पुणे-
पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. ने (पिडीलाइट) आज कोव्हिड- 19 रिलीफ फंडासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. हे योगदान केंद्रीय तसेच राज्याच्या इतर आपत्कालीन रिलीफ फंडास कोव्हिड- 19 विरोधातील लढ्यासाठी दिले जाणार आहेत.
पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. चे व्यवस्थापकीय श्री. भरत पुरी म्हणाले, ‘आम्ही भारतातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसेच या साथीविरोधात लढण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांनाही आमची पूर्ण साथ आहे. आम्ही यापुढेही आमचे भागीदार व कर्मचाऱ्यांच्या काळजी घेत राहू आणि सरकारद्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या विविध रिलीफ फंडांसाठी भरीव पाठिंबा देत राहू.’