- नवीन एलडब्ल्यूबी जीएलई ३०० डी साठी स्टार ईज पॅकेज दोन वर्षे / अमर्यादित किमी साठी ८३,२०० रुपयांपासून पुढे तर एलडब्ल्यूबी जीएलई ४०० डी (हिप-हॉप) साठी दोन वर्षे / अमर्यादित किमी साठी ८९,१०० रुपयांपासून पुढे.
- नवीन एलडब्ल्यूबी जीएलई ३०० डी ची किंमत ७३.७० लाख रुपये तर एलडब्ल्यूबी जीएलई ४०० डी (हिप-हॉप) ची किंमत १.२५ करोड रुपये (सर्व किमती एक्स-शोरूम, भारत)
नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेंझ इंडियाने आज आपली नवीन जीएलई सादर केली. मोठा व्हील बेस हे या नवीन जीएलईचे खास वैशिष्ट्य आहे. भारतातील सध्याच्या एसयूव्ही गाड्यांमधील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवीन एलडब्ल्यूबी जीएलईमध्ये ऑन आणि ऑफ रोड अशा दोन्ही प्रकारच्या ड्रायविंगचा सर्वोत्तम अनुभव देतील अशी सर्व वैशिष्ट्ये आहेत. लॉन्ग व्हील बेसमुळे नवीन जीएलईची अंतर्गत सजावट आणि व्यवस्था अशाप्रकारच्या आधीच्या गाड्यांच्या तुलनेत खूप आरामदायी, शानदार, आलिशान, भरपूर मोठी आहे. ऑफ-रोडर हे वैशिष्ट्य सार्थ ठरवणाऱ्या एलडब्ल्यूबी जीएलईमध्ये खास मर्सिडीझ-बेंझ डिझाईन देखील कायम राखण्यात आले आहे. अंतर्गत सजावटीमध्ये शानदार आणि सुबक रचनेचा उत्कृष्ट मेळ साधला गेला आहे. डिजिटल हाय-टेक एमबीयूएक्स सिस्टिम हे नवीन एलडबल्यूबी जीएलईचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. आज नवी दिल्लीत मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क आणि सेल्स व मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट संतोष अय्यर यांच्या हस्ते नवीन जीएलईचे अनावरण करण्यात आले.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी यावेळी सांगितले, “मर्सिडीझ-बेन्झमध्ये आम्ही ग्राहकांच्या नेमक्या इच्छा, आवडीनिवडी अगदी पुरेपूर जाणतो आणि त्यानुसार त्यांना सर्वोत्तम अनुभव देतील अशी उत्पादने तयार करणे हा प्रयत्न आम्ही कायम करत असतो. या प्रयत्नांमध्ये आम्हाला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण यशाचे उत्तम उदाहरण म्हणजे जीएलई. जीएलईच्या चौथ्या पिढीतील गाडीचा लॉन्ग व्हील बेस लक्झरी एसयूव्ही विभागात एक नवा मापदंड ठरेल हे निश्चित. नवीन जीएलई लॉन्ग व्हीलबेस केबिनच्या आतील जागा देखील अधिक मोठी आणि अधिक शानदार बनली आहे. खासकरून मागे बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीत अभूतपूर्व आराम आणि शान अनुभवता येईल. शान आणि आराम या व्यतिरिक्त नवीन एलडब्ल्यूबी जीएलईमध्ये नाविन्यपूर्ण ड्रायविंग असिस्टंट्स, नवीन इंजिन श्रेणी आणि पर्मनन्ट ४मॅटीक ऑल-व्हील ड्राईव्ह असल्यामुळे वेग आणि ऑफ-रोडर म्हणून दमदार कामगिरी बजावण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की नवीन एलडब्ल्यूबी जीएलईमुळे मर्सिडीझ-बेन्झचा लक्झरी एसयूव्ही क्षेत्रातील दबदबा अधिक जास्त वाढेल, लक्झरियस म्हणून या गाडीची निवड अगदी योग्य ठरेल. नवीन एलडब्ल्यूबी जीएलईमध्ये इंट्यूटिव्ह इंफोटेन्मेन्ट सिस्टिम, एमबीयूएक्स, केबिनच्या आत सर्वोत्तम आराम आणि आदर्श म्हणावी अशी ड्रायविंग कामगिरी हे सर्व लाभ मिळवता येतील.”
श्वेन्क यांनी पुढे सांगितले, “रेस्टलेस फॉर टुमॉरो हा ब्रँड मंत्र घेऊन आम्ही २०२० मध्ये पाऊल टाकले. इक्यू ब्रँड सादर करून या रोमांचक प्रवासाचा शुभारंभ झाला आणि आता जीएलई लॉन्च करून एक मोठा टप्पा आम्ही गाठत आहोत. खास भारतीय बाजारपेठ आणि भारतीय ग्राहकांसाठी बनवण्यात येणाऱ्या आमच्या उत्पादन श्रेणीची सुरुवात नवीन एलडब्ल्यूबी जीएलईपासून करत आहोत. आमच्या अभिरुचीसंपन्न आणि चोखंदळ ग्राहकांसाठी नवनवीन उत्पादने सादर करण्याच्या वचनबद्धतेचे आम्ही पुरेपूर पालन करत आहोत. भारतात सुरुवात झाल्यापासून जीएलईच्या १३००० हुन जास्त गाड्या विकल्या गेल्या आहेत. भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक विकली जाणारी लक्झरी एसयूव्ही म्हणून जीएलईला नावाजले जाते. शहरी वातावरणात दमदार कामगिरी आणि प्रीमियम अनुभव अशी इच्छा आणि अनोख्या, अभूतपूर्व सफरीची आवड असलेल्या चोखंदळ ग्राहकांसाठी नवीन एलडब्ल्यूबी जीएलई बनवली गेली आहे. लक्झरी एसयूव्ही विभागात सर्वाधिक आकर्षक अशी नवीन एलडब्ल्यूबी जीएलई लक्झरी कार ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरचे स्थान भुषवेल याची आम्हाला खात्री आहे.”
जीएलईमधील सर्वात महत्त्वाचे नावीन्य
लॉन्ग व्हील बेस: नवीन एलडब्ल्यूबी जीएलईचा व्हील बेस आधीच्या जीएलईपेक्षा ८० एमएम अधिक रुंद असून आता याची एकूण लांबी १०५ एमएम आहे. यामुळे ही गाडी अधिक जास्त आलिशान आणि आरामदायी बनली आहे. जीएलईच्या नवीन एलडब्ल्यूबी डिझाईनमुळे इतर अनेक लाभ मिळतात. खासकरून मागे बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीत अभूतपूर्व आराम आणि शान अनुभवता येईल. दुसऱ्या रांगेतील लेगरूम आधीच्या गाडीपेक्षा ६९ एमएमने वाढली आहे. पुढच्या बाजूस नवीन जीएलईची हेडरूम ३५ मिलिमीटरने वाढली आहे. मागच्या सीटला देखील ३० अंशात झुकवता येऊ शकते, त्यामुळे प्रवास अधिक जास्त आरामात करता येईल.
ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल – ४८व्ही सस्पेन्शन: ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल सस्पेन्शनमुळे फ्री-ड्रायविंग मोडसारखी राईड आणि वेग यात जास्त आराम देणारी वैशिष्ट्ये यामध्ये अनुभवता येतात. यासोबत आता नव्याने विकसित करण्यात आलेले एअरमॅटीक एअर सस्पेन्शन देखील जोडण्यात आलेले आहे. जीएलई ४०० डी मध्ये ही मार्केटमधील एकमेव यंत्रणा असून ज्यामध्ये स्प्रिंग व डॅम्पिंग फोर्सेस हे प्रत्येक चाकावर व्यक्तिशः नियंत्रण ठेऊ शकतात. याचा अर्थ असा की हे फक्त बॉडी रोलला काउंटरऍक्ट करत नाही तर पिचिंग व स्क्वाटला देखील करते.
एमबीयूएक्स: अंतर्ज्ञान तंत्रावर आधारित संचालन
हावभाव, स्पर्श किंवा व्हॉईस कंट्रोल सिस्टिममार्फत गाडी आणि तिच्या फंक्शन्ससोबत संवाद साधण्यावर भर दिला जातो. मर्सिडीझ-बेंझ युजर एक्स्पीरियंसच्या सर्वाधिक नवीन टेलिमॅटिक्स आवृत्तीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. इंट्यूटिव्ह लॉजिक आणि ऑपरेटिंग पर्यायांची विशाल श्रेणी हे याचे खास वैशिष्ट्य आहे. जीएलईच्या इंफोटेंमेंट सिस्टिमसोबत पाच वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधता येतो:
- मध्यभागी असलेल्या मल्टिमीडिया डिस्प्लेवर टच कंट्रोलमार्फत
- मल्टिफंक्शन स्टिअरिंग व्हीलवरील टच कंट्रोल बटन्स वापरून
- सेंटर कन्सोलवर मल्टिफंक्शन टचपॅड मार्फत
- व्हॉईस कंट्रोल मार्फत – स्टिअरिंग व्हीलवर टॉक बटन आहे किंवा “हे मर्सिडीझ” प्रॉम्प्ट देखील वापरता येते.
सुधारित व्हॉईस कंट्रोल सिस्टिममुळे ऑपरेशन जास्त सुविधाजनक आणि वास्तविक पद्धतीने करता येऊ शकते. व्हॉईस कमांड देऊन ड्राइवर सिस्टिमला टेक्स्ट मेसेजेस वाचायला सांगू शकतात, ऑडिओ सिस्टिम्स चालवू शकतात, क्लायमेट कंट्रोल सिस्टिमसारखी गाडीतील फंक्शन्स चालवू शकतात. या सिस्टिमला मेमराईज्ड कमांड्सची गरज नसते, त्यामुळे युजरला अधिक जास्त सहजपणे कमांड्स देता येतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणाचा पत्ता समजून घ्यायचा असेल किंवा हवामानाविषयी माहिती जाणून घ्यायची असल्यास ड्राइवर या सुविधेचा वापर अधिक सहजपणे करू शकतात. “हे मर्सिडीझ” प्रॉम्प्ट वापरून देखील व्हॉईस कंट्रोल ऍक्टिव्हेट करता येतो. यासाठी स्टिअरिंग व्हीलवरील टॉक बटन देखील वापरले जाऊ शकते.
ड्रायविंग असिस्टंस सिस्टिम्स – टेलबॅक्समध्ये अतिशय चांगला सपोर्ट: नवीन जीएलईमध्ये मर्सिडीझ-बेंझ ड्रायविंग असिस्टंस सिस्टम्सची नवीन आवृत्ती बसविण्यात आली आहे ज्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवताना खूप मोलाची मदत मिळते. आधीच्या मॉडेलपेक्षा या गाडीत ऍक्टिव्ह सेफ्टीची लेव्हल वाढवली गेली आहे, इतकेच नव्हे तर, यातील इंटेलिजंट ड्राईव्ह फंक्शन्स देखील अतुलनीय आहेत.
ऍक्टिव्ह ब्रेक असिस्टमुळे रस्ता क्रॉस करणारे लोक आणि सायकलस्वार यांना टक्कर आणि अपघात होण्याचे टाळण्यात तुम्हाला मदत मिळते. अंतर आणि टक्कर याबाबत इशारा देण्याबरोबरीनेच जर तुम्ही अपुऱ्या ताकदीने ब्रेक्स लावत असाल तर स्थितीनुसार ब्रेक बुस्टिंग करण्याचे काम देखील यामध्ये केले जाते. जर तुम्ही प्रतिक्रिया दिली नाही तर यामध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सुरु करण्याची देखील क्षमता असते. पुढे धावत असलेल्या, थांबलेल्या गाड्या, रस्ता क्रॉस करणारे लोक आणि सायकलस्वार यापैकी कोणी जर तुमच्या गाडीपासून धोकादायक अंतरावर असेल तर ते ओळखण्याची क्षमता ऍक्टिव्ह ब्रेकिंग असिस्टमध्ये असते. शहरी भागात गाडीच्या वेगाला अनुकूल अशी ही फंक्शन्स आहेत. परंतु अधिक जास्त वेगात असताना देखील ही सिस्टिम कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांबाबत प्रतिक्रिया देऊ शकते. अपघात टाळणे किंवा निदान त्यांची गंभीरता तरी कमी करणे हे याचे उद्धिष्ट आहे.
ब्लाइंड स्पॉट असिस्ट सिस्टिम तुम्हाला खूप क्लोज लुक मिळवून देते, खासकरून जेव्हा तुम्ही टर्न इंडिकेटर ऍक्टिव्हेट करता तेव्हा याचा खूप उपयोग होतो. एखाद्या ब्लाइंड स्पॉटवर टक्कर किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होताच तुम्हाला दिसेल आणि ऐकू येईल असा इशारा ही सिस्टिम देते. ट्रिपनंतर देखील ही सिस्टिम अलर्ट राहते आणि जर तुम्ही चुकीच्या वेळी दरवाजा उघडला तर तुम्हाला इशारा देते. ब्लाइंड स्पॉट असिस्टमुळे तुम्हाला दोन अतिरिक्त रडार सेन्सर्स पुढील बंपरमध्ये फिट करून मिळतात. यामुळे ही सिस्टिम केवळ कार नव्हे तर ब्लाइंड स्पॉटला एखादी दुचाकी असेल तरी ओळखू शकते. गाडी डिटेक्ट झाल्यावर योग्य बाजूच्या बाहेरच्या आरशावर लाल त्रिकोण लाईट दिसू लागतो. जर इंडिकेटर देखील ऍक्टिव्हेटेड असेल तर ब्लाइंड स्पॉट असिस्ट तुम्हाला संभावित टक्कर चा ऐकू जाईल असा इशारा देते. यामुळे लेन बदलणे, वाहतुकीमध्ये आत शिरणे, बाहेर येणे यासारख्या धोकादायक स्थितीमध्ये देखील तुम्ही सुरक्षित राहू शकता.
४मॅटीक ऑल-व्हील ड्राईव्ह: ९जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनने शक्ती पुरवली जाते. १ ते ९ असा गिअर्सचा व्यापक रेशो उपलब्ध असल्यामुळे इंजिनच्या वेगात स्पष्टपणे जाणवेल इतकी घट करता येते. यामुळे इंजिनची क्षमता वाढते तसेच गाडी चालवताना अधिक जास्त आराम मिळतो. चार सिलिंडर इंजिनमुळे ट्रान्सफर केससोबत ४मॅटीक ऑल-व्हील ड्राईव्हचा अनुभव घेता येतो, ५०:५० टक्क्यांच्या फिक्स्ड रेशोमध्ये ड्राईव्ह टॉर्क ट्रान्स्मिट होतो.
अंतर्गत व्यवस्था – मागील आणि तिसऱ्या रांगेत अधिक जास्त जागा: आधीच्या मॉडेलपेक्षा (२९९५ एमएम, ८० एमएम जास्त) नवीन जीएलईमध्ये अधिक जास्त व्हील बेस आहे. यामुळे मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक जास्त जागा झाली आहे. दुसऱ्या रांगेतील लेगरूम ६९ एमएमने वाढून १०४५ एमएम झाली आहे. मागील रांगेतील स्टॅंडर्ड, फिक्स्ड सीट सोबत हेडरूम आणि ४०:२०:४० प्रमाणात विभागले गेलेले बॅकरेस्ट हे ३३ एमएमने वाढून १०२५ एमएम बनले आहे. ए-पिलर आधीपेक्षा जास्त अपराईट झाल्यामुळे पहिल्या रांगेतील मोकळी जागा आणि गाडीत शिरण्यातील सुविधा अधिक जास्त वाढली आहे. मागील साइट्सच्या मागे ८२५ लिटर सामान ठेवता येते तर दुसऱ्या रांगेतील सीट्स फोल्ड डाऊन केल्यास २०५५ लिटर सामान ठेवले जाऊ शकते.
बाह्य रचना: शक्ती, प्रभाव, शान
ऑन आणि ऑफ रोड मध्ये आधुनिक लक्झरीचा अभूतपूर्व अनुभव: नवीन जीएलईचा हा डिझाईन मंत्र आहे. लांब व्हील बेस, शॉर्ट ओव्हरहॅन्गस आणि मोठे, फ्लश-फिटेड व्हील्स यामुळे या गाडीत अतिशय आरामात प्रवास करता येतो, रस्ता कसाही असो, प्रवास अगदी छान होतो यात काहीच शंका नाही. जीएलईमध्ये मोहक शुद्धता हे रचना धोरण अवलंबिले गेले आहे. काळजीपूर्ववक बनवले गेलेले पृष्ठभाग याच्या सुबक ग्राफिक एलिमेंट्ससोबत खुलून दिसतात.
दिवसा व रात्रीच्या प्रवासासाठी अनोखे हेडलॅम्प डिझाईन या गाडीचा प्रभाव वाढवते. मागील बाजूच्या लाईट्स दोन सेक्शन्समध्ये विभागल्या गेल्या आहेत, यामुळे भरपूर प्रकाश तर पडतोच शिवाय रात्रीच्या अंधारात देखील अजिबात चुकवले जाऊ शकत नाही असे डिझाईन तयार होते. मर्सिडीझ-बेंझ एसयूव्हीची ओळख असलेले इल्युमिनेटेड ब्लॉक्स यातही आहेत. त्याशिवाय बॅकलिट एज लायटिंगची सुविधा आहे.
एरोडायनामिक्स: या श्रेणीतील सर्वोत्तम सीडी (Cd) फिगरसाठी तपशीलवार फाईन-ट्युनिंग
नवीन जीएलईमध्ये ०.२९ पासून सुरु होणारे सीडी असून हे या विभागातील सर्वोत्तम आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही देखील एक लक्षणीय सुधारणा आहे (सीडी ०.३२). चांगल्या एरोडायनामिक्समुळे दैनंदिन वापरातही कमी इंधन वापरले जाते.