मुंबई – आघाडीची जागतिक ल्युब्रिकंट कंपनी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड (गल्फ ऑइल) आणि तीन चाकी व्यवसायातील अग्रेसर कंपनी असलेल्या पिअजिओ व्हेइकल्स प्रा. लि. या कंपन्यांनी आज नवी धोरणात्मक, दीर्घकालीन भागिदारी केली आहे. व्यावसायिक वाहनांसाठी जानेवारी 2020 पासून विश्वासार्ह आणि को- ब्रँडेड तेलाच्या विपणनासाठी हा भागिदारी करार करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही उत्पादने एकत्रितपणे संपूर्ण श्रेणीसाठी विकसित करण्यात आली असून त्यात बीएस व्हीआय वाहनांचाही समावेश आहे.
या करारावर पिअजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिएगो ग्राफी व गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवी चावला यांनी सह्या केल्या.