एप्रिल 2019 मध्ये भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही
- प्रत्येक 3 पैकी 2 बुकिंग XUV300 च्या टॉप एंड प्रकारासाठी झाली
- एकूण बुकिंगमध्ये पेट्रोल प्रकाराचा हिस्सा लक्षणीय
मे 07, 2019, मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, यंदा फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यापासून XUV300 या नव्या ऐटदार व आकर्षक एसयूव्हीने 26,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला असल्याचे आज जाहीर केले आहे. एप्रिलमध्ये, XUV300 ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही ठरली.
थरारक वैशिष्ट्य, श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेविषयक व हाय-टेक वैशिष्ट्ये यामुळे XUV300 देशभरातील, विशेषतः महानगरे व शहरे येथील ग्राहकांच्या पसंतीस पडली आहे. 3 प्रकारांमध्ये टॉप एंड प्रकाराला जास्तीत जास्त मागणी आहे आणि एकूण बुकिंगमध्ये त्याचे प्रमाण 70% आहे. 1.2 L टर्बो-पेट्रोल असणारा पेट्रोल प्रकार श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा आहे व XUV300 विक्रीमध्ये त्याचा हिस्सा लक्षणीय आहे.
बुकिंगच्या या मैलाच्या टप्प्याबाबत बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “दाखल झाल्यापासून केवळ दोन महिन्यांमध्ये XUV300 साठी 26,000 हून अधिक बुकिंग आली, ही समाधानाची बाब आहे. XUV300 ही ग्राहकांसाठी आकर्षक व सर्वंकष वाहन ठरत असून, ते थरारक कामगिरी करणारे, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये असणारे व वेधक डिझाइन असणारे आहे व या सर्वांचे प्रतिबिंब बुकिंगच्या आकड्यामध्ये दिसून येते. पेट्रोल प्रकारासाठी लक्षणीय बुकिंग आले आहे, हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक ग्राहक-केंद्री कंपनी म्हणून, प्रतीक्षेचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा आणि ग्राहकांना त्यांची XUV300s लवकरात लवकर देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांत XUV300 ब्रँड अतिशय सक्षम होईल, असा विश्वास आहे.”
थरारक कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये, वेधक डिझाइन, श्रेणीतील पहिली हाय-टेक वैशिष्ट्ये व श्रेणीतील सर्वोत्तम अंतर्भाग अशा वैशिष्ट्यांमुळे XUV300 ही एसयूव्ही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. XUV300ने सांगयोंग तिवोली या जगभर यशस्वी झालेल्या उत्पादनाशी सहयोग केला आहे. 2015 मध्ये दाखल झाल्यापासून, या उत्पादनाने 50 हून अधिक देशांत 2.6 लाखांहून अधिक युनिटची विक्री केली आहे. तिवोलीला सुरक्षेसाठी व अर्गोनॉमिक पुरस्कारही मिळाले असून, त्यामध्ये 2015 केएनसीएपी (कोरिअन न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम) कडून ग्रेड 1 सेफ्टी अवॉर्ड याचाही समावेश आहे.