नव्या मर्सिडिज-बेंझ G 350 d ची किंमत 1.5 कोटी रुपयांपासून, एक्स-शोरूम, भारत अशी आहे.
मुंबई: मर्सिडिज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय जी-क्लाससाठी डिझेलचा पर्याय उपलब्ध करून एसयूव्ही पोर्टफोलिओ आज अधिक सक्षम केला आहे. जी-क्लास ही उल्लेखनीय कामगिरी करणारी ऑफ-रोडर आहे व तिने अनेक वाहनांसाठी आदर्श निर्माण केला आहे. नवे G 350 d दाखल करून, ही ऑफ-रोडर अधिक कार्यक्षम “G” बनणार आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी आज मुंबई येथे नवी मर्सिडिज-बेंझ G 350 d दाखल केली.
“1979 मध्ये निर्मिती झाल्यापासून, जी-क्लास जगभर अतुलनीय व वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. लक्झरी ऑफ-रोड वाहनांमध्ये हा बेंचमार्क आहे. आज, मर्सिडिज-बेंझने भारतातील चाहत्यांसाठी व ग्राहकांसाठी पहिलावहिला डिझेल जी-क्लास, म्हणजे मर्सिडिज-बेंझ G 350 d दाखल केली आहे. कस्टमायझेशनच्या असंख्य संधी असणारी G 350 d हे चाहत्यांसाठी लाइफस्टाइल वाहन आहे. या वाहनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधीत्व दिसू शकते. जी-क्लासमधील ऑफ-रोडिंग क्षमतांमुळे हे वाहन अधिक आकर्षक ठरते. 40 वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास असणाऱ्या जी-क्लासने या श्रेणीतील कमालीच्या स्पर्धेमध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे. जी-क्लासच्या उत्साही चाहत्यांना त्यांची आवडती लक्झरी ऑफ रोडर नव्या स्वरूपातही आवडेल, अशी खात्री आहे,” असे मर्सिडिज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले, “आम्ही 2019 साठी आमच्या उत्पादनांमध्ये बदल करण्यास आज सुरुवात केली आहे. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण जी-क्लासपेक्षा चांगले उत्पादन दुसरे कुठले असणार. नव्या G 350 d च्या निमित्ताने, आम्ही चोखंदळ ग्राहकांसाठी 15 हून अधिक स्पेशालिटी व एएमजी कार देणार आहोत. जी-क्लास हे उल्लेखनीय वाहन असून, त्यामध्ये ऑफ-रोडिंग क्षमता व दररोज गाडी चालवण्याचा आनंद यांची सांगड घातली आहे. हे वाहन दाखल केल्याने भारतासाठीचे आमचे ‘टॉप ऑफ पिरॅमिड’ उत्पादन धोरण अधिक बळकट होणार आहे. आम्ही चौथ्या तिमाहीसाठी उत्पादनांमध्ये विविध बदल करण्याचे नियोजन केले आहे आणि आम्ही लक्झरी श्रेणीतील आमचे आघाडीचे स्थान कायम राखू, याची खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.
नव्या मर्सिडिज-बेंझ G 350 d च्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर एक दृष्टिक्षेप
इंजिन | इन-लाइन 6 सिलिंडर |
डिस्प्लेसमेंट | 2925 cc |
आउटपुट | 210 kW (286 hp) at 1200-3200 rpm |
पीक टॉर्क | 600 Nm at 2500-3500 rpm |
ड्राइव्ह सिस्टीम | 4MATIC ऑल-व्हील ड्राइव्ह, रिअर-बाएस्ड टॉर्क डिस्ट्रिब्युशन 40:60 |
ट्रान्समिशन | 9G-TRONIC |
अक्सिलरेशन (0-100 km/h) | 7.4 सेकंद |
टॉप स्पीड | 199 km/h |
अधिक चपळता व ट्रॅक्शन: 4MATIC ऑल-व्हील ड्राइव्ह
नवी ट्रान्स्फर केस थेट 9G-TRONIC वर फ्लँज-माउंटेड असते. 40 टक्के ड्राइव्ह टॉर्क फ्रंट अक्सलवर व 60 टक्के रिअर अक्सलवर असतो. हे कॉन्फिगरेशन प्रामुख्याने रस्त्यावर विविध वैशिष्ट्ये हातळण्यासाठी उपयोगी ठरते. कायमस्वरूपी ऑल-व्हील ड्राइव्हमुळे जास्तीत जास्त ट्रॅक्शन मिळते. “G” हे “G” असल्याने तेथे नेहमीच काहीतरी वेगळे असते. लो-रेंज ऑफ-रोड रिडक्शन गिअरमुळे ड्राइव्ह व्हील्सवर टॉर्कमध्ये वाढ होते व त्यामुळे आव्हानात्मक रस्त्यावरही वाहन चालवणे शक्य होते.