मुंबई – आयसीआयसीआय समूहाने आज कोव्हिड- 19 च्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाला मदत करण्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यापैकी 80 कोटी रुपये ‘पीएम केयर्स फंडासाठी’ दिले जाणार आहेत, तर 20 कोटी रुपये राज्य सरकारव स्थानिक प्रशासनाला या साथीविरोधात ते करत असलेल्या प्रयत्नांसाठी दिले जाणार आहेत. आयसीआयसीआय बँक आणि तिच्या सर्व उपकंपन्यांद्वारे ही 100 कोटी रुपयांची रक्कम उभारली जाणार आहे.
या उपक्रमाविषयीआयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. संदीप बात्रा म्हणाले, ‘आयसीआयसीआय समूहाने देशाला कायमच सुख- दुःखात साथ दिली आहे. कोव्हिड- 19 च्या उद्रेकामुळे देश व नागरिकांसमोर अनपेक्षित आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित राहून आव्हानावर मात करण्याची गरज आहे.’
‘पीएम केयर्स फंड’ तसेच राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला केली जाणारी मदत हा आमच्या या साथीविरोधात केंद्रीय सरकार तसेच स्थानिक प्रशासन घेत असलेल्या प्रयत्नांशी बांधिलकीचा एक भाग आहे. हा आघाडीवर राहून लढणाऱ्या लोकांच्या धाडसाला केलेला नम्र सलाम आहे. आम्हाला खात्री आहे, की आपला देश ही लढाई जिंकण्यात यशस्वी होईल.
राज्य सरकार आणि इतर प्रशासनाला दिल्या जाणाऱ्या योगदानाचा एक भाग म्हणून आयसीआयसीआय समूहाचा सीएसआर विभाग असलेले आयसीआयसीआय फाउंडेशन देशाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे.
आयसीआयसीआय समूहाने आतापर्यंत 2.13 लाख सर्जिकल मास्क, 40,000 एन95 मास्क आणि 20,000 लीटर्स सॅनिटायझर्स, 16,000 ग्लोव्ह्ज, 5,300 पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) सुट्स, 2600 प्रोटेक्टिव्ह आय गियर्स आणि 50 थर्मल स्कॅनर्स व 3 नॉन- इनव्हेसिव्ह प्रकारचे व्हेंटिलर्स त्यादी उपकरणे विविध राज्य सरकार आणि हॉस्पिटल्सना दिली आहेत. समूहाद्वारे यापुढेही कोव्हिड- 19 विरोधात आघाडीवर राहून लढणाऱ्यांना अशीच मदत केली जाईल.
आयसीआयसीआय बँक केंद्रीय सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेलाही डिजिटल पातळीवर निधी गोळा करण्याच्या कामात मदत करत आहे. बँकेला पीएम केयर्स फंडासाठी निधी गोळा करण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्याशिवाय काही राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांनीही बँकेला निधी/योगदान स्वीकारण्यासाठी अधिकार दिला आहे.