पुणे- पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांनी आपली घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी पुणे महानगर पालिकेसमोर आजपासून ठिय्या देत आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, यामध्ये वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आणि महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट पीडितांशी संवाद सांधला.यावेळी सुळे यांच्या समोर आंदोलकांनी पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषण्या दिल्या. पालकमंत्री खुद्द अजित पवार आहेत . आंबील ओढा कारवाई अजित पवारांच्या इशाऱ्यावर झाल्याचे कारवाई होताना काहींनी उठविले होते,यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या ,’ . कोणी काहीही बोलेन ..जर असे कोणी वक्तव्य केले असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत , अन्यथा वक्तव्य करणाऱ्या विरोधात मी स्वतः पोलिसात तक्रार करेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
हा राजकारण करण्याचा विषय नाही – सुळे
आंबिल ओढा प्रकरण हे संवेदनशील विषय असून येथे कोणीही राजकरण करु नये असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. मी इथं राजकरण करण्यासाठी आले नसून हा तुम्ही आम्ही मिळून हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यासाठी आले आहे. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हा पलटवार केला.
न्यायालयाकडून तुर्तास दिलासा
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महानगर पालिकेकडून 24 जून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिस-प्रशासन आमनेसामने आले होते. लोकांनी कारवाईदरम्यान आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतर न्यायालयाने यामध्ये लक्ष या कारवाईला तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने देखील स्थगिती दिली होती.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
पुणे महानगर पालिकेने 24 जून रोजी पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. दरम्यान, यावेळी पोलिस आणि स्थानिकांमधील वाद चांगलाच उफाळून आला होता. घरे पाडण्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी याला कडवा विरो धकेला, एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावे बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा घाट सुरू आहे असा आरोप स्थानिकांनी केला होता. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 700 ते 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

