नवी दिल्ली – उर्जा क्षेत्रातील आघाडीची एनबीएफसी असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि. (पीएफसी) कंपनीने पंतप्रधानांच्या सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमरजन्सी सिच्युएशन फंडासाठी (पीएम- केयर्स फंड) 200 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. हा फंड कोविड- 19 विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
त्याशिवाय पीएफसीचे कर्मचारी आपला एका दिवसाचा पगार ‘पीएय- केयर्स फंडासाठी’ देण्यात येणार असून या मदतीमुळे करोना साथीविरोधात लढण्यासाठी देशाला बळ मिळेल.
यापूर्वी पीएफसीने राजस्थानमधील इंडियन रेड क्रॉस सोसायटीसाठी 50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे मान्य केले होते. सीएसआर उपक्रमांतर्गत पीएफसीची आर्थिक मदत कोविड- 19 विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझर्सचे वितरण करण्यासाठी वापरली जाणार आहे.
पीएफसी आणि त्यांचे कर्मचारी या कठीण काळात सर्व प्रकारची सावधगिरी बाळगत असून खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे आहेत. एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने पीएफसी या साथीविरोधात लढण्यासाठी आवश्यक त्य सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करत आहे.