Home Blog Page 2209

आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवेंना दिपोत्सवाने अभिवादन

0

पुणे- आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची २२७ व्या जयंती च्या पूर्व संध्येला क्रांतीकारकांच्या वंशजांकडून लहुजींना दिपोत्सवाने अभिवादन करण्यात आले.

भवानी पेठेतील लहूजी क्रीडा संकुल येथील पुतळ्यासमोर देशाचे क्रांतिकारक देशभक्त केशवराव जेधे यांचे वंशज कनोजी जेधे ,आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे शिष्य लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे वंशज रोहित टिळक या क्रांतिकारकाच्या वंशजांच्या हस्ते “जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी “ हा महामंत्र अनेक क्रांतीयोध्याना देणारे सशत्र क्रांतीचेजनक आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे जयंती महोत्सवा निमित दिपोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, यादवराव सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रमुख पाहुण्याचे शॉल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल थोरात यांनी केले, तर आभार अरुण गायकवाड यांनी मानले. या दिपोत्सव कार्यक्रमासाठी संजय साठे,सौ. सुरेखा खंडाळे, दयानंद अडागळे, सुनिल बावकर, हुसैन शेख, रोहित अवचिते, मारुती कसबे , इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

आमच्या पोलिसांचा मला अभिमान; गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

0

मुंबई दि. 13- गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.

“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६०  दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी केला अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा शुभारंभ

0

वाराणसी -राजभाषेचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा स्थानिक भाषांचा विकास होईल आणि स्थानिक भाषा सातत्याने तेव्हाच विकसित होऊ शकतात जेव्हा राजभाषा देशभरात मजबूत होईल,  या दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज वाराणसीमध्ये गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा शुभारंभ केला. या संमेलनात विविध सत्रांमध्ये  हिंदीच्या  अधिक  वापराला प्रोत्साहन देण्याबाबत विचारमंथन केले जाईल.केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की सर्व हिंदी भाषक प्रेमींसाठी देखील हे संकल्प करण्याचे वर्ष असायला हवे. जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशात  राजभाषा आणि आपल्या सर्व स्थानिक भाषा एवढ्या  बुलंद व्हाव्यात कि कुठल्याही परदेशी भाषेची मदत घेण्याची गरज भासू नये.  राजभाषेचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा स्थानिक भाषांचा विकास होईल आणि स्थानिक भाषा सातत्याने तेव्हाच विकसित होऊ शकतात जेव्हा राजभाषा देशभरात मजबूत होईल असे ते म्हणाले.  या दोन्ही बाबी एकमेकांसाठी पूरक आहेत. स्थानिक भाषा मजबूत करणे हे राजभाषा विभागाचे काम आहे आणि राजभाषा मजबूत करणे हे जनतेचे उद्दिष्ट असायला हवे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचे विचार आपल्या  राजभाषेत मांडून  राजभाषेचा  गौरव वाढवला. ते म्हणाले की जो देश आपली भाषा गमावतो तो कालांतराने आपली सभ्यता, संस्कृती, आणि आपले  मौलिक चिंतन देखील गमावतो. जो देश आपले  मौलिक चिंतन गमावतो तो जागतिक विकासात  योगदान देऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करणे खूप  महत्वपूर्ण आहे.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की या संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील पालकांना आवाहन आणि विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावे. मुले कुठल्याही माध्यमात शिकत असतील तरी घरी त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.

बालदिन-2021 निमित्त अॅनिमेशन आणि माहितीपटांचे आयोजन

0

नवी दिल्ली- बालदिन 2021 च्या निमित्ताने, फिल्म्स डिव्हिजनने  चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, इंडिया (सीएफएसआय) च्या सहकार्याने 14 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या संकेतस्थळ  आणि यु ट्यूब  चॅनलवर चित्रपटांचे खास ऑनलाइन स्क्रीनिंग आयोजित केले  आहे. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातोबालदिनानिमित्त दाखवण्यात येणारे चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत-  स्कूल बेल (04 मि. /2020) – बालमजुरी निर्मूलनावरील पीएसए  लघुपट, बन्यान डीअर (9.18 मि. / 1959) – बौद्ध जातक कथेवर आधारित चित्रपट, दॅट टच ऑफ गोल्ड (2.22 मि./1966) ) -एक अॅनिमेटेड चित्रपट जो वर्षानुवर्षे जगभर प्रसिद्ध असलेल्या मिडास राजाच्या प्रसिद्ध कथेचे रूपांतर आहे, स्विमी (5.44 मि. / 1973) -हा चित्रपट मिस्टर लिओ लिओनी यांच्या “स्विमी” या पुस्तकावर आधारित असून एकतेची संकल्पना आहे. “अन एव्हरग्रीन स्टोरी (9.21 मि./1976) – एका पंचतंत्र कथेवर आधारित,  लहान मुलाचे रडणे,  एक उदात्त अंतकरण कसे  करू शकते  हे या चित्रपटात दाखवले आहे , अ’द लायन अँड रॅबिट ‘  (8.37 मि. / 1974) – एक अॅनिमेशनपट आहे ज्यात  “यशस्वी होण्यासाठी मोठे आणि बलवान असण्याची गरज नाही, तुम्ही  फक्त हुशार असणे आवश्यक आहे” हे अधोरेखित केले आहे,  फ्रेंडशिप (8.41 मि./ 1990) – पंचतंत्र कथांपैकी  एका कथेवर  आधारित एक लहान अॅनिमेशनपट आहे , एक अनेक और एकता (7.06 मि/1977) – “एकत्र असलो तर आपण ताकदवान  आहोत, वेगळे झाल्यावर आपली ताकद कमी होते ” या वाक्प्रचारावर ही  कथा आधारित असलेला अॅनिमेशन चित्रपट, याशिवाय  CFSI चे  सहा प्रशंसनीय बालपट –  तारू (19 मि / 1990), कठपुतली (14 मि / 2008), करुणा की विजय (12 मि / 1985), करामती कोट (90 मि. / 1996), पप्पू की पगदंडी (90 मि. / 2014) आणि गौरू -द जर्नी ऑफ करेज (124 मि. / 2016).हे विशेष बालचित्रपट  www.filmsdivision.org/Documentary of the Week  आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision  वर 14 नोव्हेंबर 2021 रोजी 24  तास प्रसारित केले जातील.

52 व्या इफ्फीमध्ये पदार्पण स्पर्धेसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर

0

पणजी (शरद लोणकर )-52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता  पदार्पण स्पर्धेसाठी निवडलेल्या चित्रपटांची यादी आज जाहीर  करण्यात आली.  हा महोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचा मंच ठरला आहे आणि पदार्पण  विभागात चालू वर्षातील सर्वोत्कृष्ट नवोदित चित्रपट निर्मात्यांना पुढे आणणे हे उद्दिष्ट आहे. या विभागातील चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे-

1. डोल्लू

दिग्दर्शक : सागर पुराणिक

भारत | 2020 | कन्नड | 106 मि. | रंगीत

2. फ्युनरल

दिग्दर्शक: विवेक राजेंद्र दुबे

भारत | 2020 | मराठी | 125  मि. | रंगीत

3. मागोडो

दिग्दर्शक: रुबेन सेन्झ

स्पेन | 2021 | स्पॅनिश, ब्राझिलियन-पोर्तुगीज |76 मि. | रंगीत

4. मामन

दिग्दर्शन: आरश अनिसी

इराण | 2021 | फारसी | 111 मि.| रंगीत

5. पॅक ऑफ शिप

दिग्दर्शक: दिमित्रीस कानेलोपौलोस

ग्रीस | 2021 | ग्रीक | 113 मि. | रंगीत

6. रेन

दिग्दर्शक: जानो जर्गेन्स

एस्टोनिया | 2020 | एस्टोनियन, रशियन | 98  मि. | रंगीत

7. स्वीट डिझास्टर

दिग्दर्शक: लॉरा लेहमस

जर्मनी | 2021 | जर्मन | 83 मि. | रंगीत

8. द वेल्थ ऑफ द वर्ल्ड

दिग्दर्शक: सायमन फॅरिओल

चिली | 2021| स्पॅनिश |  85 मि. | रंगीत

9. झाहोरी

दिग्दर्शक: मारी अलेसेंद्रिनी

स्वित्झर्लंड, अर्जेंटिना, चिली, फ्रान्स | 2021 | स्पॅनिश, इटालियन, इंग्रजी, मपुडुनगुन

105 मि. | रंगीत

महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना क्रीडा पुरस्कार प्रदान

0

गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार

नवी दिल्ली , 13 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष 2021 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी 12 खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ असे एकूण 10 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर करण्यात आले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 5 खेळाडूंना जाहीर झाले होते. 2 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आली होती.
बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान

बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री कुंटे यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला आहे. भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप (ICC) मध्ये आतापर्यंत दोन सुवर्ण,4 कांस्य पदक पटकाविली आहेत. 2003 ची ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आहे. राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके मिळविली होती. वर्ष 2000 मध्ये श्री कुंटे यांना ‘ग्रँडमास्टर’ चा खिताबही बहाल झाला आहे. त्यांच्या बुद्धिबळातील एकूण यशस्वी वाटचालीसाठी त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आज सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब ह‍िने लहान वयापासूनच मल्लखांब या साहसी खेळ खेळायला सुरवात केली. मल्लखांबवर विविध कसरती करण्यात हिमानी अतिशय कुशल आहे. तिने विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. प्रथम आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत कुमारी हिमानीने सुवर्ण पदक पटकाविले आहे. तीच्या या कर्तबगारीसाठी अर्जुन पुरस्काने आज गौरविण्यात आले.

टेनिस खेळाडू अंकिता रैना जागतिक टेनिस स्पर्धेत उच्च मानाकंन गाठला आहे. अंकिता लहान वयापासून टेनिस खेळायला सुरूवात केली. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सहभाग घेऊन पदके आपल्या नावावर केले आहेत. अंकिता जन्म गुजरातचा असून वर्ष 2007 पासून रैना हीने पुणे येथे व्यवसायीक टेनिसचे प्रशिक्षण घेतले आहे.

गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार

गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. अन्नपूर्णा शिखरवर चढणारी प्रथम भारतीय महिला कुमारी मोहिते या आहेत. यासह अन्य शिखरावर ही त्यांनी चढाई केलेली आहे.

26 नक्षलवादी ठार केले

0

गडचिरोली -पोलिस आणि C-60 पथकाने शनिवारी मोठी नक्षलवाद विरोधी कारवाई केली. यामध्ये नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूणच 26 नक्षली ठार झाल्याचे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पार पडलेल्या या कारवाईमध्ये 3 जवान सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओळख पटविण्याचे काम सुरू
ठार झालेले नक्षलवादी नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व मृतदेह जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहेत. यातील एक मृतदेह सह्याद्रीचा असू शकतो. यांची ओळख पटविण्यासाठी तज्ञ पोलिसांसह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींपैकी काही जणांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच हा सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे होता किंवा नाही हे स्पष्ट होईल. अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी आहेत.

कोण आहेत C-60 नक्षलविरोधी कमांडो?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.

त्रिपुरातील 1.47 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 14 नोव्हेंबरला प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत पहिला हप्ता पंतप्रधान करणार हस्तांतरित

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबर 2021 ला दुपारी 1 वाजता दूर दृश्य प्रणाली द्वारे त्रिपुरातील 1.47 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण (पीएमएवाय- जी) चा पहिला हप्ता हस्तांतरित करणार आहेत.यावेळी 700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

पंतप्रधानांनी विशेष लक्ष घातल्यामुळे  त्रिपुराची भिन्न भौगोलिक-हवामान स्थिती लक्षात घेऊन, विशेष करून या  राज्यासाठी ‘ कच्च्या’ घराची संकल्पना बदलण्यात आली आहे, जेणेकरून इतक्या मोठ्या संख्येने ‘कच्च्या’ घरांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी सहाय्य मिळू  शकले आहे. 

या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

शारीरिक आरोग्याएवढेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

0

पणजी, 13 नोव्हेंबर 2021

शारीरिक आरोग्याएवढेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. विशेषतः कोविडनंतरच्या परिस्थितीत हे प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन तसेच बंदर, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सांत इनेज येथे मानसिक आरोग्याविषयी समुपदेशन आणि उपचार करणाऱ्या ‘उक्ती फाऊंडेशन’चे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उक्ती फाऊंडेशनची राज्यातील ही पहिली शाखा आहे.राज्यात मानसिक आरोग्याविषयीच्या सर्वांगीण संस्थेची आवश्यकता यानिमित्ताने पूर्ण होईल, असे नाईक म्हणाले. कोविड महामारीनंतर मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शारीरिक आजार दिसून येतात, तसेच त्यावर उपचाराची सुविधा आहे. मात्र, मानसिक आरोग्य हे सुप्तावस्थेत असून त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि उपचाराची आवश्यकता असते. मानसिक आरोग्याचा कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागतो. अशाप्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून नागरीक मानसिक आरोग्याविषयी अधिकाधिक जागृत होतील, अशी आशा श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने अशा संस्थांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. उक्ती संस्थेत मानसोपचार शिक्षणाचे अभ्यासक्रमही चालवले जातात.

जनतेला न्याय मिळेल या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

पुणे, दि. 13: आपल्या तक्रारींची दखल घेतली जाते तसेच न्याय मिळतो असे जनतेला वाटेल अशा पद्धतीने महसूल विभागाने सेवा पुरवाव्यात, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित या कार्यक्रमास महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ‘यशदा’चे महासंचालक सी.चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

श्री. थोरात यावेळी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील बहुतांश विषय हाताळावे लागतात. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असतो. तथापि, त्यांच्याकडे मोठी क्षमता असते म्हणूनच त्यांच्यावर या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात असे प्रशंसोद्गार काढून कोविड काळातील जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाची पावतीही त्यांनी दिली.

महाराजस्व अभियान आता विस्तारीत स्वरुपात
श्री. थोरात म्हणाले, सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान अधिक विस्तारीत स्वरुपात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांना सातबारा घरी नेऊन देणे, फेरफार निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि फेरफार अदालतीचे आयोजन, भूसंपादनाची गावपातळीवरील कमी- जास्त पत्रके अद्ययावत करणे, बिगरशेती प्रकरणे गतीने मार्गी लावणे, पाणंद, शिवार रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, दफणभूमीसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, निस्तार पत्रकाच्या नोंदी अद्ययावत करणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या महत्वाच्या आठ बाबींचा यात समावेश आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात नाविण्यपूर्ण बाबी राबवण्याची संधीही यातून दिली जाणार आहे.

ई- पीक पाहणी प्रकल्प क्रांतिकारी ठरणार
‘ई-पीक पाहणी’ हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पीकाची लागवड, उत्पादन याबाबत अचूक माहिती पुढील काळामध्ये मिळणार असून एक दिवस हा प्रकल्प संपूर्ण देशभरात राबवला जाईल असा विश्वास आहे. कृषी, पणन विभागालाही याचा उपयोग होणार असून कृषी उत्पादनांची आयात-निर्यात आदींच्या नियोजनातही देशासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल.

वाळूच्या विषयाबाबत सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे निर्णय, हरित लवादाचे निर्णय यांचे पालन करून नियमात सहजता आणण्यासाठी लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.

बिगर शेतीच्या प्रकरणातही विलंब होऊ नये तसेच जलद निर्णय घेणे शक्य व्हावे म्हणून ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ करण्यासाठी लवकरच शासन निर्णय होणार आहे.

महसूल यंत्रणेमध्ये अधिक सुधारणा तसेच पारदर्शकता आणण्यासाठी या महसूल परिषदेतील चर्चासत्रे तसेच आलेल्या सूचना उपयुक्त ठरणार आहेत. या सूचनांचा विचार पुढील महत्त्वाचे निर्णय घेताना होईल. या परिषदेत विविध जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेली सादरीकरणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावीत, अशा सूचनाही महसूल मंत्र्यांनी केल्या.

भूमीअभिलेख च्या विषयात ही लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. जमीन मोजणीची कामे अधिक गतीने आणि अचूकपणे होण्यासाठी विभागाला देण्यात आलेली ‘रोव्हर’ यंत्रे क्रांतिकारी ठरणार आहेत.

ऑनलाईन यंत्रणेचा उपयोग अधिकाऱ्यांनी शासकीय कामात तसेच जनतेची कामेही वेगाने व्हावीत यासाठी प्रभावीरित्या करावा, असेही श्री. थोरात म्हणाले. अर्धन्यायिक अधिकारांचा उपयोगही योग्य प्रकारे करावा. यामध्ये हयगय, विलंब तसेच हेतूपुरस्सर चूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

लोकशाही दिन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. आपले सरकार पोर्टलवरील महसूल विभागाच्या सेवा अधिक गतीने द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. करीर म्हणाले, आपल्याकडे येणारे कोणतेही काम गुणवत्तेनुसार व्हावे असा जिल्हाधिकाऱ्यांचा कायम आग्रह असावा. जगामध्ये कामात जे जे चांगले होत आहे त्याचा अवलंब आपल्या दैनंदिन कामकाजात करण्याचा प्रयत्न केल्यास जनतेला आपण अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू.

या कार्यक्रमात महाराजस्व अभियानाच्या शासन निर्णयाचे प्रकाशन करण्यात आले.

यापूर्वी झालेल्या चर्चासत्रात मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

..आमचा पक्षछोटा पण , बेईमान नाही … राष्ट्रवादीच्या जगतापांना मनसे टोला

पुणे- पीएमआरडीए च्या निवडणुकीत किती राजकारणाचा बाजार उठवायचा ? कॉंग्रेस ला संख्याबळा नुसार काही मिळत नाही मान्य आहे ..पण म्हणून त्यांना बाजूला हटवून टाकायचे काय ? खायचीच तर शिळी भाकरच खा म्हणून हिणवायचे का ? आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या राष्ट्रीय पक्षानेही त्यांनी टाकलेली शिळी भाकर खायची काय ? असे प्रश्न या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या प्रत्येक हालचालीने उपस्थित झालेले असताना आज मनसे ने देखील यात बॉम्ब टाकून धुराळा उठविला आहे. एकूणच कॉंग्रेस बाबत शहरात राष्ट्रवादी घेत असलेलेया भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. या पूर्वी हि १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्र वादीच्या एका आमदाराच्या हितासाठी एचसीएम टी आर चे आरक्षण उठविण्याचा ठराव भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्रित मतदान करत संमत केला होता . अलीकडच्या वर्षात भाजपा आणि राष्ट्रवादी महापालिकेतील वेगवेगळ्या विषयात एकत्र दिसत असताना कॉंग्रेस मात्र त्यांच्यात देसेनासी झाली आहे . या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्या समवेत सेल्फी घेत फेसबुक वर केलेल्या पोस्ट ने हा धुराळा आणखी उठला आहे . काय म्हटले आहे मोरे यांनी या पोस्ट मध्ये ते जसेच्या तसे खाली वाचा …

तुम्ही फसवा पुणेकरांना फसवा .. .आरे काय राव ,आम्ही पुणेकर तुम्ही भाजपा , राष्ट्रवादी आणि शिवसेना समजता इतकेही वेडे नाहीत.आज काय गुलाल उधळताय , फुगड्या काय घालताय काय तर म्हणे आमचे सर्व उमेदवार निवडून आले.आता एक बघा पुणे आणि पिंपरी चिंचवड मधे PMRDA निवडणुकीत एकूण जागा होत्या २२ त्यामध्ये एकूण संख्या बळानुसार भाजपाचे १४ उमेदवार होते.त्यामधे निवडुन सगळेच आले,जे १००% (गुपित वाटाघाटीनुसार ) येणारच होते आणि राष्ट्रवादीचे होते ७ उमेदवार आणि शिवसेनेचा १ उमेदवार ते ही झालेल्या मांडवलीनुसार १००% येणारच होते.जे आलेही तरीही पुणेकरांना वेडे करण्याकरिता उगाचच गुलाल काय उधळताय…काय काय नाटकं करताय…आरे आम्हाला तुमची ही अंतर्गत युती माहीतच होती…आम्हाला पुणेकरांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना फसवायचे नव्हते म्हणून मी आणि साईनाथ दोघांनीही मतदान केलेच नाही. तुम्ही फसवा पुणेकरांना फसवा…तुम्हाला २०२२ ला पुणेकर पुणेरी दणका १००% देतील…आमचा पक्ष छोटा आहे पण बेईमान नाही.

दरम्यान …..

१२ ऑक्टोबर २०२१ – महापालिकेची मुख्य सभा – या वेळी भाजपा आणि राष्ट्रवादीने हातात हात घालून एकत्रित मतदान करून पहा कसे कॉंग्रेस सह अन्य पक्षांना कसा दिला होता धक्का ..

राष्ट्रवादीने एच सी एम टी आर च्या आरक्षण रचनेत राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या आग्रहार्थ बदल करणारे प्रस्ताव भाजपाला बरोबर घेऊन पहा कसे मंजूर करवून घेतले .

दीड महिन्यात पूर्ण करणार मध्यवर्ती पेठांंमधील रस्ते- विकासकामे: स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची ग्वाही

0

पुणे, ता. १३ – शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये सुरु असलेली विकासकामे येत्या दीड महिन्यांत पूर्ण करून परिसरातील रस्ते सुस्थितीत आणले जातील अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत रासने यांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शनिवार पेठ आणि केळकर रस्ता परिसरात सुरू असलेल्या मेट्रो, रस्ते, समान पाणीपुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण आदी विकासकामांची पाहाणी केली.

नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, उपायुक्त अविनाश सकपाळ, पथ विभागाचे प्रमुख विजय शिंदे, मैलापाणी शुद्धीकरण विभागाचे प्रमुख संतोष तांदळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, नंदकुमार जगताप, आशिष म्हाडाळकर यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक रासने, सौरभ रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, एप्रिल महिन्यापासून या परिसरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांची गती खूपच संथ आहे. काही भागात काम झाल्यानंतर रस्ते डांबर आणि सिमेंट कॉंक्रिट टाकून बुजविले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने काही भागातील रस्ते खचले आहेत. तर काही भागातील रस्त्यांची पातळी असमान झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

रासने पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्तांसमवेत या भागाची पाहाणी केली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आज आयुक्तांसोबत पाहाणी करून त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. पाहाणी दरम्यान समस्यांची नोंद करण्यात आली. सर्व खात्यातील समन्वयाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विकासकामे पूर्ण करण्यात येतील. पुढील दीड महिन्यांत या परिसरातील सर्व विकासकामे पूर्ण होऊन रस्ते सुस्थितीत येतील अशी ग्वाही देतो.

प्रभाग विकासाचा आराखडा (मॉडेल)

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रभागात ज्या समस्या आहेत तशाच समस्या अन्य ४१ प्रभागात आहेत. आजच्या पाहाणी दौर्यातून एक विकासाचा आराखडा (मॉडेल) तयार करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. हा आराखडा अन्य प्रभागांमध्ये राबवून पुढील काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी राऊतांच्या थोबाडीत मारली असती! आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार

0

पुणे- संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी राऊतांच्या एक थोबाडीत मारली असती! अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियातून नोंदविली आहे फेसबुक वर एकाच पोस्ट मधून संपूर्ण तर ट्विटर वर अनेक पोस्त मधून हि प्रतिक्रिया नोंदविली आहे . पहा नेमके त्यांनी या पोस्ट मध्ये कोणत्या शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती!तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मतं मिळवा, कोण नाही म्हणतंय?केवळ ५ टक्के मुस्लिम गडबड करतात परंतु ९५ टक्के प्रामाणिक आहेत. मालेगाव, नांदेडमध्ये जे अस्वस्थता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यावर पूर्वीसारखा निषेध करा! केवळ मुस्लिम मतांची काळजी करू नका. जे ५ टक्के मुस्लिम गडबड करत आहेत त्यांच्यावर तुम्ही टीकापण नाही करणार का?तुम्हाला झोपताना, उठताना केवळ भाजपा दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरु केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्ही फोडला, शेतकऱ्यांचे पैसे आम्ही थांबवले, काय चेष्टा चालली आहे का? सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही आहे का?सगळीकडे जर भाजपाचा हात आहे असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही ३ पक्ष समर्थ आहात ना? भाजपाचा हात कापून काढा ना तुम्हाला कोणी अडवलं आहे? तीन पक्ष एकत्र असूनही तुम्ही दुबळे आणि तुमचे सरकार पूर्णपणे अपयशी आहे! राज्याचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. आजी गृहमंत्री आता आजारातून उठले आहेत तर मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. सध्या बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत!

झाडाला बांधून मारहाण करत गोळ्या घातल्या -गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा २ ग्रामस्थांची हत्या

0

गडचिरोली -मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये नक्षलवाद्यांनी काल रात्री दोन गावकऱ्यांची हत्या केली. प्राथमिक माहितीत . 7 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी लांजीच्या जंगलातून स्फोटके जप्त केली होती, गावकऱ्यांनी पोलिसांना स्फोटकांची माहिती दिल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता.. शनिवारी सकाळी गावकऱ्यांचे मृतदेह गावाबाहेर आढळून आले. जिल्ह्यात दीड वर्षात नक्षलवाद्यांनी तिसऱ्यांदा ग्रामस्थांची हत्या केली आहे.

बेहार तहसीलच्या मालखेडी गावातील संतोष (48) आणि जगदीश यादव (45) यांची शुक्रवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जगदीश आणि संतोष गावात धान्य दळत असताना चार नक्षलवादी आले. त्यात दोन महिलांचाही समावेश होता. चौघांच्या हातात बंदूक होती. त्यांनी दोन्ही गावकऱ्यांची नावे विचारून त्यांना गावाबाहेर ओढून झाडाला बांधले. प्रथम त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर दोघांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही मृतांची घरे समोरासमोर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्री गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. सकाळी दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले. जवळच एक निळी दोरी आणि काही पत्रकेही पडली होती.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांचे मृतदेह सकाळी ग्रामस्थांनी पाहिले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस आणि हॉक फोर्सचे जवान परिसरातील सर्च ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांनी बदला घेण्याच्या उद्देशाने दोन्ही गावकऱ्यांची हत्या केली आहे.

खुनाचे हे देखील कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येमागे दोन कारणे असू शकतात. सर्वप्रथम, गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी मालखेडी गावात पोलिसांनी 8 लाखांचे बक्षीस असलेली नक्षलवादी शारदा उर्फ ​​पुजे (25) हिला चकमकीत ठार केले होते. आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला म्हणून नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली असावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

आसाम रायफल्सचे 5 जवान शहीद; कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

0

मणिपूर-येथे शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला . या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरसह 5 जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर कमांडिंग ऑफिसरची पत्नी आणि मुलाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा हल्ला भ्याडपणाचा असल्याचे म्हटले आहे.चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंगत येथे ही घटना घडली, जिथे अतिरेक्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला केला आणि आयईडी हल्ला केला. 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांची पत्नी आणि मुलगाही या हल्ल्यात शहीद झाले. कर्नल त्रिपाठी हे छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील रहिवासी होते.

यापूर्वी 5 नोव्हेंबरला श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) समोर दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला होता. नागरिकांच्या उपस्थितीचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

चुराचंदपूर, मणिपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत क्लेशदायक आणि निषेधार्ह आहे. देशाने CO 46 AR आणि कुटुंबातील दोन सदस्यांसह 5 शूर सैनिक गमावले आहेत.शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. दोषींना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल.- राजनाथसिंह ,रक्षामंत्री