गाडी सुरु करणे सोपे, वापरण्यास सुलभ, संपूर्ण कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर चालविता येण्याजोगी
– उपयुक्त व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यांमुळे सुखदायी प्रवासासाठी अधिक सोयीस्कर
पुणे: दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनविणार्या प्रख्यात टीव्हीएस मोटर कंपनीने आज ‘टीव्हीएस एक्सएल 100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट’ हे मॉडेल बाजारात सादर केले. या दुचाकीमध्ये स्टाईलिश आणि मोहक हेडलॅम्प फेअरिंग, तसेच लांब आणि आरामदायक ड्युअल टोन सीट, कुशन बॅक रेस्ट, क्रोम लेग गार्ड, क्रोम सायलेन्सर गार्ड आणि फ्रंट हायड्रॉलिक सस्पेंशन असे सुधारित स्टाईलिंग घटक बसविण्यात आले आहेत. या सुविधांमुळे ग्राहकाला आरामदायक प्रवासाची खात्री मिळते.
टीव्हीएस मोटर कंपनीचे युटिलिटी प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष एस. वैद्यनाथन याबाबत म्हणाले, “टीव्हीएस एक्सएल ब्रँडने आपल्या ग्राहकांचे समाधान वर्षानुवर्षे केले आहे. त्यामुळे आम्हाला 1.25 कोटीहून अधिक आनंदी ग्राहकांची संख्या ओलांडण्यात मदत झाली. ‘टीव्हीएस एक्सएल 100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट’ या व्हेरिएंटच्या रुपाने आमच्या ग्राहकाभिमुख तत्वज्ञानाचा विस्तार होत आहे. या वाहनामध्ये आमच्या वाढत्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी नवीन युगाची वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत. या दुचाकीचा कॉम्पॅक्ट आकार आणि हलके वजन यामुळे, तसेच ऑटोमॅटिक गिअरच्या वैशिष्ट्यामुळे चालकाला अधिक आराम मिळेल. बाजारात उपलब्ध असणार्या अन्य दुचाकी वाहनांमध्ये आमचे हे नवीन मॉडेल अगदी परवडण्याजोगे आहे.”
वैद्यनाथन पुढे म्हणाले, की वाढती वाहतूक ही आज प्रवाशांपुढील सर्वात मोठी अडचण आहे. प्रवासाचा मोठा कालावधी, गर्दीच्या रस्त्यांवरून मार्ग काढण्यात येणारे अडथळे आणि वाहने पार्क करण्यासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, यांमुळे अगदी लहान शहरातील दुचाकी वाहनचालकही त्रस्त झालेले आहेत. हे लक्षात घेऊनच त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी आणि किफायतशीर खर्चात सहजपणे एकाहून अधिक शॉर्ट ट्रिप करण्यात मदत करण्यासाठी टीव्हीएस कंपनीने एक उत्तम उपाय आणला आहे.
‘टीव्हीएस एक्सएल 100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट’ या मॉडेलमध्ये ‘आय-टचस्टार्ट’ ही ‘इलेक्ट्रिक स्टार्ट टेक्नॉलॉजी’ सादर करण्यात आली आहे. ‘इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर सिस्टीम’ असलेली ही सुविधा दुचाकी क्षेत्रात प्रथमच उपलब्ध होत आहे. या गाडीत मोबाईल चार्जिंगची सुविधा, मोटारसायकलीसारखे ‘फ्रंट हायड्रॉलिक सस्पेंशन’, कोणत्याही स्वरुपाच्या रस्त्यावरून सहज जाता यावे यासाठी मोठी 16 इंची चाके, ‘इझी सेंटर स्टँड’, चांगल्या ब्रेकिंगसाठी ‘सिंक ब्रेकिंग’ तंत्रज्ञान आणि आकर्षक बॉडी ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
आकर्षक बॉडी ग्राफिक्समुळे या गाडीच्या एकूण रुबाबात भर पडते. ‘हाय स्पार्क एनर्जी’ इंजिनमुळे या गाडीला उत्कृष्ट पिकअप मिळतो. 99.7 सीसीचे हे फोर स्ट्रोक इंजिन 3.20 किलोबॅट (4.3 बीएचपी) इतकी शक्ती 6000 आरपीएम गतीमध्ये देते, तसेच ते 3500 ‘आरपीएम’मध्ये 6.5 एनएम इतका टॉर्क देते.
अतिशय परवडणार्या किंमतीत (40,092 रु. एक्स-शोरूम, महाराष्ट्र) हे वाहन कूल मिंट ब्लू, लस्टर गोल्ड आणि स्पार्किंग सिल्वर अशा तीन अनोख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सध्या ‘टीव्हीएस एक्सएल 100’ची पाच व्हेरिएन्टस आहेत – एक्सएल 100, एक्सएल 100 कम्फर्ट, एक्सएल 100 हेवी ड्यूटी, एक्सएल 100 हेवीड्यूटी आय-टचस्टार्ट आणि नवीन एक्सएल 100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट.
‘टीव्हीएस मोटर कंपनी’बद्दल
टीव्हीएस मोटर कंपनी ही दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक असून 8.5 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेल्या टीव्हीएस समूहातील ती प्रमुख कंपनी आहे. गतीशीलतेच्या माध्यमातून विजेत्या प्रगतीवर या कंपनीचा विश्वास आहे. विश्वास, मूल्ये आणि ग्राहकांसाठी उत्कटता व अचूकता यांचा 100 वर्षांचा वारसा तिला लाभला आहे. नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रक्रियेतून आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची उत्पादने मोठ्या अभिमानाने ती निर्माण करते. 60 देशांमधील सर्व टच पॉइंट्सवर सर्वात उत्कृष्ट ग्राहक अनुभव देण्याचा तिचा प्रयत्न असतो. प्रतिष्ठित असा डेमिंग पुरस्कार मिळालेली ही एकमेव एकमेव दुचाकी कंपनी आहे. तिची उत्पादने जे.डी. पॉवर आयक्यूएस आणि एपीईएल सर्व्हेक्षणात चार वर्षांपासून संबंधित श्रेणीत आघाडीवर आहेत. तिला सलग चार वर्षे जे.डी. पॉवर ग्राहक सेवा समाधान सर्वेक्षणात प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून बहुमान मिळाला आहे. अधिक माहितीसाठी, कृपया www.tvsmotor.com या वेबसाईटला भेट द्या.