मुंबई: बँक ऑफ बडोदा या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने विविध कालावधींसाठी बेंचमार्क लेंडिंग रेट्स, म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये (एमसीएलआर) घट केली आहे. सर्व एमसीएलआर कालावधींवर 12 डिसेंबर 2019 पासून पुढीलप्रमाणे घट करण्यात आली आहे. बँकेचा 1 वर्ष एमसीएलआर 8.25 टक्के, म्हणजे सध्याच्या 1 वर्ष एमसीएलआरपेक्षा 5 बीपीएस कमी असेल.ओव्हरनाइट व एका महिना एमसीएलआरमध्ये 20 बीपीएस, म्हणजे 7.85 टकक्यांवरून 7.65 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे आणि तीन महिने व सहा महिने एमसीएलआरमध्ये 10 बीपीएस, म्हणजे अनुक्रमे 7.90 टकक्यांवरून 7.80 टक्क्यांपर्यंत व 8.20 टकक्यांवरून 8.10 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाविषयी:
बँक ऑफ बडोदाची (“द बँक”) स्थापना जुलै 20, 1908 रोजी, सरकारी बँकिंग व वित्तीय सेवा कंपनी म्हणून करण्यात आली. बँकेचे मुख्यालय भारतातील गुजरात येथील वडोदरा (अगोदरचे नाव बडोदा) येथे आहे.
बँक ऑफ बडोदा ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असून सेल्फ-सर्व्हिस चॅनलद्वारे बँकेचा देशांतर्गत मोठा विस्तार आहे. बँकेच्या वितरण जाळ्यामध्ये 9,500+ शाखा, 13,400+ एटीएम व 1,200+ सेल्फ-सर्व्हिस ई-लॉबी यांचा समावेश आहे. 21 देशांत उपकंपन्यांच्या 100 शाखा/कार्यालये याद्वारे बँकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय अस्तित्व आहे. बँकेच्या स्वतःच्या मालकीच्या उपकंपन्या आहेत – बीओबी फिनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (पूर्वीची बीओबी कार्ड्स लि.), बीओबी कॅपिटल मार्केट्स आणि बीओबी अॅसेट मॅनेजमंट कं. लि. बँक ऑफ बडोदाने लइफ इन्शुरन्ससाठी इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सशी संयुक्त भागीदारी केली आहे. नैनिताल बँकेत बँकेचा हिस्सा 98.57% आहे. बँकेने तीन प्रादेशिक ग्रामीण बँकाही प्रायोजित केल्या आहेत – बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक, बडोदा राजस्थान ग्रामीण बँक व बडोदा गुजरात ग्रामीण बँक.