- शेतीशी संबंधित कण्टेण्ट पोस्ट करून शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम दर्शवण्यासाठी युजरना उत्तेजन
- उपमुख्यमत्री, शेती मंत्री व कायदा मंत्री अशा तामिळनाडूतील मान्यवरांनी या कॅम्पेनमध्ये घेतला सहभाग
नवी दिल्ली: देशातील ‘अन्नदातां’चा न संपणारा उत्साह व प्रेरणा यांना सलाम करत, हॅलो या भारतातील सर्वात मोठ्या प्रादेशिक सोशल मीडिया सुविधेने किसान दिवसाच्या निमित्ताने #सॅल्युटटूफार्मर्स / #किसानों को सलाम ही विशेष कॅम्पेन दाखल केली आहे. या विशेष कॅम्पेनच्या निमित्ताने, हॅलो भारतातील शेतकऱ्यांची दखल घेणार आहे व त्यांचा गौरव करणार आहे. ही कॅम्पेन हॅलोच्या 50 दशलक्षहून अधिक युजरना शेतीशी संबंधित कण्टेण्ट पोस्ट करून, शेतकरी करत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानून शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम व पाठिंबा दर्शवण्यासाठी उत्तेजनही देते.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओट्टकरातेवर पन्नीरसेल्वम, तामिळनाडूचे शेती व पशुपालन मंत्री आर. दोराईक्कण्णू व कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम या मान्यवरांसह 11,000 हून अधिक हॅलो युजर्सनी शेतकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी #सॅल्युटटूफार्मर्स या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला.
हॅलोच्या कण्टेण्ट ऑपरेशन्सचे हेड श्यामंगा बरुआह यांनी मते व्यक्त करताना म्हटले: “आमच्या वैविध्यपूर्ण युजर्सबरोबर किसान दिवस साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या कॅम्पेनद्वारे मोठा #सॅल्युटटूफार्मर्स निर्माण करायचा आहे. हॅलो अर्थपूर्ण कॅम्पेनद्वारे लोकांच्या जीवनात मूल्य निर्माण करत असते आणि समाजाच्या कल्याणासाठी हॅलो केअर प्रकल्प दाखल करून आम्ही या दिशेने यापुढेही प्रयत्न करत राहणार आहेत.
हॅलो समुदायाने शेतकऱ्यांचे कौतुक करत, आजवर 14 भारतीय भाषांमध्ये 28,000 हून अधिक पोस्टची निर्मिती केली आहे. हॅलो केअर या हॅलोच्या कम्युनिटी सबलीकरण उपक्रमांतर्गत दाखल करण्यात आलेली ही कॅम्पेन युजर्सकडून भरभरून प्रतिसाद व प्रेम मिळवत आहे. #सॅल्युटटूफार्मर्सवर सातत्याने सहभागी होणारे व अत्यंत लोकप्रिय असलेले असे 10 पर्यंत युजर्स निवडून त्यांना कॅम्पेनदर्याम हॅलो गिफ्ट बॉक्स दिले जातील.
शेतकरी हे भारताचा कणा असल्याने त्यांचा गौरव करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन किंवा किसान दिवस देशभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय शेतकऱ्यांचे नेते व भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती असते.
हॅलो केअरने असे अनेक उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांतून, भारतातील वैविध्यपूर्ण समुदायाच्या कल्याणासाठी व सबलीकरणासाठी हॅलोने केलेली बांधिलकीही अधोरेखित होते.
हॅलो केअरविषयी:
हॅलो केअर हा हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेचा सामाजिक सबलीकरण उपक्रम आहे. या उपक्रमामुळे प्रत्येकाला शिक्षण, संस्कृती, समाज व स्वच्छता यावर केंद्रीत विषयांसाठी स्वयंसेवा करण्याची संधी मिळते. गरज असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने, सेलिब्रेटी, मतांवर प्रभाव घडवणारे, निर्माते व सामाजिक संस्था यांना एकत्र आणून या विषयांना पाठिंबा दिला जातो.