भारतातील पहिले बँकांचे थ्री-वे कन्सॉलिडेशन
- एकत्रित बँकेच्या 9,500+ शाखा, 13400+ एटीएम, 85,000+ कर्मचारी 120 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देणार व बिझनेस मिक्स असेल 15 लाख कोटी रुपयांहून अधिक
- ग्राहकांना व्यापक सेवा व वैविध्यपूर्ण उत्पादने व सेवा यांचा लाभ मिळणार
- खर्च व उत्पन्न यांचा लक्षणीय सहयोग
- सर्व कर्मचाऱ्यांचे हित जपणार
पुणे, एप्रिल 1, 2019: एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च 30, 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एप्रिल 1, 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.
कन्सॉलिडेटेड बँक
ही कन्सॉलिडेटेड बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असेल. बँकेची भौगोलिक व्याप्ती अधिक व्यापक होईल व त्यामध्ये 9,500+ शाखा, 13400+ एटीएम, 85,000+ कर्मचारी 120 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देतील आणि बिझनेस मिक्स 15 लाख रुपयांहून अधिक असेल. त्यामध्ये ठेवी व अॅडव्हान्सेस यांचे प्रमाण अनुक्रमे अंदाजे 8.75 लाख कोटी रुपये व अंदाजे 6.25 लाख कोटी रुपये असेल.
बँकेने तिन्ही बँकांच्या क्षमता, त्यांचा सहयोग यांचे बळ एकत्रित करायचे आणि व्यापक ग्राहक वर्गाशी गहिरे नात निर्माण करून कार्यभार वाढवण्याचे ठरवले आहे. पूरक शाखांमुले पश्चिमेकडील व दक्षिणेकडील राज्यांतील जाळे वाढणार आहे – महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश. बँकेचा गुजरातमध्ये बाजारहिस्सा 22% असेल आणि महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांत 8 ते 10% असेल.
ग्राहकांना फायदे
या प्रक्रियेमुळे तिन्ही बँकांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. 120+ दशलक्ष ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळेल आणि विविध प्रकारच्या उत्पादनांचा लाभ घेता येईल – कॅश मॅनेजमेंट सोल्यूशन, सप्लाय चेन फायनान्सिंग, वित्तीय नियोजन, संपत्ती व्यवस्थापन सेवा. या फायद्यांबरोबरच, भौगोलिक विस्तार साधला जाईल व टच पॉइंटची संख्या 22,000+ पर्यंत वाढवली जाईल. या तिन्ही बँकांच्या अनिवासी भारतीय ग्राहकांना आता भारतात अधिक मोठे जाळे उपलब्ध होणार आहे.
बँक ऑफ बडोदाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अँड अॅनालिटिक्स अँड एआय अँड टेक्नालॉजीमुळे प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे व क्रॉस-सेलिंगमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.
देना बँकेच्या ग्राहकांना कर्जाची सुविधा तातडीने उपलब्ध केली जाईल. बँक ऑफ बडोदाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 101 कार्यालयांच्या माध्यमातून, विजया बँक व देना बँक यांच्या ग्राहकांना परकीय चलनातील निधी उपलब्ध होऊ शकेल. एसआरटीओ फंडिंग प्लांटेशन फायनान्सिंग या विजया बँकेच्या विशेष कार्यक्रमांचा लाभ अन्य दोन बँकांच्या ग्राहकांना घेता येणार आहे.
ग्राहकांना अनुभव
तंत्रज्ञानाचा समावेश ही टू-स्टेज प्रक्रिया आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रक्रियांबाबत एकसमानता साध्य करून, ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवामध्ये लवकरच सातत्य आणले जाईल. एप्रिल 2019 च्या अखेरीस सर्व शाखांमध्ये महत्त्वाच्या बँकिंग सुविधांची उपलब्धता केली जाईल व त्यांची व्याप्ती हळूहळू वाढवली जाईल. आयटी एकात्मिकरण 12-18 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत तिन्ही बँकांच्या ग्राहकांची खाती एका कोअर बँकिंग सिस्टीममध्ये समाविष्ट केलेली असतील.
खर्च व उत्पन्न याबाबतचा सहयोग
या एकत्रिकरणामुळे खर्च व उत्पन्न या बाबतीत सहयोग साधला जाणार आहे. वैविध्यपूर्ण उत्पादने, क्रॉस-सेलिंगमधील वाढ, शाखांच्या जागांतील बदलांमुळे सूक्ष्म बाजारात अधिक विस्तार, फी इन्कममध्ये वाढ यामधून उत्पन्नाच्या बाबतीत सहयोग व फायदे वाढणार आहेत. शाखा व प्रशासकीय कार्यलयांमध्ये सुसूत्रता आणि टेक स्पेंड ऑप्टिमायझेशन यामुळे खर्चाच्या बाबतीत सहयोग साधला जाईल. हा सहयोग प्रत्यक्षात साधण्यासाठीचे नियोजन अमलात आणले जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण
बँक ऑफ बडोदाला पीपल कॅपिटल इंडेक्समध्ये (पीसीआय) आघाडीच्या 50 कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. बँकेच्या मते, मनुष्यबळामुळे कार्यपद्धतीवर लक्षणीय परिणाम साधला जातो व बँकेचे वेगळेपण अधोरेखित होते.
विलीन झालेल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून त्यांना बँकाचा आकार व व्याप्ती वाढल्याने एका मोठ्या बँकेकडून विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कामाच्या बाबतीतील संधी व अनुभव यामध्ये वाढ होईल. त्यामध्ये जागतिक स्तरावरील संधींचाही समावेश असेल. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या बाबतीतील शर्ती बदलणार नाहीत आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे पूर्णतः रक्षण केले जाईल. प्रत्येक बँकेने अवलंबलेल्या सर्वोत्तम एचआर पद्धतींचे परीक्षण करून त्याचा अवलंब केला जाईल.
सक्षम ब्रँड
बँक ग्राहकांसाठी एक सक्षम ब्रँड निर्माण करण्यावर भर देणार आहे. ब्रँड सर्वांच्या लक्षात राहावा, यासाठी बँकेने विविध प्रकारचे उपक्रम आखले आहेत. इंटरब्रँड बेस्ट इंडियन ब्रँड्स 2019 नुसार, “बँक ऑफ बडोदा” या ब्रँडला 23वे स्थान मिळाले आहे. विजया बँक व देना बँक यांच्या क्षमतेमुळे हा ब्रँड अधिक सक्षम होणार आहे.
यानिमित्त बोलताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी सांगितले, “बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक एकत्र येत आहेत आणि त्यातून जाळे व ग्राहक वर्ग या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक निर्माण होणार आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एक सक्षम बँक निर्माण करण्यासाठी आणि एकेका बँकेपेक्षा एकत्रितपणे सर्व संबंधित घटकांना उत्तम सेवा देण्यासाठी, सर्व आवश्यक बाबींची परिणामकारक अंमलबजावणी करून, आम्ही या विलिनीकरणाच्या यशस्वितेसाठी योगदान देणार आहोत. तिन्ही बँकांची वैविध्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञानातील लक्षणीय गुंतवणूक आणि सेंटर ऑफ एक्सलन्स अँड अॅनालिटिक्स अँड एआय अँड टेक्नालॉजी हे व्यापक ग्राहक वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे. देना बँकेच्या ग्राहकांना तातडीने कर्ज सुविधा मिळू शकते. आमचे ग्राहक, कर्मचारी, भागीदार व अन्य भागधारक यांच्यासाठी आधुनिक व जागतिक दर्जाची बँकिंग संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही तिन्ही शाखांच्या समृद्ध परंपरेचा लाभ घेण्याच्या संधीचे सोने करणार आहोत. हा व्यवार सुरळीत होण्यासाठी, विलीन होत असलेल्या दोन बँकांचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर नारायणन व कर्नम शेखर यांचे आभार.”
बँक ऑफ बडोदाविषयी
बँक ऑफ बडोदाची स्थापना (“बँक”) जुलै 20, 1908 रोजी झाली असून ही एक भारतीय सरकारच्या मालकीची बँकिंग व वित्तीय सेवा कंपनी आहे. तिचे मुख्यालय भारतातील गुजरातमधील वडोदरा (आधीचे नाव बडोदा) येथे आहे.
बँक ऑफ बडोदा ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असून, तिचे देशांतर्गत जाळे सक्षम आहे व त्यास सेल्फ-सर्व्हिस चॅनलचे पाठबळ आहे. बँक आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षणीय विस्तारली असून, 21 देशांमध्ये 101 शाखा/कार्यालये उपकंपन्या आहेत. बँकेच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या आहेत – बीओबी फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (पूर्वीची बीओबी कार्ड्स लि.) व बीओबी कॅपिटल मार्केट्स. बँक ऑफ बडोदाने आयुर्विम्यासाठी इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सशी आणि अॅसेट मॅनेजमेंटसाठी बडोदा पायोनिअर अॅसेट मॅनेजमेंटशी संयुक्त भागीदारी केली आहे. नैनिताल बँकेमध्ये बँकेचा 98.57% हिस्सा आहे. बँकेने तीन प्रादेशिक ग्रामीण बँकाही प्रायोजित केल्या आहेत – बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक, बडोदा राजस्थान ग्रामीण बँक व बडोदा गुजरात ग्रामीण बँक.