेल ग्राहकांवरील कर्जाचा बोजा कमी होईल व या साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी विकासाची सकारात्मक भावना तयार होईल. या साथीवर मात करण्यासाठी ग्राहकांना मदत व्हावी आणि गृह क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे कंपनीच्या 2.5 लाख ग्राहकांना त्यांच्या कर्जाची मूळ रक्कम कितीही असली, तरी त्याचा लाभ घेता येईल.’
पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड
पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एनएसई- पीएनबीहाउसिंग, बीएसई – 540173) ही पंजाब नॅशनल बँकेतर्फे प्रमोट करण्यात आली असून नॅशल हाउसिंग बँकेकडे (एनएचबी) ती नोंदणीकृत गृह वित्त कंपनी आहे. कंपनीची 7 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली होती. कंपनीद्वारे रिटेल ग्राहकांना गृह आणि इतर कर्ज पुरवठा केला जातो. कंपनी बांधकाम वित्त कर्ज ते रियल इस्टेट डेव्हलपर्स क्षेत्रातही कार्यरत आहे. पीएनबी हाउसिंग फायनान्स ही ठेवी स्वीकारणारी गृह वित्त कंपनी आहे.