विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेली वजनाने अत्यंत हलकी पॉवर बँक देते जलद चार्जिंगची खात्री
मुंबई – सिस्का अॅक्सेसरीज या मोबाइल अॅक्सेसरीज विभागामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने देणा-या अग्रणी कंपनीने नवीन ‘P0511J’ पॉवर बँकच्या सादरीकणाची घोषणा केली. या पॉवर बँकमध्ये ५००० एमएएच क्षमता आणि उच्च ऊर्जा घनता असलेली पॉलिमर बॅटरी आहे. सिस्का मोबाइल अॅक्सेसरीज उच्च दर्जाच्या उत्पादनांची व्यापक रेंज देते. यामध्ये वायरलेस स्पीकर्स, वायरलेस हेडसेट्स, इअरफोन्स, कार चार्जर्स अशा उत्पादनांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस व सुधारित तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता पॉवर बँक बाजारपेठेमध्ये वाढ होताना दिसत आहे. पॉवर बॅक्स स्मार्टफोनमधील बॅटरी न बदलण्यासाठी एक कमी खर्चिक पर्याय आहेत. या नाविन्यपूर्ण युगामध्ये सिस्का उच्च समकालीन तंत्रज्ञान सादर करत आहे, जे वेळेची बचत करते आणि अधिकतम लाभ देते. इंटेलिजण्ट मल्टी-प्रोटेक्शन सर्किटसह तयार करण्यात आलेली पॉवर बँक सुरक्षित चार्जिंगची खात्री देण्यासोबत ओव्हरचार्जपासून स्वत:चे संरक्षण करते. धातूयुक्त पृष्ठभाग असलेल्या या पॉवर बँकमध्ये मायक्रो यूएसबी इनपुट व यूएबी आऊटपुट पोर्ट आहे. ज्यामधून डिवाईस जलदपणे चार्ज होण्याची खात्री मिळते.
या सादरीकरणाबाबत बोलताना सिस्का ग्रुपच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्स्ना उत्तमचंदानी म्हणाल्या, ”काळासह पोर्टेबल पॉवर बॅक्स प्रत्येक स्मार्टफोन युजरसाठी आवश्यक अॅक्सेसरी बनल्या आहेत. खरेतर पोर्टेबल पॉवर बॅक्सने स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरासह युजर्ससाठी पहिली पसंती म्हणून स्थान निर्माण केले आहे. सिस्कामध्ये आम्ही कोणतेही नवीन उत्पादन सादर करण्यापूर्वी बाजारपेठेचे सखोल संशोधन करतो. सिस्का ‘P0511J’ पॉवर बँक चालता-फिरता सुसंगत व कार्यक्षम आणि परवडणा-या किंमतीमधील उत्पादनांचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी निर्माण करण्यात आली आहे.”
सिस्का P0511J पॉवर बँकची प्रमुख वैशिष्ट्ये:
पॉकेट साइज – सिस्का ‘P0511J’ पॉवर बँक वजनाने अत्यंत हलकी आहे. तिचे वजन ११० ग्रॅम आहे आणि खिशामध्ये सहजपणे मावू शकते. हे उत्पादन विविध रंगांमध्ये येते.
प्लग अॅण्ड प्ले एलईडी बॅटरी इंडिकेटर – सिस्का पॉवर बँकमध्ये आता बॅटरीच्या स्थितीबाबत उत्तम माहिती मिळण्यासाठी एलईडी इंडिकेटरची भर करण्यात आली आहे, जे प्लग-इनच्या वेळी पॉवरची स्थिती दाखवते. पॉवर बँकमधील बॅटरी दीर्घकाळापर्यंत टिकून राहते.
इंटेलिजण्ट मल्टी–प्रोटेक्शन सर्किट – सिस्का पॉवर बँकमध्ये इंटेलिजण्ट सर्किटची भर करण्यात आली आहे. हे सर्किट सुरक्षित चार्जिंगच्या खात्रीसाठी समान विद्युतधारा वाहण्याची खात्री देते.
जलद चार्जिंगसह प्रगत विद्युतप्रवाह बदल – सिस्काची P0511J पॉवर बँक विद्युतप्रवाहामध्ये बदल करू शकते. ज्यामुळे पॉवर बँक एकाच वेळी स्वत: चार्ज होण्यासह इतर डिवाईसना देखील चार्ज करते आणि अधिकतम हिटिंग किंवा बॅटरी बॅकअप्स कमी होणे अशा गंभीर नुकसानापासून बॅटरीचे संरक्षण करते.
ओव्हरचार्ज व डिस्चार्ज प्रोटेक्शन – डिवाईस पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर वीजप्रवाह बंद केला नाही तर हे गॅझेट ”ओव्हरचार्ज व डिस्चार्ज प्रोटेक्शन” वैशिष्ट्यासह वीजप्रवाह खंडित करते. तसेच हे वैशिष्ट्य सर्किटच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित विद्युतप्रवाहाच्या पलीकडे गेल्यास आऊटपुट त्वरित बंद करते.
मल्टीपल कॉम्पॅटिबल व प्रवासामध्ये अनुकूल – या पॉवर बँकमध्ये इनपुट व आऊटपुटसाठी एक मायक्रो यूएसबी (डीसी ५ व्होल्ट/२ अॅम्पियर) सारखे विविध कनेक्टर्स आहेत. हे उत्पादन डिजिटल कॅमेरे, गेमिंग कन्सोल्स, आयपॉड्स, एमपी३/एमपी४ प्लेअर्स, टॅब्लेट्स, ब्ल्यूटूथ स्पीकर्स, हेडफोन्स, अँड्रॉईड किंवा आयफोन्स अशा व्यापक डिवाईसेसशी सुसंगत आहे. पॉवर बँक वजनाने हलकी असून प्रवासादरम्यान सहजपणे वाहून नेता येऊ शकते.
उच्च घनतेची पॉलिमर बॅटरी: – सिस्का पॉवर बँकमध्ये ५००० एमएएच क्षमतेची सुरक्षित बॅटरी, मल्टी-प्रोटेक्शन सर्किट आहे. तसेच ही बॅटरी दीर्घकाळापर्यंत टिकते. या पॉवर बँकमध्ये ओव्हरचार्जिंगसाठी डिस्चार्जिंग संरक्षणाची प्रगत यंत्रणा आहे.
६ महिन्यांची वॉरण्टी – P0511J पॉवर बँक कोणत्याही उत्पादन दोषांसाठी ६ महिन्यांच्या वॉरंटीसह येते. उत्पादन खरेदी केल्याच्या तारखेपासून ही वॉरंटी लागू असेल.
सिस्का पॉवर बॅक बहुकार्यक्षम असण्यासह खिशामध्ये सहजपणे मावते. ही पॉवर बँक प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्ये ११९९/- रूपयांमध्ये उपलब्ध आहे. ही पॉवर बँक रेड, ब्लू व सिल्व्हर अशा रंगांमध्ये येते.
सिस्का अॅक्सेसरीज बाबत
आजचे युग हे कनेक्टेड आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या जीवनामध्ये डिवाईसेसशी जुळलेले आहेत. सिस्का अॅक्सेसरीज तुम्हाला संपन्न अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रगत अॅक्सेसरीजची व्यापक रेंज देते. वायरलेस स्पीकर्स ते हेडसेट्सपर्यंत हा विभाग उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि वापरण्यास सुलभ असे आधुनिक इनोव्हेशन्स देतो. सिस्का अॅक्सेसरीज उत्पादने उच्च दर्जाची आहेत आणि त्यांच्या किंमती देखील परवडणा-या आहेत. डायनॅमिक ग्राहकवर्गाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सिस्का अॅक्सेसरीज सामान्य ट्रेड, आधुनिक ट्रेडमधील प्रमुख रिटेल आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स व्यासपीठांवर उपलब्ध आहेत.