पुण्यातील खवैय्यांना सिंगापूरच्या खाद्यपदार्थांचा लज्जतदार अनुभव देण्यासाठी एसटीबीचा नासी अँड मी तसेच खाद्यपदार्थांवरील खेळ व उपक्रमांसहित झॉमलँड सीझन 2 मध्ये सहभाग
पुणे – सिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) झॉमलँड सीझन 2 या मल्टीसिटी खाद्यपदार्थ आणि मनोरंजन महोत्सवासाठी झोमॅटोबरोबर भागिदारी केली आहे. हा महोत्सव दहा शहरांमध्ये दोन प्रकारांत आयोजित केला जाणार असून त्यात पुणे, दिल्ली, बेंगळुरू, हैद्राबाद आणि मुंबई येथे झॉमलँड, तर जयपूर, चंदीगढ, कोलकाता, चेन्नई व अहमदाबादमध्ये झॉमलँड पिकनिक्सचा समावेश असेल. भारतातील खवैय्यांशी जोडण्यासाठी, भारतात सिंगापूरचे खाद्यपदार्थ लोकप्रिय करण्यासाठी एसटीबीने ही भागिदारी केली असून झॉमलँडमधील ‘सिंगापूर एक्सपिरीयन्स झोन’द्वारे हे साध्य केले जाणार आहे.
16 आणि 17 नोव्हेंबर या वीकेंडला झॉमलँड पुणेसाठी हजेरी लावणाऱ्यांनी सिंगापूरच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यात काया टोस्ट, कुहे पिय टी, चिकन साते आणि नासी अँड मी यांच्या आइस मायलो इत्यादींचा समावेश होता. त्याशिवाय खाद्यपदार्थांवर आधारित संवादी खेळांमध्ये भाग घेत त्यांनी सिंगापूर एक्सपिरीयन्स झोन’मधील गार्डन्स बाय द बे आणि सेंटोस अशा प्रसिद्ध ठिकाणांच्या चित्रांपुढे फोटोही काढले. सिंगापूरचा मर्लिन मॅस्कॉट मेर्ली हा सुद्धा खवैय्यांमध्ये हिट ठरला. दिल्ली, मुंबई आणि हैद्राबादसारख्या शहरांतील आगामी झॉमलँड कार्यक्रमांमध्ये मिशेलिन- स्टार लिआओ फॅन हॉकर चॅनचा (पूर्वी लिआओ फॅन हाँग काँग सोया सॉस चिकन राइस अँड नूडल्स या नावाने ओळखले जाणारे)
झोमॅटोशी केलेल्या भागिदारीविषयी सिंगापूर टुरिझम बोर्डाच्या भारत, मध्यपूर्व आणि दक्षिण आशिया (आयएमईएसए) विभागाचे प्रादेशिक संचालक जीबी श्रीथर म्हणाले, ‘पहिल्यांदाच झोमॅटोशी भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून ही भागिदारी भारतीय तसेच सिंगापूरच्या नागरिकांच्या समान आवडीसाठी- खाद्यपदार्थांसाठी असल्याचा जास्त आनंद झाला आहे. भारतीय ग्राहकांशी वेगवेगळ्या मार्गांनी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच दहा शहरांत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांविषयी आम्ही उत्सुक आहोत. पॅशन मेड पॉसिबल या ब्रँडद्वारे आम्ही खवैय्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ सादर करणार आहोत. जीवनशैली, मनोरंजन आणि खाद्यपदार्थांशी निगडीत असलेल्या या कार्यक्रमातून आम्ही तरुण भारतीय आणि कुटुंबाशी जोडण्यासाठी उत्सुक आहोत.’
गेल्या काही महिन्यांत एसटीबीने खवैय्यांना सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सादर केले असून त्यात प्रसिद्ध भारतीय सेलिब्रेटी शेफ सारांश गोईला यांच्यासह करण्यात आलेल्या #चीटवीक या तीन भागांच्या मालिकेचा समावेश होता. या मालिकेमध्ये सिंगापूरमधील खाद्यजत्रेचं दर्शन घडवण्यात आलं. एसटीबीने झॉमलँडशी केलेल्या भागिदारीबद्दल एरिया संचालक – भारत व दक्षिण आशिया आणि या प्रकल्पाच्यचा अग्रस्थान असलेल्या श्रीमती लिम सि टिंग म्हणाल्या, ‘झॉमलँडमधील सिंगापूर एक्सपिरीयन्स झोनमध्ये भारतीयांना सिंगापूरचे अस्सल खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येईल. झॉमलँड पुणेमध्ये सहभागी झालेल्यांनी सिंगापूरचे खाद्यपदार्थ तसेच खाद्यपदार्थांवर आधारित खेळांबद्दल सकारात्मक अभिप्राय दिला आहे. यापुढील झॉमलँड कार्यक्रमांमध्येही हा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
सिंगापूर टुरिझम बोर्डाबद्दल
सिंगापूर टुरिझम बोर्ड (एसटीबी) ही पर्यटन क्षेत्रातील आघाडीची विकास संस्था सिंगापूरमधील महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील भागिदार आणि समाजाबरोबर एकत्र येत आम्ही सिंगापूर पर्यटनाचे दमदार स्वरुप तयार केले आहे. आम्ही पॅशन मेड पॉसिबल ब्रँड जिवंत करून त्याद्वारे सिंगापूरचे वेगळे रूप सर्वांपुढे आणत लोकांना त्यांची पॅशन इतरांबरोबर शेअर करण्यासाठी व आणखी दृढ करण्यासाठी प्रेरणा देत आहोत.