Home Blog Page 1135

फडणवीसांवर आरोप करून राष्ट्रवादीत गेलेले खडसे तीन वर्षांनी पुन्हा भाजपत:आमदारकीचा राजीनामा देऊन आठवडाभरात पक्षप्रवेश

जळगाव-

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करत ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपला साेडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आमदार एकनाथ खडसे साडेतीन वर्षानंतर पुन्हा हाती ‘कमळ’ हाती घेणार आहेत. आठवडाभरात स्वगृही परतत असल्याचे खुद्द खडसेंनीच सांगितले आहे . दरम्यान, भाजप साेडताना त्यांच्यासाेबत असलेल्या कन्या राेहिणी खडसे यांनी मात्र तूर्त राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अलीकडच्या काळात खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजल्या जातं. खडसेंच्या संभाव्या प्रवेशामुळंच रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे.खडसे हे भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यातील नेते तसचे केंद्रातील नेते त्यांना विनंती करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे हे सध्या शरद पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.

निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण

बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी आणि निवडणूक प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात श्री.नावडकर यांनी मतदानाची प्रक्रिया, ईव्हीएम यंत्र हाताळणी, ईव्हीएम यंत्रांची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरुप मतदान, ईडीसी मतदान प्रक्रिया, दिव्यांग मतदारांचे मतदान, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे अहवाल, निवडणुकी विषयक कागदपत्रे आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, अशा त्यांनी दिल्या.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण २ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यापैकी आज पहिल्या दिवशी १ हजार ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

मुंबई, : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

स्वीप अभियान

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्‍वीप” (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे.

एकूण मतदार

२०१९ मध्ये सर्व मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलने हुडकून काढणे सुरु केले आहे. या सेलच्या वतीने 4 जणांना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.

उमेदवारांनी नमूद करावे खाते 

उमेदवारांना त्यांचे सर्व फेसबुक अकाउंट जमा करावे लागणार आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलामध्ये जमा केला जाणार आहे. तसेच या निर्धारित सोशल मीडीया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. दरम्यान 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास एक हजार नऊशे खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खातेधारकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

१३ जणांचा शोध सुरू

जिल्ह्यातील आणखी 13 जणांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 13 जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या आहेत. त्यांचे पत्ते व त्यांच्याबद्दलची माहिती तपासणी सुरू आहे. सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी या संदर्भात अधिक जागरूक असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची,  संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा 

विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश
पुणे : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात मंगळवार, दिनांक ९ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली. 
लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील वंशजांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे. 
प्रबोधन मंच रथ, भजनी मंडळ, पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या विविध महिलांवर आधारित मातृशक्ती रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी होणार आहेत. मतदानाचे महत्व पटवून देत मतदान जनजागृतीकरिता विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी होणार आहे.  
याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

४४ व्या स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई
भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त शहर उपनगरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले. भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहण तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०० मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी वरळी येथील भाजपा वॉर्ड क्रमांक १९६ तर्फे आयोजित मेडिकल कँपला भेट दिली तसेच उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खा. मनोज कोटक यांनी कार्यालय आणि निवासस्थानी ध्वजारोहण केले. आ. अतुल भातखळकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. आ. राम कदम यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघतील सात निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आ. योगेश सागर यांनी कांदिवली येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. सुनील राणे यांच्या उपस्थितीत बोरीवलीत ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. आ. प्रवीण दरेकर यांनी दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण केले. भाजपा दक्षिण मध्य जिल्ह्याच्या वतीने दादर शिवाजी पार्कवर ‘अबकी बार चारसो पार’ संदेश असणारे पतंग उडविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत आहे. पक्षाचा हा प्रवास एक अथक आणि अखंड प्रवास आहे, हा प्रवास प्रयत्नांच्या पराकाष्टेचा आहे. हा प्रवास समर्पणाच्या आणि संकल्पाच्या शिखराचा आहे असेही भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले. यावेळी मुंबई भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; सुप्रिया सुळे यांना विरोध भोवला

पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारालाच मोठा धक्का देण्यात आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाच्या या निर्णयाविरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.

: @imFarooqueAhmed
राज्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी

या संबंधी वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीनीने उमेदवारी रद्द केल्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार देणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार? याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

बारामतीबाबत वंचितने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द

या संबंधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एका पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.’

निवडणूक प्रक्रियेचे महत्व जाणून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कर्तव्य पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्यावतीने गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित प्रथम निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार ज्योती देवरे, निवडणूक नायब तहसीलदार चित्रा ननावरे आदी उपस्थित होते.

मतदानाची कार्यपद्धती सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्वाचा भाग आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाच्यावेळी रांगेत उभे न राहता त्वरीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तीका याचे अवलोकन करून कामकाज पहावे.

कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्राबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती द्यावी. हेतूपुरस्सर निवडणूक कामकाजाकडे दुलर्क्ष करणे, वेळ न पाळणे अशी बाब आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतदान केंद्रवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, रॅम्प अशा सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

श्री. भंडारे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा सोहळा आहे. या कामामध्ये न्युनगंड न बाळगता प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हावे. सर्वांनी मतदान प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ईव्हीएम यंत्र हाताळण्याचे प्रात्याक्षिक प्रत्येकाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी तीन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तहसीलदार श्रीमती देवरे यांनी मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

बेदम मारहाणीत महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू-एकाला अटक -फरार आरोपीला राजकीय आसरा ?

पुणे :किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पोटात असलेल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार पेठेत घडली आहे. ही घटना 27 मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.फरार आरोपी पैकी एकाचे राजकीय संबंध असल्याने त्यांना आसरा मिळत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी येथे केला आहे.

याबाबत राजू माधवराव चिद्रावार (वय 25, रा. दुसरा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी गुरुवारी (दि.4 एप्रिल) समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी नवाज नासिर खान (वय 27, रा. चौथा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या रफीया खान, नासिर खान आणि सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर आयपीसी 316, 323, 504, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवाज खान याने 27 मार्च रोजी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लाथ मारली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्य़ादी, त्यांची पत्नी मिरा व पत्नीचा मानलेला भाऊ गणेश कांबळे हे गेले होते. त्यावेळी आरोपी नवाज खान, त्याची आई रफिया खान, नासीर खान यांनी फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मिरा चिद्रावार या गरोदर असल्याची माहिती आरोपींना माहित होती. तरी देखील आरोपींनी मिरा यांच्या पोटात लाथा मारून मारहाण केली. पोटावर लाथा मारल्याने अर्भकाचा मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना देखील आरोपींनी जाणीवपूर्वक मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच नवाज खान याने फिर्यादी यांच्या ज्युपीटर गाडीवर दगड मारुन नुकसान केले. तर सलमान उर्फ टिपू शेख याने फिर्य़ादी यांना फोन करुन पोलिसांकडे तक्रार केली तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली.या सलमान चे काही राजकीय संबध असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना आसरा मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .

दरम्यान, आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे मिरा यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.उपचार सुरु असताना मिरा यांच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.बाळाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मिरा यांच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्य़कर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील ,सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग रुक्मिणी गलांडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील , पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख,पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख करीत आहेत.

तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत मोठे निर्णय घेणार-PM मोदी

दहा वर्षात झालेली कारवाई हा केवळ ट्रेलर

पुष्कर (अजमेर)-आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत आणखी मोठे निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. माझी पूर्ण तयारी झालेली आहे. दहा वर्षात झालेली कारवाई हा केवळ ट्रेलर आहे. खूप काही बाकी आहे. मोदींनी शनिवारी अजमेरमधील पुष्कर येथील फेअर ग्राउंडवर निवडणूक रॅलीला संबोधित केले.

मोदी म्हणाले- भाजप सरकार देशातील 80 कोटी गरजू लोकांना मोफत धान्य पुरवते. दहा वर्षांत गरिबांच्या खात्यात 30 लाख कोटींहून अधिक रक्कम थेट पाठवण्यात आली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात मध्यंतरी पैशांची लूट झाली.दिल्लीतून 1 रुपया पाठवला, तर तो 15 पैशांपर्यंत पोहोचतो, असं काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी म्हटलं होतं. 30 लाख कोटी रुपये असते, तर काय झाले असते? आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला आढळले की काँग्रेसने 10 कोटीहून अधिक बनावट लाभार्थी तयार केले आहेत, जे कधीही जन्माला आले नाहीत. त्यांच्या नावाने योजना सुरू झाल्या. तुमचा हक्काचा पैसा थेट काँग्रेसच्या मध्यस्थांकडे जात होता.

मोदी म्हणाले- काल (5 एप्रिल) काँग्रेसने खोट्याचा गठ्ठा सोडला आहे. काँग्रेसचा पर्दाफाश करणारा हा जाहीरनामा आहे. प्रत्येक पानावर भारताचे तुकडे करण्याचा वास दिसतोय. स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते.काँग्रेसच्या एका खासदाराकडे 300 कोटींची रोकड सापडल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. पैसे मोजून मशीन थकले होते. त्यामुळे अहंकारी युती मोदींवर चिडली आहे. जितका चिखल टाकाल तितकेच कमळ फुलणार हे काँग्रेसवाल्यांनी समजून घ्यावे. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी रॅली काढत नाही, तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी करत आहे. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरूच राहणार आहे.

पंतप्रधान म्हणाले की, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला काँग्रेसने 6 वर्षांपासून हाकलून दिले. आमच्याकडे लोक ‘राम-राम’ म्हणत नमस्कार करतात. माझ्या मनात रामाबद्दल इतका राग मी ठेवू शकत नाही.

काँग्रेसच्या राजघराण्यातील प्रसिद्ध लोक या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गैरवर्तन करणे ते आपला हक्क मानतात. हा कार्यकर्ता असा आहे की, तो प्रत्येक शिवी पचवू शकतो. मी देशातील ग्रामीण गरिबांच्या पाठीशी खडकासारखा उभा असल्याने ते मोदींवर नाराज आहेत. या लोकांनी जनतेचा पैसा लुटणे हा आपला कुटुंबाचा हक्क मानला. मोदींनी दहा वर्षांत त्यावर कायमचा इलाज केला आहे. मोदींनी त्यांच्या लुटलेल्या दुकानांचे शटर बंद केले, त्यामुळे हे लोक नाराज आहेत.

स्त्रीशक्तीचा आनंद, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धी ही मोदींची हमी
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे, असे मोदी म्हणाले. हे तेव्हाच होईल, जेव्हा देशाच्या निम्म्या लोकसंख्येचा सहभाग वाढेल. माता, बहिणी आणि मुलींच्या सुख, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धीची मोदींची हमी आहे.

सैन्यात राजस्थानची चमक लांब मिशा असलेल्या शूर सैनिकांमुळे नाही, तर त्यांच्या मातांमुळे आहे, असे मोदी म्हणाले. मुलगी सैन्यात भरती होऊ शकली नाही, मोदींनी तिच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. प्रसूतीनंतर मुलींना 26 आठवड्यांची रजा दिली जाते. महिला आरक्षण विधेयकामुळे आपल्या माता-भगिनींसाठी संसदेतील जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.पंतप्रधान म्हणाले की, जो कधीही सायकल चालवू शकत नव्हता, तो आज गावात ड्रोन उडवत आहे. इस्रोचे मोठे प्रकल्प महिला हाताळत आहेत. जगात महिला वैमानिकांची सर्वाधिक टक्केवारी भारतात आहे.

पंतप्रधान म्हणाले- मला 3 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे
एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवले आहे. मला भरभरून आशीर्वाद द्या, मला 3 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे.पहिल्यांदाच 11 कोटी महिलांच्या घरात नळाचे पाणी पोहोचले आहे. गरोदर महिलांच्या खात्यावर 15 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज मिळविणाऱ्यांपैकी 70 टक्के माता-भगिनी आहेत.

मोदी म्हणाले- मी गरीब आईचा मुलगा

मी गरीब आईचा मुलगा असल्याचे मोदी म्हणाले. करोडो बहिणींकडे सिलिंडर नव्हते. त्यांना धुरात अन्न शिजवावे लागले. या काळात एका दिवसात 400 सिगारेट्स इतका धूर त्यांच्या फुफ्फुसात गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महिलांची बँक खाती नसल्याने त्यांना धान्याच्या डब्यात पैसे ठेवावे लागले. पंतप्रधान निवासाची घरे महिलांच्या नावावर होतील, असा निर्णय तुमच्या मुलाने घेतला.

जुन्नर परिसरातील आदिवासी भागात विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांना आवाहन

पुणे-दि. ६- जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबवितांना ग्रामस्थांना सेल्फीच्या माध्यमातून मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. धावशी या डोंगरावर वसलेल्या दुर्गम भागातील गावातही विद्यार्थ्यांनी उत्साहाने मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला.

मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी अनोखी कल्पना शोधून काढली. त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फीसाठी मतदानाचे महत्व असणारा संदेश लिहिलेली चौकट तयार केली. जनजागृती फेरीदरम्यान भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी ही चौकट हातात घेवून छायाचित्र घेण्यास सांगितले आणि मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. गावातील तरुण, वृद्ध, महिला सर्वांनीच या उपक्रमाला प्रतिसाद देत मतदान करणार असल्याचे सांगितले.

स्वीप समन्वयक अनिता शिंदे आणि माध्यम कक्ष समन्वयक संजय जाधव, सहाय्यक समन्वयक बाळासाहेब भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मढ, कोपरे,मुथाळणे, बांगर वाडी, सितेवाडी, धावशी, साबरवाडी, वसईवाडी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मतदान हा आपला अधिकार असल्याचा संदेश देत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात स्वीप समन्वयक ,गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा संकल्प

खेड आळंदी विधानसभा मतदाररसंघांतर्गत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत शपथ घेतली. प्रथमच मतदान करता येणार असल्याने नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बँक व पोस्ट कार्यालयात मतदानाचे आवाहन

हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध बँका व पोस्ट कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. मतदान हा आपला अधिकार असून आपण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा,अ से आवाहन करण्यात आले. बँक कर्मचारी आणि ग्राहकांनी उपक्रमात सहभाग घेतला. स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम, पर्यवेक्षक तेजस्विनी गदादे, सहाय्यक संजीव परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

पुणेकरांच्या सहभागातून तयार होणार तब्बल ‘वीस हजार किलोची मिसळ’ 

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर वापरणार
पुणे  : क्रांतीसूर्य  महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून  तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर २० हजार किलोची मिसळ बनविणार आहेत. 
दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक ११ आणि १४ एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील  महात्मा जोतीबा फुले वाडा आणि  पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली. 
गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ आणि दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. पुणेकरांनी महात्मा फुले वाड्यात दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात आपल्या सोयीने कधीही येऊन मोफत मिसळीच्या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे  करण्यात आले आहे.

* २० हजार किलो मिसळ करण्याकरिता लागणार भव्य कढई व हजारो किलो साहित्य
मिसळ तयार करण्याकरिता १५ बाय १५ फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची ६.५ फूट असून २५०० किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे. 
उपक्रमामध्ये २० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी २००० किलो, कांदा १६०० किलो, आलं ४०० किलो, लसूण ४०० किलो, तेल १४०० किलो, मिसळ मसाला २८० किलो, लाल मिरची पावडर ८० किलो, हळद पावडर ८० किलो, मीठ १०० किलो, खोबरा कीस २८० किलो, तमाल पत्र १४ किलो, फरसाण ५००० किलो, पाणी २०००० लिटर, कोथिंबीर २५०, लिंबू २००० नग जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आहे. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश १ लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास १ लाख यांसह १००० किलो दही व स्लाईड ब्रेड ३ लाख नग असे साहित्य वापरण्यात येणार आहे.

स्वतःला देशापेक्षा महान समजून तानशाह बनण्याचा मोदींचा प्रयत्न- सोनिया गांधी

जयपूर-काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, देशापेक्षा कोणीही वरचे नाही, पण मोदी स्वत:ला महान समजतात. ते लोकशाही नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि संपूर्ण व्यवस्थेत भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, ही हुकूमशाही आहे. हा देश काही मोजक्या लोकांची जहागीर नाही. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे. हा देश आपल्या मुलांचे अंगण आहे.

तत्पूर्वी, जयपूरच्या विद्याधर नगर स्टेडियममध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने पुन्हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भ्रष्टांना पक्षात घेत आहेत.

भाजप सरकार सत्तेवर येताच राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना बंद करण्यात आली असून 25 लाखांचा विमा आता 5 लाख रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी जिथे जातात तिथे नवनवीन खोटे बोलतात. त्यांनी दिलेले हमीपत्र अद्याप पूर्ण झालेले नाही. ते फक्त गांधी घराण्याला शिव्या देण्याचे काम करतात.

देशात पेपरफुटीच्या घटना घडत आहेत, कोणालाच नोकरी मिळत नाही- प्रियांका

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज बेरोजगारी शिखरावर आहे. तुम्ही 10 वर्षे मोदीजी आणि भाजप सरकार पाहिले आहे. त्यांनी बेरोजगारी दूर करण्यासाठी काय केले? अग्निवीर सारखी योजना आणली. सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या. देशातील प्रत्येक राज्यात पेपर फुटले असून नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महागाईची परिस्थिती अशी आहे की निवडणुकीच्या दोन महिने आधी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. एक अनोखी गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत तुमचा संघर्ष टीव्ही किंवा मीडियावर दिसतो की वर्तमानपत्रात वाचायला मिळतो? भाजप सरकार सत्तेवर येताच राजस्थानमध्ये चिरंजीवी योजना बंद करण्यात आली. 25 लाखांचा विमा आता 5 लाख रुपयांचा झाला आहे. हे वाचायला मिळाले का? देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे, ऐकू येत नाही. मोठमोठे उद्योगपती मोठमोठ्या वाड्यांमध्ये राहतात, त्यांची लग्ने कशी चालतात हे आपण पाहत आहोत. त्यांची हजारो कोटींची कर्जे माफ झाली आहेत.

ते तुमच्या मुलांना उभे राहू देणार नाहीत – प्रियांका गांधी

वास्तव ओळखण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या. एवढंच ऐकायला मिळतंय की यावेळी ते 400 च्या पुढे जाणार आहेत. मोदी कुठे प्रवास करत आहेत? कधी विमानात, कधी समुद्रात पाण्याखाली… हेच दिसतं. जिथे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला तिथे कोणीही तुमच्या मदतीला आले नाही. सर्व योजना बड्या उद्योगपतींसाठी आहेत. 5 किलो रेशन देणार पण रोजगार देणार नाही, तुमच्या मुलांना पायावर उभे राहू देणार नाही, असे ते म्हणतात.

हा देश काही मोजक्या लोकांची जहागीर नाही – सोनिया गांधी

​​​​​​​सोनिया गांधी म्हणाल्या की, आपल्या महान पूर्वजांनी आपल्या संघर्षाच्या बळावर देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य शोधला आणि सापडला. इतक्या वर्षांनी महान प्रकाश मध्यम झाला आहे. सर्वत्र अंधाराचा अन्याय वाढला आहे. याविरुद्ध लढून न्यायाचा प्रकाश मिळवू, असा आपला संकल्प असावा. गेल्या 10 वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे ज्याने बेरोजगारी आणि आर्थिक संकटाला चालना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मोदी सरकारने जे काही केले ते आपल्यासमोर आहे. त्यामुळे हा काळ निराशेचा आहे, पण निराशेसोबतच आशाही जन्माला येते हे जाणून घ्या. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे काँग्रेसचे सहकारी आपल्या अंत:करणात न्यायाचा दिवा प्रज्वलित करतील आणि हजारो वादळांना तोंड देत पुढे जातील. हा देश काही मोजक्या लोकांचा नाही, सर्वांचा आहे. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे.

मोदी जिथे जातात तिथे नवनवीन खोटे बोलतात – खरगे

खरगे म्हणाले की, खोटे बोलणाऱ्यांमध्ये आम्ही कधीच नसतो. जसे मोदी खोटे बोलतात. प्रत्येक ठिकाणी ते नवीन खोटे बोलतात. त्यांनी यापूर्वी आम्हाला किती हमीपत्र दिले आहेत? पहिल्या हमीपत्रात मी तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले. 10 वर्षांत 20 कोटी नोकऱ्या देणार होत्या, देशातील तरुणांना 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या आहेत का? मोदी पंतप्रधान आहेत, ते असे खोटे कसे बोलू शकतात, तुम्ही लोक खोटे बोलत आहात. मोदी खोटे आहेत, काँग्रेस नाही.

काम न करता श्रेय घेणे मोदींचे काम – खरगे

हा माणूस कुठेही म्हणतो मी हे केले, मी ते केले. मोदींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा समाचार घेत खरगे म्हणाले की, आजकाल रेल्वे मार्ग चर्चेत आहे. ही लाइन इंग्रजांच्या काळापासून नेहरूजींच्या काळापर्यंतची आहे. मोदी आता काय करत आहेत? त्या धर्तीवर एकावेळी एक ट्रेन सोडून मोदी ग्रीन सिग्नल देत आहेत. ही पायाभूत सुविधा आम्ही तयार केली असून त्याचे श्रेयही तुम्ही घेतले. स्टेशनवर जा आणि ग्रीन सिग्नल द्या. काम न करता श्रेय घेणे हे मोदींचे काम आहे.

यावेळी मोदींनी एक नवीन गाणे आणि नाटक आणले आहे – खरगे

राजस्थानमध्ये झालेल्या विकासकामांचा उल्लेख करताना खरगे म्हणाले – काँग्रेसने विमानतळ, आयआयटी आणि एम्स आणले आणि मोदीजी म्हणतात देशाचा विकास होत आहे. मी देशाच्या विकासासाठी काम करत आहे. यावेळी आम्ही एक नवीन गाणे आणि नाटक घेऊन आलो आहोत. मोदींची हमी… ते पक्ष आणि भाजपचे नाव घेत नाहीत. मोदी असतील तर शक्य आहे…मोदी असेल तर खात्री आहे. ते सगळीकडे म्हणत आहेत… माझी हमी, हा आमचा शब्द आहे, जो मोदींनी चोरला.

शिव्या देऊन किती दिवस वाचणार- खरगे

मोदी नेहमीच लोकांना गोंधळात टाकतात. तुम्ही देशासाठी काही केले नाही, तरीही काँग्रेसला म्हणतात की तुम्ही काही केले नाही, 70 वर्षांत काहीच केले नाही. आम्ही 55 वर्षांचा हिशोब देत आहोत. राजस्थान-जयपूरमध्ये किंवा त्याचा हिशेब देत आहे. तुम्ही काय केले याचा हिशेब देऊ नका. तुमच्यात बोलण्याची ताकद नाही. मुद्दा आला तर काँग्रेसला शिव्या देतात, काही पडलं तरी गांधी घराण्याला शिव्या देतात.

हॉस्पिटलमधून मूल चोरून 4-5 लाखांना विकायचे:वॉर्ड बॉयसह तस्कर टोळीच्या 7 जणांना सीबीआयची दिल्लीतून अटक

नवी दिल्ली

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. तपास यंत्रणेने शुक्रवारी (5 एप्रिल) दिल्ली आणि हरियाणामधील 7 ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी दिल्लीतील केशवपुरम येथील घरातून तीन नवजात बालकांची सुटका करण्यात आली.

त्यांच्यामध्ये दोन मुले असून त्यापैकी एक दीड दिवसांचा, तर दुसरा 15 दिवसांचा आहे. एक मुलगी साधारण एक महिन्याची आहे. सीबीआयने हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह 7 जणांना अटक केली आहे. यामध्ये अनेक महिलांचा समावेश आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना एनसीआर भागातून पकडण्यात आले आहे. हे लोक हॉस्पिटलमधून नवजात बालके चोरायचे. मग त्यांची काळ्याबाजारातील मालासारखी खरेदी-विक्री झाली. मुलासाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचा सौदा व्हायचा. एकट्या मार्च महिन्यात सुमारे 10 मुलांची विक्री झाली.

देशातील अनेक मोठी रुग्णालये तपास यंत्रणेच्या रडारवर
शोध मोहिमेदरम्यान 5.5 लाख रुपये रोख आणि अनेक कागदपत्रांसह आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. सीबीआय अनेक राज्यांमध्ये बाल तस्करी प्रकरणाचा तपास करत आहे. देशातील अनेक मोठी रुग्णालये बाल तस्करीच्या रॅकेटच्या कचाट्यात आली आहेत.

फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका!एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

पुणे- -एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी केले आहे.

एमएनजीएलकडे फेक कॉल्ससंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने सदर बाब अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, एमएनजीएलनेही ग्राहकांना सूचित केले आहे.

त्यासोबतच, अशा फेक आणि फ्रॉड कॉल्स संदर्भात एमएनजीएलने १ एप्रिल २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार ही दाखल केली आहे. याशिवाय, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना याबाबत जागृत करण्यासाठी आपल्या ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही ग्राहकांना सूचित केले आहे. त्यासोबतच विविध वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीस देऊन, रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि ग्राहकांना एसएमएस तसेच व्हॉट्सअँपद्वारे संदेश पाठवून जनजागृती करत येत आहे. तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी सदर बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे.

यासंदर्भात एमएनजीएलजे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी सांगितले आहे की, “एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही अँप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचार करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. एमएनजीएल केवळ देयकावर/बिलावर नमुद केलेल्या बिल प्रदान पद्धतीच्या माध्यमातून म्हणजेत http://www.mngl.in/pay-bill वरुन, भारत बिल पेमेंट सिस्टिम (बीबीपीएस), एनएसीएच, इसीएस, एक्सिस/आयसीआयसीआय बँकच्या शाखेमध्ये धनादेश आणि शिवाजीनगर किंवा चिंचवड येथील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.”