मुंबई, 1 एप्रिल 2020 – स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आज भारतातील कोविड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी मदत म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. समाजात खरा बदल घडवून आणण्याचे आपले तत्व जपत आणि या साथीविरोधातील लढ्यास चालना मिळावी म्हणून बँक विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर (एनजीओ) भागिदारी करून स्थलांतरित कामगारांसारख्या उपेक्षित वर्गाला मदत करणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात बँक युनायटेड वे ऑफ मुंबई, स्वदेस फाउंडेशन आणि सीआयआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने समाजातील कोविड- 19 चा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि अर्थार्जनापासूनही दूर राहावे लागत असलेल्या गरजू लोकांना अन्नधान्य, जेवण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, कारण लॉकडाउनमुळे आर्थिक कामकाज पूर्णपणे बंद आहे.
बँकेतर्फे हा उपक्रम देशाच्या प्रमुख शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि बडोदा) तसेच ग्रामीण भाग (सुंदरबन, जयपूर, टाँक आणि मराठवाडा) इत्यादी ठिकाणी राबवला जाणार आहे.
या तीन भागिदारांच्या माध्यमातून बँकेने वर नमूद केलेल्या ठिकाणच्या किमान 70 हजार लाभार्थींना अन्नधान्य, जेवण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या बांधिलकीविषयी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला म्हणाल्या, ‘कोविड- 19 हे प्रत्येक सीमा ओलांडत असलेले आव्हान आहे. या साथीमुळे रोजंदारीवर जीवन जगणाऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. या देशात गेल्या 160 वर्षांपासून कार्यरत असलेली बँक या नात्याने कोविड- 19 विरोधातल्या लढ्यात सहभागी होणे आणि नागरिक व समाजासाठी सुरक्षित तसेच निरोगी वातावरण तयार करणे हे आमचे कर्तव्य आहे.’
याचाच एक भाग म्हणून आम्ही ‘हियर फॉर गुड’ हे आमच्या ब्रँडचे आश्वासन प्रत्यक्षात आणत समाजात बदल घडवून आणणार आहोत.
स्टँडर्ड चार्टर्डबद्दल
आम्ही आघाडीचा आंतरराष्ट्रीय बँकिंग समूह असून जगातील सर्वात दमदार अशा 59 बाजारपेठांमध्ये आम्ही कार्यरत राहून आणखी 85 ठिकाणच्या ग्राहकांना सेवा देत आहोत. आमच्या अभिनव वैविध्यपूर्णतेतून व्यापार व समृद्धीला चालना देणे आणि वारसा व मूल्यांच्या माध्यमातून ब्रँडचे ‘हियर फॉर गुड’ हे आश्वासन व्यक्त करणे हे आमचे ध्येय आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड ही लंडन आणि हाँग काँग शेअर बाजारात तसेच भारतातील मुंबई आणि राष्ट्रीय बाजारातील नोंदणीकृत पीएलसी आहे.