मुंबई: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील एका आघाडीच्या कंपनीने RD Edge Pro 190 PDS INV 5.2 मॉडेलसाठी ‘नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला आहे. ऊर्जाक्षमतेसाठी बाजारात आघाडी घेणाऱ्या आणि वर्षभरात ऊर्जाबचतीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या ऊर्जाक्षम अप्लायन्सेसना नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्डने गौरवले जाते. सलग तिसऱ्या वर्षी या ब्रँडने रेफ्रिजरेटर श्रेणीतील नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड (गोल्ड) पटकावला आहे आणि गोदरेज ऊर्जाक्षमता क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले आहे.
समृद्ध जगण्याच्या आमच्या आश्वासनाच्या अनुषंगाने, गोदरेज अप्लायन्सेसने ग्राहकांना पर्यावरणपूरक, ऊर्जाक्षम अप्लायन्सेस देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. एज प्रो इन्व्हर्टर रेंज ही देशातील आजची सर्वात ऊर्जाक्षम सिंगल डोअर डायरेक्ट कूल रेंज असून, त्यामुळे ग्राहकांना 10 वर्षांच्या कालावधीमध्ये 3-स्टार रेफ्रिजरेटरपेक्षा अधिक, 9300 रुपयांहून अधिक बचत करण्याची संधी मिळणार आहे.
पुरस्काराविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले, “बीईईसारख्या प्रतिक्षित संस्थेकडून आणि सलग तीन वर्षे हा पुरस्कार मिळाला, ही अत्यंत आंनदाची बाब आहे. रेफ्रिजरेटर असो किंवा एअर कंडिशनर असो, कंपनीच्या अप्लायन्सेसमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी गोदरेजने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही पोचपावती आहे. गोदरेज ही सीएफसी-मुक्त रेफ्रिजरेटर, ग्रीनेस्ट एअर कंडिशनर्स व ग्रीन उत्पादन अशा चांगल्या व ग्रीन उत्पादनांद्वारे अप्लायन्सेसच्या क्षेत्रामध्ये प्रवर्तक व संशोधक म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही ऊर्जाक्षमतेच्या बाबतीत नवे विचार मांडतो आणि दरवर्षी कार्यक्षमतेचे बेंचमार्क निर्माण करत आहोत. सोच के बनाया है या आमच्या ब्रँडच्या विचारसरणीनुसार आम्ही भविष्यातही यामध्ये सातत्य ठेवणार आहोत.”
पुरस्कार स्वीकारताना गोदरेज अप्लायन्सेसचे रेफ्रिजरेटर्स – प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “सलग तिसऱ्या वर्षी रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये ‘नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकल्याचा आम्हाला अतिशय आनंद व अभिमान वाटतो. एज प्रो रेंजने सिंगल डोअर रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये आमचे स्थान सक्षम होण्यासाठी मदत झाली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटरमध्ये या श्रेणीचे योगदान 77% आहे. ट्रेड व त्यासारख्या ग्राहकांनी या उत्पादनांचे जोरदार स्वागत केले आहे. या उत्पादनांचे उत्तम डिझाइन व उच्च कामगिरी यांचे हे प्रतिक आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. गोदरेज Edge Pro 190 PDS INV 5.2 मॉडेल हा या दिशेने केलेला आणखी एक प्रयत्न आहे.”