· कंपनीतर्फे १६० टक्क्यांची वार्षिक वाढीची नोंद
· जून २०२२ मध्ये हाय- स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी वुल्फ+ आणि जेन नेक्स्ट+चे वितरण सुरू
वडोदरा, २ ऑगस्ट २०२२ – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. या देशातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड ‘जॉय ई बाइक’च्या उत्पादक कंपनीने जुलै २०२२ मध्ये २४५८ युनिट्सची विक्री केली आहे. यासह कंपनीने जुलै २०२१ मध्ये झालेल्या ९४५ इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्स विक्रीच्या तुलनेत यंदा १६० टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.
कंपनीने पहिल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल- जुलै २०२२) १० हजारांपेक्षा जास्त (१०,७२५) युनिट्स इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या (एप्रिल- जुलै २०२१) तुलनेत २६३ टक्के वाढ झाली आहे.
या विक्री कामगिरीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘अर्थव्यवस्था विकसित होत असताना तसेच व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असताना सर्व टचपॉइंट्समध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आणि बुकिंग्ज येत आहे. पहिल्या चार महिन्यांत आम्ही १० हजारांचा टप्पा ओलांडला असून सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत अधिक वेगाने विकास होईल अशी आमची अपेक्षा आहे.’

२०२२ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये | |
नवीन कॅम्पेन लाँच #BharatKaJoy | वेगवेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या भारतीयांच्या भावना मांडणारे नवे ब्रँड कॅम्पेन #BharatkaJoy साथ चले या गीतासह वॉर्डविझार्डने लाँच केले आहे |
वुल्फ+ आणि जेन नेक्स्ट नानू+ यांचे वितरण सुरू | वॉर्डविझार्डने आपल्या हाय- स्पीड स्कूटर्स वुल्फ+ आणि जेन नेक्स्ट नानू+ यांचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू केले असून जून २०२२ मध्ये कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यांत ५०० युनिट्सची विक्री केली आहे. |
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडविषयी
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील 25 प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे.