५जी इंटरफेस, स्पिल रेसिस्टन्ट, स्टायलिश आउटलूक आणि एका यूसबी ट्रान्समीटरवर चालत असून यात १२ महिन्यांचा बॅटरी बॅकअप आहे
नवी दिल्ली – अद्ययावत पेरिफेरल उत्पादने तयार करण्यात जगभरात अग्रेसर असणाऱ्या रापू या कंपनीतर्फे व्यावसायिकांच्या गरजा भागविणारा झोकदार वायरलेस मल्टिमीडिया कॉम्बो ८२००पी सादर करण्यात आला आहे. ८२००पी वायरलेस मल्टिमीडिया कॉम्बो आकाराने लहान आणि कसलाही गोंधळ न होता वापरता येतो. एका बॅटरीवर हा कॉम्बो तब्बल १२ महिने वापरता येऊ शकतो.
वैशिष्ट्ये:
- विश्वासार्ह ५जी वायरलेस ट्रान्समिशन
- स्पिल-रेसिस्टन्ट कीबोर्ड
- १० मल्टिमीडिया हॉट की
- ५००/१००० डीपीआय रिसोल्युशनचा बदलानुकूल (अॅडजस्टेबल) माउस
- हाय-डेफिनेशन ऑप्टिकल ट्रॅकिंग इंजिन
- दीर्घायुषी बॅटरी, १२ महिने कीबोर्ड, ९ महिने माउस
- एक नॅनो यूएसबी वायरलेस रिसिव्हर
• उपलब्ध रंग: काळा आणि पांढरा
रापू ८२००पी अत्यंत विश्वासर्ह अशा ५जी वायरलेस ट्रान्समिशन प्रणलीवर काम करतो. त्यामुळे त्यावर इतर वायरलेस, ब्ल्यूटूथ आणि वाय-फाय उपकरणांचा अडथळा निर्माण होत नाही. यात मल्टिमीडिया हॉट की सुद्धा आहेत. यामुळे मीिडया प्लेयर, होमपेज, आवाज कमी-जास्त करणे इत्यादी फंक्शनसाठी ताबडतोब अॅक्सेस मिळतो. ८२००पी हा स्पिल रेसिस्टन्ट आहे, त्यामुळे वापरकर्त्यांकडून त्यावर चुकून काही सांडले, तरी काळजी करण्याची गरज नाही.
रापूच्या भारत, सार्क अँड एमईए देशांचे प्रमुख सौरभ ग्रोव्हर म्हणाले की, “आमच्याकडे प्रत्येकासाठी उत्पादने आहेत. रापू ८२००पी हे उत्पादन घरी आणि कार्यालयात उपयोगी असणारे आणि ज्यांना शैलीदार (स्टायलिश) उत्पादने आवडतात त्यांच्यासाठीचे उत्पादन आहे. हे उत्पादन ग्राहकांसमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि डिझाईन, कार्यक्षमता व किंमत या तीनही निकषांवर ८२००पी बाजारपेठेत छाप पाडेल, असा आमचा विश्वास आहे.”
किंमत, वॉरन्टी आणि उपलब्धता
रापू ८२००पी वायरलेस कॉम्बोची एमआरपी रु. २,७९९ एवडी आहे. या उत्पादनाची ३ वर्षांची लिमिटेड हार्डवेअर वॉरन्टी मिळते आणि हे उत्पादन एक्स-स्टॉक (पुरवठादाराकडून थेट) उपलब्ध आहे.