Home Blog Page 1059

कल्याणीनगर अपघात:धनिकपुत्र मद्यपी आरोपीला वाचविण्यासाठी ससूनमध्ये ब्लडसॅम्पलची अदलाबदल:2 डॉक्टर पकडले

ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या.

पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्र आरोपी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता.मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिसांनी अपघात झाल्यानंतर या धनिकपुत्राच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीने त्याची ब्लड टेस्ट करणे अपेक्षित होते. मात्र, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. तोपर्यंत याप्रकरणाचा बरीच आरडाओरड झाली होती. याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयाने पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडे पाठवण्यात आले. तसेच ससून आणि खासगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचा आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

उत्पादन शुल्क विभागाकडून आठवडभरात ५४ पब, बारचे परवाने निलंबित

मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हाॅटेल्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आठवडभरात ५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब सील करण्यात आले आहेत.- चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

बॉलरसह मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील १४ पबवर कारवाई

पुणे : कल्याणी नगर भागातील बाॅलर पबसह १४ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाईचा धडाका लावला आहे. कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी (१९ मे) भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या पब आणि बारवर कारवाई करून सील केले.

शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगर, मुंढवा भागातील १४ पब, बारवर कारवाई केली. बाॅलर पबवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. मद्य विक्री नियमावलीचे, एक्साईज रजिस्टरमध्ये नोंदी योग्य नसल्याने या पबवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून त्यांना सील करण्यात आल्याने या भागात शांतता असल्याचे दिसून आले.

१२० कलावंतांनी नृत्यमय कथेतून उलगडले रामायण

पुणे : श्रीरामजन्माचा आनंदोत्कट क्षण… राम, सीता, लक्ष्मण वनवासाला निघाल्यानंतर अयोध्यावासीयांच्या भावनांचा उठलेला कल्लोळ… शबरीची कथा… वाल्याकोळी…जटायू बंधूची कथा, राज्याभिषेक, स्वयंवर, पर्णकुटी, शूर्पणखा, सीताहरण,  वानरसेना, हनुमानाच्या भेटीपासून ते सीतेची लंकेतून सुटका करीत रावणाच्या वधापर्यंत, एक, दोन नव्हे तर गीतरामायाणातील तब्बल विविध प्रसंग… नंतर पुन्हा अयोध्येमध्ये आगमन आणि पुन्हा  राज्याभिषेक, असे नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून अवघ्या दोन तासात १२० कलावंतांनी नृत्यावर आधारित रामायण उलगडले. उपस्थित पुणेकर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.    निमित्त होते, अनुभव ‘अद्वितीय राम – एक नृत्यमय कथा’ हा १२० कलावंतांचा सहभाग असणारा नृत्यावर आधारित रामायणाचा शुभारंभाचा प्रयोगाचे. शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात तुडुंब भरलेल्या रसिक श्रोत्यांच्या साक्षीने प्रयोग झाला.   जय श्रीरामचा जयघोष, फुलांची उधळण करीत प्रयोगाला पुणकेर रसिकांनी दाद दिली.श्री गणेशाची आरतीने रामायणाच्या सादरीकरणाला सुरवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजन मूर्तीचे आणि श्रीरामाच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. ओंमकार शिंदे यांचे आई-वडील विवेक व मंगला शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे  कृष्णकुमार गोयल, डान्स कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.     दिग्दर्शक ओम डान्स अॅकडमीचे ओंमकार शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकूण २ तासांच्या या नृत्यरामायणात ओम डान्स अॅकडमीतील  ४ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील १२० स्त्री – पुरुष कलावंतांनी सहभाग घेत रामायणातील विविध घटनाप्रसंग कलाकारांनी उलगडले.      लहानग्यांसह साठ वर्षेपर्यंतच्या कलाकारांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. रामजन्मापासून अनेक प्रसंग कलाकारांनी आनंदोत्साहात सादर केले. पुणेकर रसिकांकडून कलाविष्काराला साथ दिली जात होती. यावेळी “जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून निघाले.       या नृत्यरामायणाची सुरुवात नारदमुनी आणि वाल्मिकी ऋषी यांच्या निवेदनातून फ्लॅशबॅक पद्धतीने झाली. यामध्ये राज्याभिषेक, स्वयंवर, पर्णकुटी, शूर्पणखा, सीताहरण, शबरी, हनुमान, हनुमान आणि सीता, रावण, वानरसेना, राम – रावण युद्ध, अयोध्येमध्ये आगमन आणि पुन्हा राज्याभिषेक असे एकूण १२ प्रसंग नृत्यावर आधारित सादर करण्यात आले. यातील नृत्ये फ्रीस्टाईल इंडियन क्लासिकल धर्तीवर आहे.   संकल्पनेचे जनक व दिग्दर्शक ओम डान्स अॅकडमीचे ओंमकार शिंदे म्हणाले, गीतरामायण आणि चित्ररामायण यानंतर आता नृत्यरामायण आहे.  अयोध्येमध्ये या नृत्यरामायणाचा विशेषशो देखील आयोजित केला जाणार आहे. पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद देणारा आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या निर्मितीमुळे नृत्यावर आधारित रामायण, माझ्या ओम डान्स अॅकडमीतर्फे सादर करावे ही कल्पना मला सुचली आणि त्यातूनच ‘नृत्यरामायण’ सादर केले, असल्याचे यावेळी  ओंमकार शिंदे यांनी सांगितले.   या नृत्यरामायणात यापूर्वी प्रसारित मराठी व हिंदी गाणी चपखलपणे वापरण्यात आली. याची संहिता हेमंत देशमुख यांनी लिहिली आहे. वेशभूषा वीणा देवकुळे आणि कलाक्षेत्र तसेच मेकअपइंटरनॅशनल ब्युटी स्कूल यांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन ओंमकार शिंदे यांनी केले आहे.पुणे फेस्टिवल चे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि डान्स कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी दिग्दर्शक ओमकार शिंदे यांच्या रामायणाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कलाकारांचे कौतुक केले. आज भाग्याचा दिवस आहे. आजपर्यंत टीव्हीवर व पुस्तकातून रामायण वाचले. आता नृत्य, संगीतातून रामायण रसिकांना अनुभवता येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोगाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळेल, अशी शुभेच्छा यावेळी त्यांनी दिली.

अली कागदी व नील मुळ्ये यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक

सांघिक टेबल टेनिस स्पर्धा :पीवायसी जिमखान्यास दुहेरी मुकुट

पुणे – दिनांक २६ मे- डेक्कन जिमखाना क्लबने पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने (पीडीटीटीए) आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय सांघिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील खुला गट तसेच कनिष्ठ (१७ वर्षाखालील) गटात पीवायसी जिमखानाच्या संघांनी विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट मिळविला.

डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सतरा वर्षाखालील गटात पीवायसी ‘अ’ संघाने  अंतिम सामन्यात आपल्याच ‘क’ संघाचा ३-० असा पराभव केला. त्यावेळी त्यांच्याकडून प्रणव घोलकर याने अनुज फुलसुंदर याला ११-४,११-८,११-९ असे सरळ तीन गेम्स मध्ये पराभूत केले. दुसऱ्या लढतीत जान्हवी फणसे हिला अली कागदी याच्याविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. हा सामना तिने १२-१०,९-११, ११-२, १४-१२ असा जिंकून पीवायसी संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यापाठोपाठ जान्हवी हिने श्रिया शेलार हिच्या साथीत अनुज फुलसुंदर व विहान राऊत यांना ११-६,११-८,११-९ असे पराभूत करीत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटामध्ये अली  कागदी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक देण्यात आले.

या सामन्याच्या तुलनेमध्ये खुल्या गटाचा अंतिम सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. पीवायसी ‘क’ संघाने  अंतिम सामन्यात डेक्कन जिमखाना ‘अ’ संघावर ३-२ अशी मात केली. त्यावेळी पहिल्या लढतीत पीवायसी संघाच्या शुभंकर रानडे यांनी ईशान खांडेकर याला ११-१३,११-५, ११-९,८-११,११-३ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. मात्र नंतरच्या लढतीत पीवायसी संघाच्या जय पेंडसे याला नील मुळ्ये याच्याकडून ८-११,५-११, ९-११ अशी हार पत्करावी लागली. दुहेरीत पेंडसे याने भार्गव चक्रदेव याच्या साथीत ईशान खांडेकर व वैभव दहीभाते यांना ११-५,११-७,११-५ असे हरविले आणि पीवायसी संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाचा डावखुरा खेळाडू नील मुळ्ये याने शुभंकर याला ११-४,५-११,११-९,१२-१० असे पराभूत करीत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे भार्गव व वैभव यांच्यातील निर्णायक एकेरीच्या लढतीबाबत उत्कंठा निर्माण झाली. दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ करीत सामना रंगतदार केला. ही लढत भार्गवने ११-७,९-११,२१-१९,११-४ अशी जिंकून पीवायसी संघास विजेतेपद मिळवून दिले. या गटामध्ये नील मुळ्ये हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  राजीव बोडस, स्मिता बोडस, श्रीराम कोनकर, आनंद काळे, आशिष बोडस, मिहीर केळकर, उपेंद्र मुळ्ये, दीपेश अभ्यंकर आदी संघटकांच्या हस्ते झाला.

रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण

मुंबई, दि. २६ : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

खार मुंबई येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता आज बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे मुंबई येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, सहायक सचिव बलभद्रानंद, मुंबई रामकृष्ण  मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद, सुशीम दत्ता, शंतनू चौधरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबई केंद्राने गरीब व वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

रामकृष्ण मिशन ही आत्मोद्धारासोबत लोकहिताचे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल मिशनचे अभिनंदन करून मिशनने भारतातील युवकांसाठी कौशल्य विकास, क्रीडा विकास व समग्र व्यक्तिमत्व विकासासंबंधी उपक्रम राबवावे. तसेच वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सशक्तीकरणाची योजना राबवावी, असे ही त्यांनी सांगितले.

विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले ‘माँ शारदा भवन’ निर्माण केल्याबद्दल मिशनचे कौतुक करून रामकृष्ण मिशनतर्फे ठाणे येथे नवे केंद्र सुरु करण्यात येत असल्याबद्दल राज्यपाल श्री. बैस यांनी आनंद व्यक्त केला.

रूफटॉपसह साईड,फ्रंट मार्जिन मधील अतिक्रमणे हटवा -खासदार मेधा कुलकर्णी

पुणे-शहरातील अनधिकृत पब, बार रूफटॉप हॉटेल्स आणि त्यातील अनेक अवैध धंदे यामुळे पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून काल भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्याच बरोबर रस्त्यांवरील आणि साईड,फ्रंट मार्जिन मधील अतिक्रमणे , खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, नाइट लाइफ, आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याविषयी चर्चा करून कारवाईची मागणी केली. अनधिकृत होर्डिंग्ज, स्ट्रक्चरल ऑडिट न झालेले मोबाइल टॉवर, अधांतरी केबल चे जाळे आणि त्यामुळे होणारे अपघात यांवर ही त्यांनी कारवाई ची मागणी . विविध भागातील नागरिकांनी उपस्थित राहून चर्चेत सहभागी होत आपले प्रश्न मांडले. पुणे महानगरपालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप आणि अन्य प्रमुख अधिकारी तसेच नगरसेवक जयंत भावे, सौ. अनिता तलाठी, सौ. केतकी कुलकर्णी, कल्याणी टोकेकर, संदीप भडकमकर , कल्याणी टोकेकर, कल्याणी बिडये, संदीप भडकमकर, अंजली पंचाक्षरी, स्नेहा पिसे, नविनकुमार जगरवाल, मिलिंद जोगळेकर, वैभव संत, सुनीती दुगल, रवि धोत्रे,महेश देशपांडे, उमेश भिडे,मकरंद देशपांडे, केतन कर्डिले, प्रमोद कुबेर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार

पुणे : आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी म्हणजे चालता बोलता भिमागीतांचा वारसाच. त्यांच्या गायकीने तळागाळातील जनते पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे विचार पोहोचले.  एक काळ असा होता की त्यांच्या भीमागीतांच्या कार्यक्रमांना लोक लाखोंच्या संख्येने गर्दी करत. मात्र त्यानंतर सोशल मीडिया आला, अनेक नवीन गायक उदयास आले अन् काळाच्या ओघात सुषमा देवी मागे पडल्या. आज त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती ओढावली असून घराचे वीज बील भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. याची दखल घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून पुणेकरांच्या वतीने सुषमा देवी यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे.

अर्थपूर्ण गाणी, बुलंद आवाज आणि सुमधुर संगीताच्या जोरावर सुषमा देवी यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात झाले. मात्र रोजंदारी मिळाल्या प्रमाणे मानधन मिळाल्याने त्यांना उमेदीच्या काळात पुरेसा पैसा देखील मिळविता आला नाही. अन् आज त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती ओढावली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुषमा देवी यांचे गायकी शिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. याची गंभीर दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी घेतली. नुकतेच भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त पुणे विद्यापीठ परिसरातील तथागत गौतम बुद्ध विहार येथे आयोजित धम्म संध्या कार्यक्रमात महोत्सव समितीच्या वतीने एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करून मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, कार्यक्रमाच्या आयोजक तथा पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

वयाच्या आठव्या वर्षा पासून सुषमा देवी यांनी भीमागीते गायला सुरूवात केली. पुढे लग्नानंतर त्यांचे पती संगीतकार मोटघरे यांची त्यांना बहुमूल्य साथ मिळाली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी – गीतकार  वामनदादा कर्डक, जेष्ठ दिवंगत गायक – संगीतकार श्रावण यशवंते, गोविंद म्हशीलकर, दत्ता जाधव, प्रकाशनाथ पाठक, प्रतापसिंग बोडदे, वैशाली शिंदे यांच्या सोबत सुषमा देवी यांनी काम केले. उमेदीच्या काळात सुषमा देवी यांची कारकीर्दी या कलावंतांच्या साथीने बहरास आली.  सुषमा देवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई  घराघरात पोहचवण्याचे काम केले. ‘भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं ..’, ‘गौतम गौतम पुकारू..’, ‘काखेत लेकरू हातात झाडणं ..’ आदी सुषमा देवी यांची गाणी प्रसिद्ध आहेत.

‘ इस मोडसे…जिया ले गयो जी ..ने आणली आनंदबहार

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत  ‘यमन रंग’ या   कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,दि.२५ मे  २०२४ रोजी   करण्यात आले होते.’बिल्वकल्प’ प्रस्तुत या कार्यक्रमात यमन रागावर आधारित मराठी हिंदी गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात  आला. या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘यमन रंग ‘ कार्यक्रमात पारंपारिक बंदिशी ,सरगम गीत ,तराणे , मराठी , हिंदी आणि नाटयगीते सादर करण्यात आली. बिल्वा द्रविड ,पुष्कर गाडगीळ यांनी गायन सादर केले. डॉ.नरेंद्र चिपळूणकर(हार्मोनियम),रोहित जाधव(तबला ) यांनी साथसंगत केली तर  सौ. सुधा राजगुरू यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

हा कार्यक्रम शनिवार, दि.२५ मे   २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला .हा कार्यक्रम विनामूल्य होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०९ वा कार्यक्रम  होता..भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. बिल्वा द्रविड- यांच्या स्वरात-  राग- यमनचे रागस्वरुप , बंदिशी- एरी आली पियाबिन – ही आग्रा घराण्याचे उ. नत्थन खाॅसाहेबांनी यांनी रचलेली बंदीश सादर करण्यात आली.  लंगर तुरक जिन छुओरी या बंदिशीमधून जुना यमन राग कसा होता याचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर यमन रागातील   तराणा – ताल- त्रिताल – तानो दिरदिर तयियन रे  सादर झाले.

पुष्कर गाडगीळ यांनी  गुरू पं. विजयजी बक्षी यांनी रचलेली बंदीश सादर केली.

प्रथम तुला वंदीतो, मागे उभा मंगेश, पांडुरंग कांती, तोच चंद्रमा, ये जवळी घे जवळी, आकाशी झेप घे रे, शुक्रतारा मंदवारा ,चंद्र आहे साक्षीला ‘  ही यमन रागातील गीते सादर करण्यात आली. मराठी मेडली, हिंदी मेडली सादर झाली. , देवा घरचे ज्ञात कोणाला ‘,कठीण कठीण कठीण किती ही यमन रागातील नाटय पदे सादर झाली.

यमन रागातील  ‘ इस मोडसे, ये मोह मोह के धागे, जीया ले गयो , ये लाल इश्क, ही हिंदी गीते सादर करण्यात आली. या सर्व गीतांना चांगला प्रतिसाद मिळाला.

जगण्यातील सकारात्मकता देते परिस्थितीशी संघर्ष करण्याची उमेद-माधुरी ताम्हणे

वंचित विकास संस्थेतर्फे ‘अभया’चा दहावा वर्धापनदिन व दशकपूर्ती ‘अभया सन्मान’ सोहळा

पुणे : “समाजातील प्रत्येक महिला विविध घाव सोसत असते. प्रत्येकीच्या संघर्षाचे स्वरूप वेगळे असेल. पण जीवनात संघर्ष येतोच. अशावेळी आपल्या जगण्यातील सकारात्मकता, धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती आणि मनातील कणखरपणा परिस्थितीशी दोन हात करण्याची उमेद देतो,” असे मत लेखिका श्रीमती माधुरी ताम्हणे यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संचालित ‘अभया’ या एकल महिलांच्या मैत्रीगटाचा दहावा वर्धापनदिन व दशकपूर्ती अभया सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉलमध्ये झालेल्या उन्मेष प्रकाशनच्या संचालक श्रीमती मेधा राजहंस, वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

परिस्थितीशी दोन हात करुन यशस्वी जिवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. बिबट्याशी झुंज देणाऱ्या सुनीता बनकर, तृतीयपंथी म्हणून येणार्‍या अडचणींना तोंड देत तृतीयपंथीयांच्या आर्थिक स्थितीवर पीएचडी करणाऱ्या मिलिंद उर्फ मिलन लबडे, पतीच्या निधनानंतर अडचणींवर मात करून स्वतःला व कुटुंबाला उभे करणार्‍या दैवशाला थोरबोले, ज्ञानदानातून हजारोंचे आयुष्य घडवणाऱ्या शोभा वाईकर, मुलांना वाढवताना संघर्ष करणाऱ्या वंदना अवघडे यांना अभया सन्मान, तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात शंख वादन करणार्‍या दीपिका जंगम यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. ‘अभया’च्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले.

माधुरी ताम्हणे म्हणाल्या, “एकटेपणा वाट्याला आला, तरी खचून जाता कामा नये. आपल्यासारख्या इतरांचा आपण आधार होऊ शकतो. एकमेकींच्या साहाय्याने जगण्याचा हा प्रवास पुढे घेऊन जात येतो. समाजाने एकल महिलांना वेगळेपणाची वागणूक देणे थांबवायला हवे. सर्वांना समान अधिकाराची कृती प्रत्येकाने अंमलांत आणायला हवी.”
मेधा राजहंस म्हणाल्या, “एकमेकींना भावनिक आधाराची गरज असते. समाजात भगिनीभाव रुजायला हवा. एकटेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. नात्यांमध्ये तणाव निर्माण होताहेत. अशावेळी आपण एकमेकांना आधार देऊन परस्पर स्नेहबंध दृढ केला, तर जीवनात होणार्‍या संघर्षावर मात करता येईल.”

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “विलास चाफेकर यांच्या मार्गदर्शनात अभया उपक्रमाची सुरुवात झाली. आज दहा वर्षांमध्ये असंख्य महिला या उपक्रमात जोडल्या गेल्या. अनेकींना आधार मिळाला. काहींच्या संघर्षातून प्रेरणा मिळाली. भावनिक बंध तयार झाले. अभयाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी भविष्यात काम सुरु राहील.

देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी अभया सन्मानार्थीच्या संघर्षगाथा सांगितल्या. मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, स्नेहल मसालिया, तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नागरे यांच्यासह वंचित विकासच्या टीमने कार्यक्रमाचे संयोजन केले.

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी बेंगळुरूमधील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना तसेच वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालयाला दिली भेट

मुंबई- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी 24 मे 2024 रोजी बेंगळुरू येथील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना (एएसटीई) आणि वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालय (एएफटीपीएस) या ठिकाणांना भेट दिली. यावेळी एका औपचारिक संचलनाचे आयोजन करण्यात आले.  उड्डाण चाचणी घेत असताना आपल्या जीवनाचे बलिदान देणाऱ्या भारतीय चाचणी चमूचे सदस्य आणि शास्त्रज्ञांच्या स्मारकाला जनरल अनिल चौहान यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या दौऱ्याचा एक भाग म्हणून जनरल चौहान यांना भारतीय वायु सेनेच्या एएसटीई येथे सुरू असलेल्या चाचण्या आणि एएफटीपीएस’च्या उड्डाण चाचणी प्रशिक्षण उपक्रमांबरोबरच या अद्वितीय संस्थांच्या संघटनात्मक भूमिकांच्या पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. आत्मनिर्भरता आणि प्रशिक्षणसंबंधी पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून एएसटीई आणि एएफटीपीएस येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली आणि त्यांच्यासमोर स्वदेशी प्रकल्पांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.  सी डी एस जनरल चौहान यांनी एएसटीई आणि एएफटीपीएस’च्या पाच दशकांच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्पे दर्शविणाऱ्या कलाकृती ठेवलेल्या एएसटीई संग्रहालयाला देखील भेट दिली.

जनरल अनिल चौहान हे, एएफटीपीएस येथे आयोजित 46 व्या फ्लाइट टेस्ट कोर्सच्या समापन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले.  एकूण 17 विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झाले आहेत.  एएसटीई’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक सुरंजन दास रात्रीभोजाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पदवीधर विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या वैवाहिक जोडीदारांनाही पात्रता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.  विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाच विद्यार्थ्यांना चषक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चाचणी वैमानिकाला दिला जाणारा सुरंजन दास चषक स्क्वाड्रन लीडर ए. बेरवाल यांना; सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा सी ए एस चषक स्क्वाड्रन लीडर कपिल यादव यांना;  महाराजा हनुमंत सिंहजी तलवार सर्वोत्कृष्ट एफटीई पुरस्कार स्क्वाड्रन लीडर व्ही सुप्रिया यांना; अभ्यासक्रमातील विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा कपिल भार्गव चषक स्क्वाड्रन लीडर रजनीश राय यांना आणि सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा डनलॉप चषक लेफ्टनंट कमांडर गौरव त्यागी यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला भारतीय वायुसेनेचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ – ट्रेनिंग कमांड तसेच अनुभवी चाचणी चमू देखील उपस्थित होते.  एएफटीपीएसच्या ऑफिसर कमांडिंग यांनी या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आढावा आणि अभ्यासक्रमाचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात भारताची तिन्ही सैन्यदले, भारतीय तटरक्षक दल, एचएएल, डीआरडीओ आणि मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना फ्लाइट चाचणी प्रशिक्षण देण्यासाठी डी-फॅक्टो सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून संस्था बजावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली. 

आपल्या समारोपाच्या भाषणात, सीडीएस जनरल चौहान यांनी कमांडंट एएसटीई आणि एएफटीपीएसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, या विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षणाचा उच्च दर्जा राखल्याबद्दल तसेच भारतीय वायुसेनेच्या क्षमता निर्माण आणि आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल  कौतुक केले. यामध्ये देशातील लष्करी विमान वाहतूक सेवेचे अद्यतनीकरणाचाही समावेश आहे.  त्यांनी पदवीधर अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, आणि देशसेवेसाठी आवश्यक सुसज्जतेसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितेची मानके पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक सक्षमतेच्या महत्त्वावर भर दिला. प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्जन करताना उत्कृष्ट व्यावसायिक क्षमता प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम घेत राहिल्याबद्दल सीडीएस चौहान यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अग्रे पश्यामी’ भव्य नृत्यनाट्याने भारावले रसिक!

६ भाषा,१० संगीतकार,४० रागमाला,४० नृत्यकलाकारांचा आविष्कार
पुणे : 
‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे  आयोजित,    ‘अग्रे पश्यामी’ या भव्य नृत्यनाट्याच्या प्रभावी सादरीकरणाने शनिवारी सायंकाळी रसिक भारावून गेले. पुण्यात प्रथमच  करण्यात आलेल्या   या नृत्यनाट्यात चेन्नईच्या ४० पेक्षा जास्त नृत्यकलाकारांचा समावेश होता.दि.२५ मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता अण्णा भाऊ साठे सभागृह(पद्मावती) येथे हे नृत्यनाट्य सादर झाले.


श्रीविष्णूच्या कूर्म,वराह,नृसिंह,राम आणि कृष्ण या अवतारांचं वर्णन भरतनाट्यम,मोहिनीअट्टम,कुचीपुडी आणि कृष्णाट्टम कली या नृत्यशैलींच्या माध्यमातून या नृत्य नाट्यात साकारले गेले.संस्कृत,तमिळ,मल्याळी,कानडी,तेलगू आणि मराठी अशा ६ भाषेतील निवडक रचनांना १० प्रतिभावान संगीतकारांनी दिलेले, ४० वेगवेगळ्या रागमालांमधील संगीत,अतिशय सुंदर रंगभूषा,वेशभूषा ही नृत्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरली.एस .सुब्रमण्यम, (अध्यक्ष,पूना संगीत सभा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नृत्यरचनाकार अनिता गुहा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘नृत्ययात्री’च्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले.डॉ.किरण ठाकूर,  डॉ.सुचेता भिडे – चापेकर, मनीष साबडे आदि मान्यवर उपस्थित होते.आकांक्षा शिंदे यांनी सूत्र संचालन केले.
या निमित्ताने शास्त्रीय नृत्याच्या इतिहासात प्रथमच ‘नारायणीयम’ हे नृत्यनाट्याच्या स्वरूपात सादर झाले.’नारायणीयम्’ नावाच्या संस्कृत काव्यावर हे नृत्यनाट्य आधारित होते.
 प्रसिद्ध वक्ते,प्राचीन वैदिक ग्रंथांचे लेखक, संशोधक आणि दिग्दर्शक श्री दुष्यंत श्रीधर यांनी या नृत्यनाट्याची संहिता तयार केली .भरतनाट्यम नृत्य शैलीतील प्रसिद्ध गुरु श्रीमती अनिता गुहा यांची नृत्यसंरचना होती.संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. राजकुमार भारती यांची संगीतरचना होती.साऊंडस्केप डिझाइन श्री साई श्रवणमचे होते.
सुमधुर अशा संस्कृत काव्यरचनांसाठी ओळखले जाणारे नारायण भट्टातीरी नावाचे  प्रतिभावान कवी केरळमध्ये सोळाव्या शतकात होऊन गेले.
त्यांनी भागवत पुराण संक्षिप्त स्वरूपात आणून एकूण दहा दहा श्लोकांच्या शंभर दशकांमध्ये त्याची केलेली काव्यरचना म्हणजेच ‘नारायणीयम्’ हे काव्य आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र बलकवडे

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२७  वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी ॲड. प्रताप परदेशी 
पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या २०२४-२५  या मंदिराच्या १२७ व्या वर्षाकरीता राजेंद्र बलकवडे यांची अध्यक्षपदी  निवड झाली आहे. तर कार्यकारी विश्वस्तपदी ॲड. प्रताप परदेशी, खजिनदारपदी ॲड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी आणि उप उत्सवप्रमुख म्हणून अक्षय हलवाई यांची नियुक्ती झाली आहे.
राजेंद्र बलकवडे यांनी यापूर्वी ट्रस्टवर खजिनदार म्हणून काम पाहिले आहे. सामाजिक चळवळीत ते अग्रेसर आहेत. अनेक क्रीडा संस्था, गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक संस्थांवर देखील ते कार्यरत आहेत. 
यासोबतच ट्रस्टचे नवनियुक्त कार्यकरी विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी हे ज्येष्ठ विधीज्ञ असून पुणे बार असोसिएशनवर त्यांनी काम केले आहे. ॲड. रजनी उकरंडे या धर्मादाय कार्यालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. नवनियुक्त विश्वस्त मंडळात ट्रस्टच्या विश्वस्तपदी युवराज गाडवे, डॉ. पराग काळकर, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये, आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेलचे उद्घाटन

पुणे -येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल आणि आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीच्या उद्घाटनाने आज क्रीडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. या समारंभात पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम,एडीएस

जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख संदीप प्रधान, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक आणि ख्यातनाम क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज या मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ करण्यात आला

खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (एमओवायएएस) द्वारे संकल्पित आणि निधी पुरवलेला एक दूरदर्शी उपक्रम, आता आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये समाकलित करण्यात आला आहे. ही अत्याधुनिक सुविधा खेलो इंडिया क्रीडापटूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर त्यांची कामगिरी उंचावण्याचा आहे. याला पूरक म्हणून आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी आणि ऍथलेटिक्स या चार प्रमुख क्रीडा विषयांना समर्पित असून संपूर्ण भारतातील महिला क्रीडा प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी महत्त्वपूर्ण वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते.

आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीसाठी भरती प्रक्रिया खूप प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया होती, ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून 1000 पेक्षा जास्त तरुण मुलींनी राष्ट्रीय स्तरावरील चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. लहान मुलींच्या प्रतिभा ओळख प्रक्रियेनंतर, उद्घाटनाच्या बॅचसाठी 24 उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश केवळ नव्या प्रतिभेला वाढवण्याचाच नाही तर या प्रतिभावान महिला खेळाडूंना भारतीय सैन्यात सामील होण्याचा मार्ग देखील उपलब्ध करून देणे हा आहे.

देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण क्रीडापटूंना चांगल्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करत आहोत, तसेच खेळांमध्ये आपण लैंगिक समानतेला प्रोत्साहन देत आहोत. आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेलची स्थापना हे तरुण महिलांना क्रीडा क्षेत्रात सक्षम बनवण्याच्या आणि या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या सुविधांचे उद्घाटन भारतीय लष्कराच्या खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. हा ऐतिहासिक कार्यक्रम महिला खेळाडूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याचे आणि सशक्त बनवण्याचे वचन देतो, भविष्यातील क्रीडा उपक्रमांसाठी यामुळे एक मजबूत पाया तयार झाला आहे.

बाणेर मधील 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल

पुणे- बाणेर मधील ९ रुफ टॉप हॉटेलवर पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करत महापालिकेने आज येथील रांका ज्वेलर्स च्या वर असलेले हॉटेल हाईव्ह सह बाणेर हायवे लगत च्या आइस अँड फायर तसेच हॉटेल इमेज रेस्टोबार वर धडक कारवाई करून अतिक्रमण करून व्यापलेले सुमारे 11925 चौ.फूट क्षेत्र मोकळे केले.

बाणेर येथे आज या रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.हि कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता -श्रीधर येवलेकर,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखालीउप अभियंता – प्रकाश पवार,कनिष्ठ अभियंता,अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव वस्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतीत दारू विक्रीचा परवाना दिला जातोच कसा ? महापालिकेच्या आक्षेपाकडे जिल्हाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष ?

पुणे- दारू विक्रीचा परवाना देण्याचा अधिकार जरूर राज्य उत्पादन शुल्क खात्याचा , जिल्हाधिकारी कार्यालयाचा आहे ,पण जिथे बांधकामच बेकायदेशीर केले जातेय किंवा केले आहे तिथे हे लोक दारू विक्री व्यवसायाचा परवाना दिला जातोच कसा ? असा आक्षेप महापालिकेने गेली वर्षानुवर्षे घेतला आहे. पूर्वी अशा रमेश बोडके नगरसेवक असताना त्यांनी शहरातील सराईत जकात चोर आणि आणि अशा बेकायदा बांधकामे केलेल्या हॉटेल्स ची प्रशासनाला सर्वे करून यादी करायला लावलेली आजही मुख्य सभेच्या प्रश्नोत्तर कागदपत्रांतून आढळून येईल. अगदी तेव्हा देखील जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला महापालिकेने संपर्क केला होता . त्यावर तात्पुरती मलम पट्टी म्हणून काही बड्या हॉटेल मालकांना नोटीसा काढून त्यांच्याकडून अनधिकृत बांधकाम उतरवून घेण्यात आले होते . अलीकडे जानेवारी महिन्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महापालिकेने या संदर्भात पत्रव्यवहार केल्याचे समजते .पण जिल्हाधिकारी कार्यालयच ढिम्म .. असल्याचे याही वेळी स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही व्यवसायाचा परवाना महापालिका हद्दीत देताना किमान तो व्यवसाय जिथे केला जाणार आहे ते बांधकाम असलेली इमारत अधिकृत आहे काय ? इमारतीत अनधिकृत बांधकाम कुठे अन्यत्र आहे काय ? अग्निशामक दलाची तिथे ना हरकत आहे काय ? या बाबी तपासणे जरुरीचे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे आणि ते वारंवार महापालिकेने मांडले आहे. पण संबधित यंत्रणा मात्र आपापले अधिकार जाणून तेवढ्यापुरतेच ते वापरत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बेकायदा बांधकामे फोफाव णे आणि त्यामुळे वाहतुकीचा भार वाढणे हि प्रक्रिया सातत्याने होत आली आहे.

लक्ष्मी रस्त्यावरही तसेच ..अनधिकृत बांधकामेच वाहतूक समस्येला जबाबदार

लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांना पोटमाळे बांधण्यास महापालिकेने प्रतिबंध केला होता , ती बेकायदा असल्याची भूमिका घेत पोटमाळे पडण्याची कार्यवाही केली जात परंतु तत्कालीन खासदार कलमाडी यांच्याकडे त्यावेळी सारे व्यापारी गेले .आणि त्यांनी हि कारवाई थांबविण्यास आग्रह केला पण काही महापालिका अधिकारी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसत . पोटमाळे बांधले तर दुकानातून ग्राहक उभे राहण्याची क्षमता वाढते आणि तेव्दीच जास्त वाहने या रस्त्यावर पुढे येतात शिवाय दुकानदारांची त्यांच्या नौकर दरांची वाहने इथे उभी असतात .पर्यायाने येथे पार्किंगचे प्रोब्लेम्स येतील त्यात हे दुकानदार रस्त्यावर जाळ्या टाकूनहि जागा अडवीत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते मात्र कलमाडी यांनी यावर शक्कल लढवून बहुमताच्या जोरावर दंड आकारून लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांचे पोटमाळे अधिकृत करण्याचा प्रस्ताव संमत करवून घेतला आणि या कारवाया थांबविल्या होत्या .पर्यायाने पुढे वाहनतळ उभारणी आणि कोंडी वाढतच गेली .

अशा सर्व पार्श्वभूमीवर वारंवार म्हणजे किमान १० वेळा जर महापालिकेने एखाद्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम , किंवा साईड ,किंवा फ्रंट मर्जीन मध्ये अतिक्रमण संदर्भात कारवाई केली तर अशा ठिकाणी असलेला व्यवसाय कोणताही असो त्यास कोणत्याही विभागाने परवानगी दिलेली असो त्या व्यवसायाचा परवाना आपोआप रद्द होईल अशी तरतूद करण्याची शिफारस डावलून पुण्याला वाहतूक कोंडीत ढकलण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. साईड ,किंवा फ्रंट मर्जीन मध्ये संबधित इमारतीत येणाऱ्या गेस्ट ची वाहने उभी करण्यात आली पाहिजेत मात्र या जागा अतिक्रमण करून लात्ल्याने संबधित पार्किंग रस्त्यावर येते आणि शिवाय या व्याव्स्याने येणाऱ्या वाढीव ग्राहकांचेही पार्किंग रस्त्यावर येते पर्यायाने पार्किंग साम्येला वाहतूक समस्येला उग्र रूप येते असे सांगण्यात येते आहे.