विशेषतः होंडा मोटरसायकल्स व स्कूटर्स यांसाठी तयार केलेल्या कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडाल्युब्रिकंट्सला होंडा 2व्हीलर्स देणार पाठबळ
दिल्ली: 40 दशलक्षहून अधिक समाधानी व आनंदी ग्राहकांच्या परिवाराला आणखी आनंदी देण्यासाठी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने कॅस्ट्रॉल या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह व औद्योगिक ल्युब्रिकंट उत्पादक कंपनीशी भागीदारी केल्याचे आज जाहीर केले आहे. या कराराचा भाग म्हणून, प्रामुख्याने होंडाच्या टू-व्हीलर्ससाठी तयार केलेल्या नव्या कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह ल्युब्रिकंट्सला होंडा पाठबळ देणार आहे.
कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स नव्या नियमांचे पालन करतात, तसेच त्यामध्ये दर्जेदार बेस ऑइल वअॅडिटिव्ह यांचा मेळ साधला आहे. भारतातील सर्व स्थितींमध्ये चांगली कामगिरी केली जावी, यासाठी नव्या इंजिन ऑइलची होंडाने कसून चाचणी केली आहे. ही उत्पादने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, इंजिनामध्ये धूळ साचण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि होंडा 2व्हीलर्सकडून चांगले अॅक्सिलरेशन व उच्च इंधनक्षमता साधण्यासाठी तयार केली आहेत.
या सहयोगाविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे कस्टमर सर्व्हिसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप कुमार पांडे यांनी सांगितले, “होंडामध्ये आम्ही नेहमी ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने व सेवा दिल्या आहेत. होंडा व कॅस्ट्रॉल अनेक वर्षे जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी उत्पादनाच्या कामगिरीला नवे आयाम देत आहेत. कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडसारख्या विश्वासार्ह कंपनीशी भागीदारी करताना आणि होंडा2व्हीलर्ससाठी विशेषतः तयार केलेले कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतीय टू-व्हील उद्योगासाठी नवे बेंचमार्क निर्माण करण्यासाठी भविष्यात हा सहयोग आम्हाला अधिक सक्षम करायचा आहे.”
उत्पादन दाखल करत असताना, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ओमर डॉर्मन यांनी सांगितले,“ऑटोमोबाइल उद्योगामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर आघाडीवर असणाऱ्या होंडाशी सहयोग करणे, हा आमचा सन्मान आहे. ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य देणे, हे दोन्हीही ब्रँडचे उद्दिष्ट आहे, त्यांना या श्रेणीतील सर्वोत्तम सेवेबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च कामगिरी करणारी सोल्यूशन्स देण्याचा हे ब्रँड प्रयत्न करत आहेत. होंडा व कॅस्ट्रॉल यांच्यामध्ये अनेक बाबतीत सहयोग आहे आणि विश्वासार्ह व नावीन्यपूर्ण असणे अशी सामायिक मूल्ये आहेत. आम्ही होंडाबरोबर दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी शाश्वत भविष्य साकारण्यासाठी संयुक्तपणे वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहोत.
नवे कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडा ल्युब्रिकंट्स आता कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडच्या विस्तृत राष्ट्रीय वितरण जाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) या जपानमधील होंडा मोटर कंपनीच्या (जगातील पहिल्या क्रमांकाची टू-व्हीलर कंपनी) 100% उपकंपनीने मे 2001 मध्ये भारतातील 2व्हीलर व्यवसाय सुरू केला. 19व्या वर्षात असणाऱ्या होंडा टू-व्हीलर इंडियाने भारतात 43 दशलक्षहून अधिक समाधानी ग्राहक जोडले आहेत आणि 4 प्रकल्पांची एकूण उत्पादनक्षमता वार्षिक 6.4 दशलक्ष युनिट आहे. होंडाच्या टू-व्हीलर्सच्या विशेष रेंजमध्ये देशांतर्गत उत्पादनांमध्ये 6 स्कूटर्स (अॅक्टिव्हा 5G, अॅक्टिव्हा 125, अॅक्टिव्हा i, एव्हिएटर, डिओ व ग्रेझिया), 9 मोटरसायकल (CD 110 ड्रीम, ड्रीम युगा, लिव्हो, CB शाइन, CB शाइन SP, CB युनिकॉर्न, CBहॉर्नेट 160R, X-ब्लेड व CBR 250R) आणि 6 फन बाइक्स (CB300R, CBR650R, आफ्रिका ट्विन, CB1000R, CBR1000RR व गोल्ड विंग) यांचा समावेश आहे.
होंडा कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची ल्युब्रिकंट्स कंपनी असून तिने ल्युब्रिकंट्समधील प्रवर्तक व नवशोधक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. कॅस्ट्रॉल CRB, कॅस्ट्रॉल GTX आणि अलीकडच्या काळातीलकॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह, कॅस्ट्रॉल मॅग्नाटेक व कॅस्ट्रॉल व्हेक्टन असे पॉवर ब्रँड, हे कंपनीचे ब्रँड देशभरातील लाखो ग्राहक वापरत आहेत. कंपनी ऑटोमोटिव्ह उत्पादनापासून खाणकाम, मशीनरी आण पवन व ऊर्जा अशा उद्योगांत हाय परफॉर्मन्स आणि उद्योगातील ल्युब्रिकंट्स व मेटलवर्किंग फ्लुइड्स अशा निवडक श्रेणींमध्येही कार्यरत आहे.कॅस्ट्रॉल इंडियाचे भारतात मोठे उत्पादन व वितरण जाळे आहे आणि 100,000 हून अधिक रिटेल आउटलेटद्वारे ग्राहकांना विक्री करणाऱ्या 350 वितरकांचे वितरण जाळे आहे. कॅस्ट्रॉल उप-वितरक ग्रामीण भागातील अतिरिक्त आउटलेटपर्यंत पोहोचतात, तर कॅस्ट्रॉल इंडिया 3,000 हून अधिक प्रमुख संस्थात्मक खात्यांना थेट सेवा देते.