मुंबई: टाटा कॅपिटलने व्यक्तिगत कर्जांसाठी टाटा कॅपिटलच्या मोबाइल अॅपमध्ये प्रथमच ‘टीआयए’ या अशा प्रकारच्या एकमेव व्हॉइसबोटचे अनावरण केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पाठबळ लाभलेले टीआयए हे ग्राहकाच्या व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) घेण्याच्या एकंदर प्रवासात ध्वनीच्या (व्हॉइस) स्वरूपामध्ये मदत करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहकाला कर्जासाठी पात्रता तपासून बघण्यापासून ते कर्जमंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेत काही मिनिटांमध्ये मदत उपलब्ध करून देण्यात हे सहाय्य करणार आहे.
टाटा कॅपिटलच्या मुख्य मार्केटिंग व डिजिटल अधिकारी अबोंती बॅनर्जी म्हणाल्या, “ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्यासाठी कायम नवीन कल्पना आजमावत राहण्याचा आमचा, टाटा कॅपिटलचा, कायमच प्रयत्न असतो. एआय आर्थिक परिसंस्थेचा कायापालट करत असताना, टीआयए ही अशा प्रकारची पहिलीच व्हॉइसबोट व्यक्तिगत कर्जांसाठी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. संभाषणात्मक तंत्रज्ञान, विशेषत: व्हॉइस असिस्टन्सची भारतात वेगाने वाढ होत आहे. टीआयएच्या मदतीने या बदलाचा पाया कर्जमंजुरीच्या प्रक्रियेत घालून ग्राहकाचा अनुभव अधिक स्मार्ट व जलद करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आमची नवीन व्हॉइस असिस्टेड सेवा वापरण्यास सोपी आहे. त्याचप्रमाणे तिच्या कर्जमंजुरीचा प्रवास सुलभ करण्याच्या क्षमतेमुळे तिला वेगाने स्वीकृती मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”व्हॉइस असिस्टेड व्यक्तिगत कर्ज हे उद्योगातील नवीन उत्पादन आहे, तर टीआयएचा पहिला टप्पा चॅटबोट टाटा कॅपिटलच्या वेबसाइटवर उपलब्धही झाला आहे. यामध्ये एआयच्या माध्यमातून ग्राहकांच्या सर्व उत्पादनांबद्दलच्या शंकांना उत्तर देण्याची संभाषणात्मक क्षमता, पात्रतेचे मापन करण्याची क्षमता तसेच व्यक्तीनुरूप उत्पादने आणि बरेच काही पुरवण्याची क्षमता असलेल्या सुविधा आहेत. टीआयएच्या वेब–आधारित इंटरफेसला ग्राहकांनी तत्काळ स्वीकारल्याचेही दिसून येत आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून काही आठवड्यांतच ३ लाखांहून अधिक संवाद याद्वारे झाले आहेत. या व्हॉइस असिस्टेड प्रवासामुळे उत्पादने पुढे अधिक वैशिष्ट्यपूर्ण होणार आहेत. ग्राहक आज आर्थिक सेवांचा लाभ घेण्याचे माध्यम म्हणून त्यांच्या स्मार्टफोन्सला पसंती देऊ लागले आहेत. ग्राहकांचे विचार समजून घेण्याच्या टीआयएच्या क्षमतेमुळे टाटा कॅपिटलला ग्राहक अनुभव अधिक समृद्ध करण्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर यामुळे कंपनीला आपल्या डिजिटल सोल्युशन्समध्ये आणखी काही रूपांतरणात्मक सुविधांची भरही घालता येणार आहे. भारतातील सातत्याने बदलत राहणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी टाटा कॅपिटलने डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार करण्यावर व त्यांचा विस्तार करण्यावर भर कायम राखला आहे. भाषा ओळख (स्पीच रेकग्निशन) तंत्रज्ञान, भाषेची नैसर्गिक समज आणि टेक्स्ट–टू–स्पीच तंत्रज्ञान यांचा वापर करून ग्राहकाला पूर्णपणे नवीन असा संभाषणाचा अनुभव देणे हे टीआयएचे उद्दिष्ट आहे. इंटलिजंट सुविधा व पर्यायांनी सुसज्ज असलेले टीआयए ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यास, त्यांना कर्जाची प्रक्रिया सुलभ करून सांगण्यास, योग्य उत्पादन निवडण्यात ग्राहकांना मदत करण्यास तसेच टाटा कॅपिटल अॅपमधून मंजूर झालेले कर्ज ग्राहकाला उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. व्यक्तीनुरूप तसेच अखंडित अनुभव देऊन टीआयए ग्राहकांचे व्यवहार सोपे व सोयीस्कर करून देते.